मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मागवणे

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ते मागत गेले आम्ही देत गेलो, ते हागत गेले आम्ही होतो मेलो || लाखो रुपये हुंडा 'कस्पटा'समान दिले, त्यांचे काम मा(ह )गवणे आम्ही भरली बिले || आता वकील करतील चारित्र्य हनन, व्यर्थ ठिकाणी हृदय गुंतले तन मन||

वाचने 2095 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मारवा गुरुवार, 05/29/2025 - 22:22
ऍड. विपुल दुशिंग ला दोष देणे निरर्थक आहे. व्यवस्था समजून घ्या. प्रत्येक आरोपी ला बाजू मांडण्याचा अधिकारी व्यवस्थेने दिलेला आहे. त्या वकिलाला आरोपींची बाजू मांडण्याचा अधिकारी आहे. तो ते दोघे आरोपी आणि वकील वापरत आहेत. न्यायालयाला निर्णय देण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकणे भाग आहे. न्यायालय ते करत आहे. त्या वकिलाला करणाऱ्याला मी बक्षीस देईल असे रोहिणी खडसे म्हणाल्या ही चुकीचे आहे. असे करून काहीही साध्य होणार नाही हे सर्व निरर्थक आहे. त्यांना आरोपीच्या वकिलाना प्रत्यारोप करण्यापासून थांबवणे देखील शक्य नाही. हे कितीही संताप झाला वाईट वाटले तरी याला नाईलाज आहे कारण ही व्यवस्था आहे हे संविधान आहे आणि यात ही असे असे अधिकारी दिलेले आहेत. Procedure दिलेली आहे. ही व्यवस्था, ही संविधान, हा आरोपीचा अधिकार, हा वकिलाचा अधिकार ,ही दोन्ही बाजू ऐकणे, हे सर्व सर्व अत्यावश्यक असे आहे एका परिपूर्ण व्यवस्थेसाठी. याचा त्रास होणे, दुःख होणे ,ही सर्व समजू शकतो पण व्यापक दृष्टिकोनातून या सर्वच बाबी आवश्यक आहेत. याला खरोखर नाईलाज आहे. कोणाचीही बाजू इथे घेत नाहीये कृपया संविधान आणि व्यवस्थेचे भानानी जाणीव ठेवा इतकेच म्हणणे आहे. तिला पायदळी तुडवण्यात काहीच अर्थ नाही आहे ते असे आहे याहुन उत्तम व्यवस्था जोवर येत नाही तोवर आहे त्या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातच सर्वांचे व्यापक हित आहे.

In reply to by मारवा

सुक्या गुरुवार, 05/29/2025 - 23:31
असहमत!! केवळ काहीतरी प्रतीवाद करायचा म्हणुन एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे याला व्यवस्थेचा भाग म्हणुन पळवाट काढता येत नाही. ही एक अत्यंत चुकीची अशी मानसिकतात आहे. अगदी विख्यात असलेले (राम जेठमलाणी बहुदा) वकील सुद्धा असली थेरे करतात तेव्हा काहीतरी नक्कीच करायला हवे. एखाद्या स्त्री च्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवणे जर अपराध असेल तर तसे वकीलाच्या बाबतीतही असायला हवे. अकांउटीबीलीटी असायलाच हवी. वस्त्राहीन फिरणे हा माझा स्वातंत्र्याचा भाग असला तरी घरी ईतर लोक आले असताना तसे न करणे ईतकी अक्कल मला असायलाच हवी.

In reply to by सुक्या

मारवा Fri, 05/30/2025 - 05:16
हे बघा या घटनेत जे काही प्रथमदर्शनी सत्य दिसत आहे ते खरोखर अत्यंत घृणास्पद असेच आहे. आपणा सर्वांना जे उघडं पणे दिसत आहे की हा अत्यंत क्रूर मानवतेला लाजवील असा प्रकार आहे. या महिलेच्या मारहाणी च्या खुणा देखील काही मृत्यूपूर्व 24 तासातील व काही त्या अगोदर च्या आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. हा राजकीय पाशवी शक्ती वापरून केलेला गुन्हा उघडपणे.दिसतोय. या विषयि आपणा सर्वांच्या मनात संताप आहे. आणि तो साहजिकच आहे. पण कृपया न्याय व्यवस्था आणि तिच्या मर्यादा समजून घ्या. त्या वकिलाला आणि त्या आरोपीला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार जो दिलेला आहे तो काढून घेता येत नाही. आता त्यांनी जर बाजू मांडली तरी त्याला चारित्र्यहनन केले असे म्हणू शकत नाही. आता त्यांना whatsapp किंवा इतर पुरावे सादर करावे लागतील. ते जर आरोपीं सिद्ध करू शकले नाहीतर केस पूर्णपणे अजून कठोरटेने त्यांच्या विरोधातच जाईल. त्यातही नुसते चॅटिंग केले इतकेनपुरेसे नाही पुढे मजकुराची पण छाननी होईल इंटरप्रिटेशन होईल. आता हे खरोखर प्रिय असेच आहे पण ही व्यवस्था आहे .आपल्याकडे बलात्कारित महिलेचे नाव प्रसिद्ध न करण्याचा कायदा आहे. हा व अशा प्रकारच्या कायद्याचा उद्देशच कोणी गैरवापर न करणे असाच आहे. अजून अशा प्रकारच्या कायद्याची गरज आहेच. पण म्हणून सर्व करूनही तुम्ही आरोपीला आणि त्याच्या वकिलाला त्यांनी जे काल न्यायालयात सादर केले त्यापासून थांबवू.शकत नाही. तसे केले तर तो एकतर्फी निकाल होईल. एन्काउंटर जरी कितीही वाईट अपराध्याचा केला तरींतो गुन्हा यासाठी आहे. मी इतकेच म्हणतोय तो वकील विपुल जो आहे त्याला मारणाऱ्याला मी बक्षीस देईल असे करून काहीही साध्य होणार नाही. ते चुकीचे आहे.त्याने केस सोडली दुसरा वकील केस घेणार. हा उपाय नाही आणि व्यवस्था मोडून टाकून करा न्याय घाला गोळ्या असे केल्यास काहीच साध्य होणार नाही. खरा प्रयत्न करायचा असल्यास तो असा करावा की ज्याशींकायात तरतूद्ब आहे की बलात्कारित स्त्री चे नाव जाहीर करू नये. त्याच प्रमाणे जोपर्यंत केस चां अंतिम. निकाल लागत नाही तोपर्यंत काही विशिष्ट proceedings ज्या स्त्री च्या चारित्र्याशी संबंधित आहे त्याच्या विषयी बाहेर जाहीर वाच्यता करावयास बंदी घालण्याची तरतूद असे काही तरी करून याला प्रतिबंध आणता येईल. या दिशेने प्रयत्न करावयास हवे. काल दमानिया त्या वकिलाला एक चर्चेत म्हणत होत्या तुम्हाला अशा केसेस घेता लाज कशी वाटत नाही तुम्हाला या अर्थाने म्हणत होत्या हे पूर्णपणे चुकीचे आहे तो नाही तर दुसरा वकील घेणार. कारण तशी व्यवस्था आहे इतकेच नवे कोणीच वकील नाही मिळाला तर प्रसंगी माझ्या माहितीप्रमाणे सरकारला की न्यायालयाला वकील पुरवावा लागतो. ही सर्व व्यवस्था कितीही त्रासदायक असली तरी त्याला नाईलाज आहे इतकेच म्हणणे आहे आणि असा त्या वकिलाला निरर्थक विरोध करून काहींसाठी होणार नाही.

In reply to by बाजीगर

मारवा Fri, 05/30/2025 - 06:01
मी वकील नाही आणि कृपया लक्षात घ्या मी त्या वकील विपुल आणि त्या आरोपींची बाजू घेत नाहीये. तुमच्याइतकेच मला सुद्धा झालेल्या घटनेचे दुखः संताप आहे.