Skip to main content

मांडणी

काम

लेखक निमीत्त मात्र यांनी शनिवार, 15/11/2008 07:33 या दिवशी प्रकाशित केले.
काम करणं अथवा न करणं हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. अर्थात काम करणारे आणि काम न करणारे असे समाजात ढोबळ मानाने दोन गट असतात. परंतु एवढ्या ढोबळ वर्गीकरणातून हा विषय पूर्ण होऊ शकतो असं मला वाटत नाही. काम करणाऱ्या गटात अनेक उपगट असतात. आवडीनं काम करणारे, मनाविरुद्ध काम करणारे, काम एन्जॉय करणारे, मन मारून काम करणारे, सदा हसतमुख काम करणारे, रडत रडत काम करणारे, वेगानं काम करणारे, हळूहळू काम करणारे, आपणहून भरपूर काम करून नंतर त्याचीच तक्रार करणारे, केलेल्या कामाचा मोठा गाजावाजा करणारे, गुपचूप कामाचा डोंगर उपसूनही हूं की चूं न करणारे, आपलं काम करून इतरांचंही काम करणारे, आपल्यापुरतं काम करणारे....

`स्टार माझा`वर `ब्लॉग माझा'

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 13/11/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, `स्टार माझा'नं घेतलेल्या `ब्लॉग' स्पर्धेत आपल्या काही सदस्यांसह अन्य काही जणांना बक्षीसं मिळाली. पुरस्कार प्रदान कार्यक्रम गेल्या सोमवारी मुंबईत झाला. गेल्या शनिवारी हा कार्यक्रम `स्टार माझा'वरून प्रसारितही झाला. ज्यांना तो पाहायला मिळाला नाही, त्यांच्यासाठी उद्या, शुक्रवार १४ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता तो पुन्हा पाहण्याची संधी आहे. नक्की बघा! हा कार्यक्रम `स्टार माझा`च्या साईटवर मुखप्रुष्ठावरील आयपी टीव्हीवरही त्याच वेळी ऑनलाइन पाहता येईल.

मिसळपावचा सेवाप्रदाता...

लेखक सरपंच यांनी बुधवार, 12/11/2008 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळपासून मिसळपावचा सेवादाता आलेल्या अतिथिंच्या मागणीचा पुरवठा करता करता त्रासून गेला होता. त्यामुळे सदस्यांना मिसळपाव बघता येत नव्हते. आता मिसळपाव व्यवस्थित आहे. मात्र सोबतच सेवादात्याची क्षमता वाढवण्याचे काम सुरू आहे. आज किंवा उद्या मिसळपाव पुन्हा असेच चालु बंद असू शकते. त्यामुळे कृपया त्रास करून घेऊ नका. मिसळपाव उघडायला त्रास होतो म्हणून ज्यांनी ज्यांनी आज संपर्क साधला त्या सर्वांचे धन्यवाद. मिसळपाव वर तुमचे प्रेम असेच कायम राहो. मिसळपाव अधीकाधीक सक्षम होत राहील. धन्यवाद.

संवाद-४ [ही मालिका नाही]

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 30/10/2008 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात येतात ते कागदावर उतरवतो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंतर्‍यापासुन सुरु व्हावं तसं.

भाऊबीज

लेखक mina यांनी बुधवार, 29/10/2008 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला ‘यम द्वितीया असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते. भाऊबीजेच्या दिवशी काय करावे? सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे. बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।। तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा. त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी.

जागतिक मंदीवर अमेरिकेत २० देशांच्या नेत्यांची बैठक

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
जगातील आर्थिक मंदीवर चर्चा करण्यासाठी २० देशांच्या नेत्यांची बैठक अमेरिकेत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आमंत्रित केली आहे. आमंत्रित 20 देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. १५ नोव्हेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही बैठक आहे. व्हॉईट हाऊसमध्ये ही बैठक होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ४ नोव्हेंबरला आहे. निवडणुकीनंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

मनुवादी आचरटपणा

लेखक द्विज यांनी गुरुवार, 23/10/2008 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखनावर आलेल्या एका प्रतिक्रियेला प्रतिसाद
मनुवादी आचरटपणा तुम्ही कपडे न घालता बाजारातुन हिन्डता का ? मग शारदेचा अपमान का करावा शुद्धलेखनाला मनुवादी आचरटपणा म्हणण्यापुर्वी स्वतः नागडे फिरुन दाखवा अशुद्ध लेखनाला विरोध नाही माझा माझा रोष आहे त्याला मनुवादी म्हणण्याला तुला जन्म दिला तेव्हा वासनावादी म्हणाला होतास का तुझ्या बापाला मनु माझा पुर्वज होता तो हसतोय तुझ्या या स॑भ्रमाला कारण द्विज रुपी
Taxonomy upgrade extras

मराठी तरुणांसाठी नोकरी-उद्योग देणारा वेबमंच

लेखक अभिरत भिरभि-या यांनी बुधवार, 22/10/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा सध्याच्या काळात मराठी तरुणांसाठी रोजगार हा ज्वलंत प्रश्न बनल्याचे दिसते आहे. ही नाराजी ग्रामीण व शहरी अशा दोन्ही स्तरावर जाणवते आहे. बर्‍याचदा आपण आपल्या नोकरी / व्यवसायाच्या निमित्ताने खुल्या झालेल्या जागा दिसतात; पण तुमच्या परिचयाचा कोणी उमेदवार माहिती नसल्याने ही संधी लायक व गरजु तरुणांपासुन वंचित राहते. मिपावर आपण आपली भाषिक/सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी येथे येतो. अप्रत्यक्षपणे येथे नेटवर्क तयार होते.

बातमी

लेखक mina यांनी शनिवार, 18/10/2008 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
जालना तालुक्‍यात २३० कुपोषित बालके -१७ Oct९ber २००८ जालना- जिल्ह्यात श्रेणी तीन व चारमधील कुपोषित बालकांची संख्या सर्वांत जास्त २३० एवढी आहे. त्यातही जालना तालुक्‍यात कुपोषित मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव भेले यांनी दिली. गुरुवारी (ता. १६) येथील (कै.) शंकरलाल मुंदडा मतिमंद बालगृहातील कुपोषित बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्ह्यात श्रेणी तीनची- २०८ आणि श्रेणी चारची-२२ कुपोषित मुले आहेत.