Skip to main content

कविता

तुला ना कळे लोचनांची कहाणी..

लेखक राघव यांनी सोमवार, 22/11/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
जरी व्यक्त होती मनी आर्त गाणी.. तुला ना कळे लोचनांची कहाणी.. नदी-सागराची घडे भेट साधी.. तरी, अंतरी, छेडते सूर आधी! शब्दांविना बोलते मूकवाणी.. तुला ना कळे लोचनांची कहाणी.. कधी भासती, भास झाले खरे हे! कधी श्वास माझा उगा अडखळे रे!! सुखाची दरी, ही अशी जीवघेणी.. तुला ना कळे लोचनांची कहाणी.. नको रे असा दूर जाऊ सख्या तू.. सुगंधाविना मोगरा पोरका तू.. सांगू कसे, का फुले - रातराणी!! तुला ना कळे लोचनांची कहाणी.. शुभम्

मुंबई

लेखक यकु यांनी रविवार, 21/11/2010 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईमुंबई पाहिली मुंबई जीवंत नगरी ती मरती मुंबई जगती मुंबई, खाती मुंबई, पिती मुंबई पळती मुंबई जळती मुंबई हसती मुंबई खेळती मुंबई झुकझुक गाड्या अचाट वेळा ढण ढण भोंगा गाडीत झोपा भजनकिर्तन भिक्षेकरिता निर्लज्ज नर्तन पंचम तारा आलिशान कारा स्पेशल स्यूट अन सर्व पसारा फुका जन्मती मुकाट मरती जगती आणि पुन्हा निपजती इथेच बंगले इथेच कारा ऐंशीच वर्षे किती पसारा लोकल रिक्षा विमान एस्ट्या गुगल फोन अन कडक नोटा बारच नाही बाला सुध्दा पितापिताना उलट्या नुस्त्या जगताजगता मरण धडकते पुरतच नाही जग हे रडते

शी वॉक्स इन ब्युटी (बायरन)

लेखक शुचि यांनी रविवार, 21/11/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
बायरन या महान कवीची "She walks in Beauty" ही कविता जेव्हा मी कॉलेजमध्ये वाचली तेव्हा अगदी प्रेमात पडले होते. मला त्या वेळेस नक्की कळलं नव्हतं की मी इतकी मंत्रमुग्ध का झाले होते पण तेव्हा "The best" वाटली होती, अजूनही वाटते. विचार करता पहिल्यांदा वाटलं की एका स्त्रीच्या पदन्यासाचं, सौंदर्याचं अप्रतिम वर्णन आहे, लक्षवेधी उपमा आहेत म्हणून असेल कदाचित. पण मग मग जशी स्वतःची ओळख होत गेली लक्षात येऊ लागलं की कारण वाटतं तितकं उथळ नाही आहे.

फार पडझड झालीय ह्या शरीराची !!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 21/11/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी उन्हाळे पावसाळे उलटून गेले शरीराने खूप भोग घेतले भोगून सुख दुख घेतले पचवून पण आता नाही सहन होत त्याला ह्या ऋतूंचे बहाणे नाही सहन होत ह्या शरीराला आता हे बदल थकून गेलेत त्याचे गात्र नि गात्र गंजून गेलेत ह्या सांध्याच्या बिजागर्या कुरकुरतोय सांधा नि सांधा नेत्र लागलेत पैलतिराला....!! आतला तो असतो अजूनही प्रचंड टवटवीत लाथेने हे जग ठोकरीत तेवढी वाटते प्रचंड हीमत तो आहे तितकाच उत्साही .ताजा टवटवीत मन किती ताजे आहे त्याच्यात अजूनही ताकद आहे हे शरीर सांभाळण्याची पण हे शरीरच गेलेय घाबरून त्यानेच दिलाय धीर सोडून हातपाय बसलाय गाळून संपून गेलीय सारी उमेद किती सांभाळून
काव्यरस

म्हातारपणीची प्रार्थना

लेखक अरुंधती यांनी रविवार, 21/11/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्‍यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. कदाचित इतरांना जाणवणार नाही. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्‍या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए.

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

कागदाचा कपटा

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 18/11/2010 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
कागदाचा कपटा मिश्र माध्यम.

मी पुरुष बिच्चारा

लेखक गणेशा यांनी बुधवार, 17/11/2010 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
समान संधी मध्ये आजच्या मी पुरुष बिच्चारा बस मध्ये चढलो, अन रीकामी लेडिज सीट दिसली तरी लोंबकळत तेथेच मी रहातो वाटल्यास कंडक्टरला विच्चारा ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो धक्का तीचा लागतो, पण विनाकारण ' लाईनमन' होऊन मार मला खावा लागतो काय करणार मी पुरुष बिच्चारा वाटत अस्स उठाव अन निवडून याव आपण नियम समान करावेत स्त्री पुरुषांसाठीचे, पण नेमके तेंव्हा तिथले सीट स्त्री साठी राखीव असते काय करणार मी पुरुष बिच्चारा नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले फ़ॉर्म ही भरला, पण नियमानेच गळा कापला ३० % लेडिज reserved म्हणून आमचा नंबर waiting list ला गेला काय करणार मी पुरुष बिच्चारा तरी
काव्यरस