Skip to main content

कथा

सैनिक हो! तुमच्या साठी....

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 18/08/2008 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर-सर्जन- आहे आणि हा मुलगा डॉक्टर- सायकॉलॉजीस्ट- आहे. गप्पा मारता मारता मुलगा म्हणाला, "आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति" ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया. मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली. सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी जवानाना ट्रिटमेंट देवून त्यांना बरं करण्याच्या सेवेत होता.

माजा बा

लेखक ब्रिटिश यांनी शनिवार, 16/08/2008 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी चवतीत होतो. स़काली उटलो. अंगोल धवली. च्या न बटर खाल्ला. पलत शालन गेलो. उशीर झाल्ता. मास्तरनी झनकन कानाखाली पेटवली. पाच मिन्टं अन्दार. कायव दिसना. कसातरी बाकड्याव बसलो. हजेरी चाल्लीवती. "मिथुन भोइर~~~ " मास्तर वरडलं माज्या बा ला मिथुन लै आवराचा. माजी आय सांगाची क जवा जवा मिथुनचा पिच्चर थेटरान लागाचा तवा बा कामाव जयचाच नई. आक्का दिस थेटरान परून असाचा. "आत्ताच आयलो न" मी "हं दिसतय मना." "पुस्तकं कारा साल्याव" हजेरी झल्याव मास्तर परत वराडलं "भोईराच्या उट न कालचा धरा वाचुन दाकीव. " माजे पोटान गोला उटला. चवतीत होतू तरी वाचाय जमत न्हवतं.

मांडकुली एक खेडेगांव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 13/08/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
दक्शिण कोकणांत मांडकुली म्हणून एक खेडेगांव आहे.ते बऱ्याच लोकानी पाहीले नसावं.मी पाहू शकलो कारण माझी मावशी तिथे रहाते.वेंगुर्ल्याहून ऊत्तरेकडे सावंतवाडीच्या दिशेने गेल्यास वाटेत छोटी छोटी गांवं लागतात.कुडाळला न जाता बिबवण्या गावाच्या पूर्वेला जात राहील्यास वाटेत करली नावाची नदी लागते.पावसाळ्यात ही नदी तुडूंब वाहत असेते.मात्र ऊन्हाळ्यात ह्या नदीत पाण्याचे दुर्भीक्ष असतं.प्रवासाच्या मार्गात एखाद दुसरं पाण्याचे डबकं दसतं. उन्हाळ्यात शेती करणारे काही शेतकरी ह्या असल्या डबक्यातून पाण्याचा उपसा करून शेताला पाणी द्यायचे.ईलेक्ट्रीक पंप येण्यापूर्वी कोळंब्याने पाण्याचा उपसा करायचे.एका लांबच लांब उंच झ

विचाराच्या पलिकडले.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 12/08/2008 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रो.देसाई आज आपल्या धाकट्या भावाला तळ्यावर घेवून आले होते.मझी त्यांची पहिलीच ओळख झाली होती.बोलता बोलता कुठचा विषय कुठे गेला ह्याचं भानच राहिलं नाही. मी त्यांच्या भावाला सहजच म्हणालो, "कॉलेजच्या जीवनातला एखादा संस्मरणीय अनुभव आठवत असेल तर सांगा" थोडासाचा विचार करून ते म्हणाले, "मी तुम्हाला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अनुभव अवश्य सांगतो. एकोणीशे सत्तरच्या दर्म्यान मी कॉलेज मधे प्रवेश केला.देवाच्या अस्थित्वावर माझा विश्वास अजूनही जागच्याजागी होता.पण शिकत असताना एका क्लास मधे मी माझ्या श्रद्धेच्या पलिकडे जावून पाहिलं आणि खरं सत्य म्हणजे काय ते मला कळून चुकलं. माझा

विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 11/08/2008 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
एका विद्वान माणसाने मला सांगितलं, "तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे." कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला लागला की मग मागे वळून बघणार नाही. तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्या दारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप होऊन बसले होते.अशा प्रसंगी माझ्या पतिना एका एकी हृदयाचा झटका आला.कुणाला मदतीला बोलवायला जायला शक्यच नव्हतं.पावसाच्या कहराबरोबर माझ्याही घरात असाच कहर झाला होता. ती घटना होऊन गेल्यावर नंतर जवळ जवळ तीन चार दिवस पाऊस सतत पडत होता.मी घाराच्या पडवीत

योगायोग,योगायोग आणि योगायोग

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 10/08/2008 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
"अनपेक्षीत घटनांची गुंतावळ ही माझ्या आयुष्याची एक मोठी खूण झाली आहे.मला वाटतं,माझ्या आयुष्यात आलेल्या योगायोगानी मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवला,कधी धक्का पण दिला आणि तो पण अशातऱ्हेने की मी कदाचीत तो मार्ग पत्करला पण नसता,पण त्यामार्गाने मला जाण्याची जरुरी भासली म्हणून तसं करावं लागलं. ह्या योगायोगांशी झुंझ देताना मला त्यासाठी अनपेक्षीत ठिकाणी जावून राहण्याची पाळी आली." मुंबईहून मद्रासला जाताना ट्रेनमधे मला एक बाई भेटली ती सहज बोलता बोलता आपली कथा मला सांगू लागली. ती पुढे म्हणाली, " माझी मावशी मद्रासला राहते.तिची परिस्थिती पण यथातथाच होती.

"जसा व्याप तसा संताप!"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 08/08/2008 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
"हे तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो, "आपण प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही. Anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय, "जसा व्याप तसा संताप!" हेच खरं" रघूवीर देशपांडे आमचे जुने शेजारी.त्यांच्या मुली आता मोठया झाल्या.त्यात त्यांची मोठी मुलगी,अंजना म्हणजेच आता सौ.

कोचर्‍याची लिलू

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 07/08/2008 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारी अकराची वेळ असावी.मी चर्चगेट वरून फौन्टनच्या दिशेने जात होतो. वाटेत हायकोर्टच्या फुटपाथकडे वळलो असेन,एकदम एक व्यक्ती अचानक सामोरी आली. "अरे तू मला ओळखलं नाहीस? मी लिलू कोचरेकर" असं म्हणून ती ज्यावेळी हंसली,त्याबरोबर मला तिची ओळख पटली.तिच्या अंगातला काळा कोट आणि ती गळ्यातली सफेद वकली कॉलर,हातातली ब्रिफकेस बघून मी तिला म्हाणालो, "अगं तू वकील केव्हां झालीस ?" "असं काय तुला माहितच नाही काय ? मी आता गेली दहा वर्ष हायकोर्टमधे केसीस चालवते" असं ती मला म्हणाली. कोचर्‍याला माझ्या वहिनीच्या माहेरचे शेजारी कोचरेकर त्यांची ही मुलगी होती.

कमकुवतपणा ही पण एक प्रकारची शक्तिच असते

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 06/08/2008 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
"हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली "मला माझा जॉब आवडतो म्हणून." आमच्या बिल्डिंगच्या अगदी वरच्या माळ्यावर एक चतर्जी म्हणून बंगाली कुटुंब राहत होतं.राहत होतं म्हणण्याचं कारण बरेच वर्षानी ते आपलं घर सोडून कलकत्यात राहायला गेलं.पण इतकी वर्ष मुंबईत राहिल्याने त्यांच्या सर्व मुलाना मराठी अगदी अस्खलीत येत होतं.कदाचीत हे मुळचे बंगाली आहेत असं सांगणं पण जरा कठीण झालं असतं.