Skip to main content

आमचे डि.डि. जोशी सर,

लेखक वाटाड्या... यांनी गुरुवार, 31/07/2008 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कलाशिक्षक दि. दा. जोशी यांचे निधन पुणे, ता. २२ - न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचे माजी कलाशिक्षक दि. दा. जोशी (वय ७४) यांचे आज निधन झाले. ........ शिवसेनेचे माजी आमदार (कै.) मो. दा. जोशी यांचे ते बंधू होत. दि. दा. जोशी प्रारंभी रसायनी (जि. रायगड) येथे शिक्षक होते. नंतर टिळक रोड येथील शाळेत त्यांनी चित्रकला व इतिहासाचे अध्यापन केले. पुणे माध्यमिक शिक्षक संघ आणि भारतीय शिक्षण मंडळ यांच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटी व शिक्षकांची पतपेढी यांच्याशी जोशी यांचा जवळचा संबंध होता. कोयनेचा भूकंप, पानशेतच्या पुराच्या आपत्तीत मदतकार्य आणि पुनर्वसनात त्यांनी स्वतःला झोकून दिले. "स्व-रूपवर्धिनी'चे ते संस्थापक सदस्य होते. अनेक शिबिरांतून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चित्रकला, ओरिगामी, मूर्तिकामाचे प्रशिक्षण त्यांनी दिले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1520
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया