नमस्कार मंडळी
ऑफिसच्या कामाने वैतागलेला मी आणि कॉलेजच्या अभ्यासाने वैतागलेला माझा मुलगा बरेच दिवसापासुन कुठेतरी बाहेर पडायचा प्लॅन करत होतो. पण आज काय घरात साफसफाई, उद्या नवरात्र, परवा पाउस बदाबदा कोसळतोय अश्या कारणांनी ते राहुनच जात होते. पाय उंबरठागड ओलांडायला वळवळत होते. पण मूहूर्त लागत नव्हता. शेवटी एका शनिवारी ठरवले की आता बास, उद्या निघायचे म्हणजे निघायचेच. रविवारी सकाळी साखरझोपेवर मात करुन क्लास आणि भाजी आणणे वगैरे कामे उरकुन आरामात का होइना पण ९ वाजता निघालो. वाटेत जुन्या हायवेला देहुरोड टोल ओलांडुन एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि भरल्या पोटाने पुढे चाल केली.