भयमुक्त -बंधानुरक्त (एक छोटीशी गोष्ट)
तो उठला,पंख झटकले,आपलं घरटं आणि त्या सभोवतालची ती दाट जंगलातली तुटकी-पडकी विहिर बघत बघत ,थोडासा आळस देत तो बाहेर पडला.
सकाळी सकाळी सुंदर सोनेरी कोवळ्या उन्हाची तिरिप अंगावर घेत प्रसन्नतेने तो उडु लागला.
स्वतःच्या लाल चुटुक ओठ, हिरवे गार पंख्,दिमाखदार तोरा आणि एकुणच समग्र सृष्टीत नावाजलं जाणारं रुपडं घेउन,
आपल्याच आनंदात स्वच्छंदात गाणी गुणगुणत तो जंगलातुन आला बाहेर आणि समोरच्या शेतावर झेपावु लागला.
त्याला मोठीच मौज वाटत होती. इतक्या उंचावरुन माणसही मुंगीइतकी छोटिशी दिसत होती.त्या शेकडो माणसांना गिळुन
एकदम उंच भरारी घेणार्या त्या पांढर्या पक्ष्याइतकीच उंची आज ह्यानही गाठली होती.
मिसळपाव