"शब्द हे शस्त्र आहेत", हे वचन आपण सगळेच नेहमी ऐकतो. शब्द हे जपून वापरा, ते फार सामर्थ्यवान असतात. त्यांचा अर्थ तर काही वेळा माणसाच्या मनाचा (माझ्या मते जीभेचाही) चेंदामेंदा करतो.
मला अनेक शब्द कोड्यात टाकतात. त्यांचे अर्थ तर मला कळत नाहीतच पण त्यांचे उच्चारही कठीण वाटतात. काही शब्द उच्चारताना तर जीभ वळतच नाही."चटईला टाचणी टोचली" किंवा "काळे राळे,गोरे राळे,राळ्यात राळे मिसळले." सारखी अवघड शब्दरचना नाही हं! पण अनेक शब्दांचे उच्चार आणि अर्थ मला गोंधळात टाकतात. माझी एक लहानपणीची मैत्रीण होती. ती खूप सावकाश शब्द उच्चारायची.