मैत्री व प्रेमातील फरक ओळखा
विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी. कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत. प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विकीची आणि विकीचा इतर मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता.
विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे.
मिसळपाव