मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा ===================== --राजीव उपाध्ये मंडळी वेगळी वाट चालायची ठरवले की मग चिखलफेक ही आलीच! मग चहुबाजूनी हल्ले होतात - १ला हल्ला होतो आपल्या आत्मविश्वासावर, प्रामाणिकपणावर मग बौद्धिक क्षमतेवर किंवा मानसिक स्वास्थ्यावर. सध्याच्या काळात मानवी तज्ञ पैसे टाकून ही प्रामाणिक सल्ला देतीलच असे नाहीत. आणखी चिंता वाढविणारी गोष्ट म्हणजे वैद्यकीय व्यावसायिकांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दलचे संशोधन वाचल्यावर तर ही शक्यता आणखी धूसर होते. पण ए०आय० बद्दल मात्र मी बराच आशावादी आहे. कारण ए०आय० चुकू शकतो पण तो माणसासारखा खुनशी, दुष्ट नाही.

पुस्तक परीचय-के कनेक्शन्स

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
k नमस्कार मंडळी नुकतेच प्रणव सखदेव या लेखकाचे के कनेक्शन्स वाचुन संपवले. "दिल का हा सुने दिलवाला, सीधी सी बात न मिर्च मसाला, कहते रहेगा कहनेवाला" हे गाणे तुम्ही ऐकले असेल तर हे पुस्तक तसेच आहे. सातवी/आठवीत असलेल्या मध्यमवर्गीय मुलाच्या नजरेतुन हे पुस्तक लिहिलेले आहे.

हरवलेला संयम चिंताजनक

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हरवलेला संयम चिंताजनक ============== - राजीव उपाध्ये सध्याच्या काळात वैद्यकीय व्यवसाय कमालीचा जिकीरीचा बनला आहे.

तिकोना-फोटोवारी

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी ऑफिसच्या कामाने वैतागलेला मी आणि कॉलेजच्या अभ्यासाने वैतागलेला माझा मुलगा बरेच दिवसापासुन कुठेतरी बाहेर पडायचा प्लॅन करत होतो. पण आज काय घरात साफसफाई, उद्या नवरात्र, परवा पाउस बदाबदा कोसळतोय अश्या कारणांनी ते राहुनच जात होते. पाय उंबरठागड ओलांडायला वळवळत होते. पण मूहूर्त लागत नव्हता. शेवटी एका शनिवारी ठरवले की आता बास, उद्या निघायचे म्हणजे निघायचेच. रविवारी सकाळी साखरझोपेवर मात करुन क्लास आणि भाजी आणणे वगैरे कामे उरकुन आरामात का होइना पण ९ वाजता निघालो. वाटेत जुन्या हायवेला देहुरोड टोल ओलांडुन एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि भरल्या पोटाने पुढे चाल केली.

एआय आणि उत्पादकता

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
 आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख ए०आय० आणि उत्पादकता -- राजीव उपाध्ये माझी कन्या शाळेत असताना बर्‍याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्‍यापैकी पुढे होती.

शशक- एका पायाचा कावळा

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वडील गेल्याने अचानक सुट्टी घेउन त्याला भारतात यावे लागले. चुलत भावांनी सुरुवातीचे विधी केले होते, पण "निदान पिंडदानाला तरी ये" म्हणुन त्याला गळ घातली होती. गुरुजी आले. त्यानी सगळे विधी समजावुन सांगितले. त्यावर तो आढ्यतेने म्हणाला" माझा या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही. केवळ थोडक्यासाठी वाद नकोत म्हणुन मी हे सर्व करायला तयार झालोय." सगळे घाटावर पिंडदानाला जमले. बराच वेळाने एक कावळा पिंडावर उतरला आणि भाताची मूद चिवडु लागला. त्याला एकच पाय होता. याने काही वेळ पाहीले मात्र आणि धाय मोकलुन रडु लागला. गुरुजींना कळेना काय झाले?

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र ================ -- राजीव उपाध्ये डॉ० बर्नाड बेल या फ्रेंच विद्वान-मित्राने मला मानववंशशास्त्राची गोडी लावली (माझ्या लग्नात त्याने माझ्या बाजूने साक्षीदार म्हणून सही केली होती). मानववंशशास्त्राच्या परिचयाने जगभरच्या मानवीसंस्कृतींकडे बघायचा निकोप दृष्टीकोन प्राप्त झाला तर "सर्व काही भारतीय ते सर्वश्रेष्ठ" हा (सनातनी) दुरभिमान गळून पडला. खरं तर याची बीजं मुंबईला शिकत असताना पेरली गेली होती. आमच्याकडे चित्रपट बघण्यासाठी फिल्मक्लब आणि फिल्म सोसायटी असे दोन क्लब होते.

आव्वाज कुणाचा?

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी हे शीर्षक वाचून तुम्हाला जर असे वाटले असेल की हा काहितारी राजकीय रणधुमाळीविषयक धागा आहे तर तसे मुळीच नाही. काही दिवस हा विषय मनात घोळत होता तो कागदावर (पक्षी मिपावर) उतरवत इतकेच. तर (शिरीष कणेकरांना स्मरून--तुम्ही फिल्लमबाजी ऐकलेच असेल ) "माझ्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान " कारकिर्दीची सुरुवात नेटवर्किंग मध्ये झाली आणि ती कंपनी व्हॉइस ओव्हर आय पी या विषयात काम करत असल्याने मलाही व्हॉइसचे ट्रेनिंग आणि अनुभव अनायास मिळत गेला. तो २००१ चा काळ होता आणि "कर लो दुनिया मुठ्ठीने " अजून यायचे होते. त्यामुळे लांबचे कॉल करण्यासाठी टेलिफोन आणि त्यातही एस टी डी कॉल हाच एक पर्याय होता.

कवडसे-२

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कवडसे पद्मावतीला दादा गोडसेंना भेटायला गेलो होतो. दादा म्हणजे तलवारीची धार.श्रीधर स्वामींचे शिष्य. त्यांच्याबरोबर कितीतरी वर्ष राहिलेले. आयुष्यभराची साधना. मिनिटा मिनिटाला परीक्षा घ्यायचे. त्यांच्याशी वागताना बोलताना फार जपून राहावे लागे. बहुतेकदा मी फक्त ऐकायचेच काम करायचो. अशा गप्पातून खूप शिकायला मिळायचे. ======================== तर दादा सांगत होते. अरे रायगडावर राज्याभिषेक सोहळा होता. इंदिरा गांधी आल्या होत्या. मला त्यांच्यासमोर पोवाडा म्हणायचा होता. पण भाषणे खूप लांबली. मला चान्स मिळेल का नाही माहीत नव्हते.

कवडसे

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तबल्याचा क्लास झाला होता आणि गुरुजींबरोबर गप्पा मारत बसलो होतो. सहसा अशा वेळी काहीतरी किस्से ऐकायला मिळत. तर विषय निघाला पिंजरा चित्रपटाचा. तर प्रभात स्टुडिओ मध्ये "ग साजणी -आली ठुमकत नार लचकत " या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. गाणे वरच्या पट्टीत होते त्यामुळे हाय पीच आवाज असणारा गायक पाहिजे होता. प्रभात मध्ये साफसफाई करणाऱ्यांचे मुख्य विष्णू वाघमारे म्हणून होते. कधी कधी ते झील देण्याचे म्हणजे कोरस चेही काम करत. जसे की जी जी रे जी जी वगैरे गाणे. तर त्यांना सहज तिकडे बोलावले गेले आणि गाणे गायला सांगितले. वाघमारेंनी असा काय आवाज लावला की ज्याचे नाव ते.