Skip to main content

कथा

उलगता बाजार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 06/08/2008 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
"सामावून घेण्यावर माझा विश्वास वृद्धिंगत झाल्याने मला वाटू लागलं की मी आणि माझी आई येईल त्या प्रसंगातून मार्ग काढून जीवंत रहाण्याची धडपड करूंच." मी आणि माझी आई संध्याकाळच्या उलगत्या बाजारात जाऊन आमची घरासाठी रोज लागणारी खरेदी करतो.उलगत्या बाजारात जाऊन खरेदी करण्याचा फायदा असा की सकाळ पासून आलेले विक्रिकर-लोकं सध्याकाळी अगदी थकून जातात.आणि उरली सुरलेली भाजी,फूलं,फळं कमी किंमतीत किंवा वाटे काढून विकून टाकतात.फळं थोडी जास्त पिकतात,भाजीचा ताजेपणा कमी होतो,आणि फूलं तर बरिच कोमेजलेली असतात.ही फूलं देवाला वाहिली तरी त्याचं त्याला काहिच वाटणार नाही असं मनात येतं.आमच्या परिस्थितीचा कुणावरही ठपका ठेव

प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/08/2008 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं "तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?" त्यावर तो म्हणाला, "त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे." मी त्याला हे ऐकून म्हणालो, "अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?" हंसत,हंसत मला म्हणाला, "आध्यात्म" ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो. श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे ते श्रद्धेतूनपण जन्म घेतात.आणि हे शब्द माझ्या आयुष्याची आणि माझ्या कामाची व्याख्या करण्यास कारणीभूत आहेत. माझं आध्यात्मी मन आणि माझं वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही गोष्

लेक लाडकी

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 04/08/2008 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
लेक लाडकी . आठवणींच्या गावाची सफर करत मागे मागे जात इथे येऊन पोहचले. इथून आणखीन मागच काहीच दिसत नाहीये, हिच ती पहिली आठवण!! मला फूलपंखी दिवसांमध्ये घेऊन जाणारी.. मी तीन-साडेतीन वर्षांची असेन, बालवाडीत जाणारी.. बालवाडीच्या दुसऱ्या वर्षाला होते तेव्हा. आमची बालवाडी आणि आमच्या गावातलं महिला मंडळ एकाच छता खाली जमायच.. आणि मग आमचे सामाईक असे सांस्कृतिक कारेक्रम व्हायचे. कोणता दिवस होता बरं तो.. कांदे-नवमी /सरस्वती-पुजन /की नवरात्र.. आता नक्की आठवत नाही ... धुवाधार पाऊस पडत नव्हता.. म्हणजे पावसाळा संपत आलेला.. नवरात्रिचेच दिवस असावेत.. शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा चालू होत्या..

मानसिक भितीने ग्रासलेला गुरुनाथ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/08/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
"बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं" मी एकदा माझी कार रिपेअर करण्यासाठी एका कारखान्यात टाकली होती.मोटर कारखान्याच्या मालकाने मला एक भली मोठी लिस्ट दिली आणि म्हणाला, "ह्या लिस्ट मधले पार्टस तुम्ही अमूक अमूक दुकानातून आणा.हे पार्टस स्पेशल आहेत आणि आम्ही ते ठेवत नाही." ती लिस्ट घेवून मी त्या दुकानाच्या पत्त्यावर दुकानात गेलो.दुकानाच्या कॅबिन मधून आतून येणारा आवाज जरा परिचयाचा वाटला.म्हणून कौन्टरवरच्या त्या माणसाकडे जरा चौकशी केली की ते कोण बोलत आहेत.तो म्हणाला, "ते आमचे मालक गुरुनाथ आजगावकर" माझ्या चट

प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/08/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी दिल्ली एअरपोर्टवर फ्लाइट चुकली म्हणून निवांत दुसरी फ्लाइट मिळेपर्यंत वेळ काढत बसलो होतो.माझी एक खूर्ची सोडून दुसर्‍या खूर्चीवर-व्हिलचेअरवर- एक सदगृहस्थ बसले होते.सायंटिफिक जगतात ते विषेश नावाजलेले होते.त्यांची विषेश गोष्ट अशी होती की त्यांना स्नायू हळू हळू क्षीण होण्याचा एक व्याधी झाला होता.तरीपण ते आपल्या कामात नेहमी व्यग्र असायचे.त्यांच्या बाजूला एक गृहस्थ बसून ते जे काही बोलत होते ते तो लिहून घेत होता. लेट फ्लाइट बद्दल आमचा विषय निघाला आणि दोन तास इथं बसून राहण्याला पर्याय नव्हता.मीच त्यांच्याशी जास्त जवळीक आणून त्यांची चौकशी करू लागलो होतो. त्यांची ही परिस्थिती पाहून मीच त्य

पन्नास टक्के थेअरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 02/08/2008 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
नरगुंदकरांचा मुलगा खूप वर्षानी मला भेटला.त्याचे आईवडील त्याच्याचकडे हल्ली राहायला गेले होते.म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो.घरी गेल्यावर चहापाणी झाल्यावर काही गप्पागोष्टी झाल्या.बोलता बोलता त्यांचा मुलगा म्हणाला, "मला चांगलच लक्षात आलं की नंतर येणार्‍या सर्व चांगल्या गोष्टी सहजच होऊन गेलेल्या वाईट गोष्टीवर मात करतात. वाईट गोष्ट सर्वसाधारण चांगल्या गोष्टीपेक्षां जास्त काळ टिकून राहूच शकत नाहीत.शांती आणि भरभराटीचा मी चहाता आहे. मी "पन्नास टक्के थेअरी" मानतो.अर्धाअधीक वेळ घटना सर्वसाधाराण गोष्टीपेक्षा चांगल्या असतात.आणि अर्ध्याअधीक वेळा त्या वाईट असतात.मला वाटतं जीवन हा एक लंबकाचा झोका आहे.

यश आणि अपयश

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 01/08/2008 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
" आता तिने तिची भुमिका बदलली.तिने अपयश घेण्याचं रिस्क घेतलं.लोकांकडून नाराजी घेतली.कारण तिच्या आत्म्याला शांतीची गरज होती. " प्रो.देसायांची सर्वात धाकटी मुलगी सध्या त्यांच्याकडे राहायला आली होती.त्यांच्या धाकट्या नातीला घेऊन ते त्यादिवशी शाळेत घेऊन जाताना मी दुरून पाहिलं होतं.म्हटलं संध्याकाळी तळ्यावर भेटतील त्यावेळी चौकशी करूं. भेटल्यावर मला म्हणाले, " थोडे दिवस मुलगी माहेरपणाला आली आहे.आमच्या नातीला तोपर्यंत शाळेत बसवू या. गेल्या आठवड्यापासून ती किंडरगार्टन मधे जाऊ लागली.

निरागस

लेखक स्मित यांनी शुक्रवार, 01/08/2008 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या स्थनिक दैनिकात वाचलेली हि बातमी..... नाताळच्या दरम्यान बरीच स्नता ()(उत्तर द्रुव) साठी लहानग्यानी लिहिलेली पत्रे पोश्तात जमा होतात. एक पत्र असे होते........ Dear God Heaven We don't have money. Dad is jobless and mama is sick. Please send us 500$ so that we can celebrate Christmus. Yours, John पोश्ट-मास्तरने ते पत्र रोटरी क्लब कडे पाठवले.

आमचे डि.डि. जोशी सर,

लेखक वाटाड्या... यांनी गुरुवार, 31/07/2008 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कलाशिक्षक दि. दा. जोशी यांचे निधन पुणे, ता. २२ - न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे माजी कलाशिक्षक दि. दा. जोशी (वय ७४) यांचे आज निधन झाले. ........ शिवसेनेचे माजी आमदार (कै.) मो. दा. जोशी यांचे ते बंधू होत. दि. दा. जोशी प्रारंभी रसायनी (जि. रायगड) येथे शिक्षक होते. नंतर टिळक रोड येथील शाळेत त्यांनी चित्रकला व इतिहासाचे अध्यापन केले. पुणे माध्यमिक शिक्षक संघ आणि भारतीय शिक्षण मंडळ यांच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता.

दीर्घ ते लघु(कथा) चित्रपट

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 31/07/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली.