इट मेक्स सम सेन्स.......आठवण.
शिला मला म्हणाली,
"मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण-शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा."
असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती.
मी म्हणालो,
"शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे."
शिला म्हणाली,
"चव्वेचाळीस वर्षावर माझ्या नवर्याचं काही खरं नाही हे मला आमच्या डॉक्टरांकडून कळलं.रमेश जास्त दिवस काढणार नाही असं ते मला म्हणाले.त्याची दोन्ही फुफुसे कॅन्सरने भरली होती.
"बाळं " म्हणतात ते माझ्या वृद्ध आईला झालं होतं ज्याला, आता आपण अल्झायमर म्हणतो.
मिसळपाव