Skip to main content

कथा

फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी गुरुवार, 23/10/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा.... पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी. अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून. काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते.

"आई मी असं पुन्हा करणार नाही गं!"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 21/10/2008 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
देसायांचा नातू तसा उनाड होता.पण तसा तो वयाने लहान होता.त्यांच्या घरावर एका खोबणीत एका पक्षाने घरटं बांधलं होतं.

वाघनखं (भाग १)

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 21/10/2008 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
"आई गं SS !! हा दुधवालासुद्धा ना! किती जोरानं बडवतोय दार", मी डोळे किलकिले करत दुधाचं भांडं घ्यायला उठणार, एवढ्यात कुणीतरी दार उघडल्याचा आवाज झाला आणि 'हुश्श' करीत मी पुन्हा गादीवर मान टाकली. " अरे कुठे गेल होतास?" ," ठरल्याप्रमाणं आज तिसरा आणि शेवटचा दिवस. उद्यापासून आपली पुन्हा भेट नाही. आज उठल्याबरोबर कपाट उघडायचं, दोन कपडे गोळा करायचे आणि तडक गाव गाठायचं". "आणि हो, एक महत्त्वाचं विसरलोच. वसंतरावांच्या पेटीतली वाघनखं गळ्यात बांधायची आणि मगच घराबाहेर पडायचं, एवढं पक्कं ध्यानात ठेव." "तुला सांगितल्याप्रमाणं दादु गुरव तिथं हिंदळ्यात तुझी केंव्हापासुन वाट बघतोय.

सरकारी नोकर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 20/10/2008 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा सुपरींटेन्डन्ट ऑफ एक्साईझ ह्या प्रमोशनवर मुंबईला जाण्यापुर्वी,अख्या रतनागिरीचे हेड होते.पुर्वी सरकारी नोकरांच्या घरी शिपाई नोकर घरकामाला रहायचे. त्याना घरात आईला मदत करण्या पलिकडे मला आणि माझ्या धाकट्या भावाला संभाळायचं काम पण करावं लागायचं.ब्रिटीश लोकानी ती पद्धत घालून दिली होती. आमचे आजोबा आमच्याकडे रहायचे. एकदा काय झालं,एका शिपायाची बदली झाल्यावर त्याच्या जागी दुसरा शिपाई आला होता.तो जरा पायाने अधू होता.म्हणून अण्णांनी त्याल घरचीच हलकी हलकी कामं करायला घरीच ठेवला होता. तो जरा कायदेबाज होता.

"माझी आई हाच माझा विश्वास."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 20/10/2008 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांच पालन-पोषण करण्यासारखं दुसरं कठीण काम नाही.साध्या भाषेत सांगायचं तर "माझी आई हाच माझा विश्वास." ह्यावेळेला मी कोकणात गणपति उत्सवासाठी गेलो होतो.माझ्या आजोळी गणपति आणतात.बरेच वेळी पाच दिवसाचा असतो. कोकण दर्शन ट्रॅव्हल एजन्सी तर्फे मी फार अगोदर तिकीट काढून ठेवलं होतं.दादरच्या ब्रॉडवे सिनीमा समोर ह्या बसचा स्टॉप होता.सकाळीच उठून जावं लागलं.माझ्या शेजारी एक सदगृहस्थ येऊन बसले.बस चालू झाली तसं आम्ही हॅलो,हाय करून बोलायला लागलो. गणपति उत्सवात कोकणात किती गर्दी करून लोक मजा करायला जातात.सगळे नातेवाईक एकत्र येऊन तो दीड दिवस किंवा ते पाच दिवस कसं गाणं वाजवणं,घरातच छोटे छोटे कार्यक्रम करून आपली क

गेले ते दिवस

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 18/10/2008 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
"रांव रे, आपा येतां साईट दी" (थांब रे,आपा येतोय साईडला रहा) असले उद्दगार १९३८-४५ च्या दरम्यान सावंतवाडी-बेळगांव किंवा वेंगुर्ले-बेळगांव ह्या प्रवास मार्गावर ऐकायला मिळत असत. त्याचं असं झालं,आपांना-माझ्या काकाना- धंद्या मधे जास्त दिलचस्पी होती.आजोबांच्या लक्ष्यांत आल्यावर त्यांनी अण्णांकडे शब्द टाकला.अण्णा म्हणाले मुंबईवरून मी त्यांच्यासाठी एक नवीन बस -प्यासींजर व्हीएकल- विकत घेतो.त्यावेळी साधारण २०० रुपयाना -म्हणजे आताचे ४० हजार रुपये झाले अर्थात त्यावेळी गाड्या इंपोर्ट होत असत म्हणा-विकत घेतली.अण्णाचं लग्न झालं तेव्हां आपा एक वर्ष्याचे होते.आणि त्यांची आई,म्हणजे आमची आजी निर्वतली होती.

आणि सावकार स्वर्गात गेला....

लेखक आगाऊ कार्टा यांनी शनिवार, 18/10/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक सावकार राहत होता. तो सावकार महाधूर्त, महाचतूर आणि मोठा डांबिस होता (पिवळा डांबिस नव्हे). गावातले लोक तसे गरीबच. त्यामुळे ते अडीनडीला सावकाराकडे पैसे मागायला येत असत. सावकार दामदुप्पटीने व्याज आकारुन पैसे देत असे. त्याची हिशेब करण्याची निराळीच तर्‍हा होती. कितिही पैसे दिले तरी सावकाराचे व्याज काही फिटत नसे. काही जणांनी त्याच्यावर पंचायतीत दावा लावून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सावकार सगळ्यांचे बारसे जेवलेला होता. त्याच्या हिशेबाच्या वह्या आणि तो हिशेब पाहून भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येत.

जरा `वजन' ठेवा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 18/10/2008 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
सदू आणि दादू जानी दोस्त. कळायला लागलं, तेव्हापासून एका ग्लासातले. गावातले लोक तर त्यांना ढवळ्या-पवळ्याच म्हणायचे. सदू सातवीपर्यंत शिकला होता, तर दादूनं पहिलीनंतर शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, एवढाच काय तो दोघांमधला फरक. सदू ग्रामपंचायतीत चिकटला, तर दादू मोलमजुरी करून रात्रीच्या दारूची सोय बघू लागला. घरदार वगैरे काही प्रश्न नव्हता; कारण दारूवर पैसे उडवल्यानंतर हाताशी फार काही राहत नव्हतं. सदूची नोकरी बऱ्यापैकी चालली होती. तो आणि त्याच्या चार भिंती, एवढाच संसार. खरं तर चार भिंतीसुद्धा नाहीत. एक ढासळलीच होती. पुढच्या पावसाळ्यात राहील की नाही, याची खात्री नव्हती.

नवजात मुलाबद्दलच्या आईच्या अपेक्षा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 17/10/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज नंदा पेठे आणि तिची मैत्रीण कविता भिडे दोघी तळ्यावर फिरायला आलेल्या दिसल्या.मला पाहिल्यावर नंदा म्हणाली की, " भाऊसाहेबांना आज बरं नसल्याने ते येऊ शकणार नाहित." तसा त्यानी तिच्या जवळ मला निरोप दिला होता. नंदा ही प्रो.देसायांची मधली मुलगी.कविता एका कम्युनीकेशन सेंटरवर काम करते.माझी तिच्याशी ओळख करून दिल्यावर नंदा मला म्हणाली, "कविताला एक लहान मुलगा आहे.ती त्याला आपल्या सासूकडे ठेऊन आली आहे.सहज पाय मोकळे करायला आम्ही तळ्यावर आलो.तुमच्या विषयी हिला भाऊसाहेब नेहमीच सांगत असतात.प्रत्यक्षच तुम्ही दिसला तेव्हा मी तिला म्हणाले मी तुमची ओळख करून देते." मी नंदाला म्हणालो, " तुम्ही दोघं तावातावाने का

भाव (रणजित देसाई यांच्या 'आलेख' या ग्रामीण कथा संग्रहातील कथा)

लेखक mina यांनी शुक्रवार, 17/10/2008 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
येथील लेखन काढून टाकलेले आहे. कृपया हे वाचा व यापुढे सहकार्य करा अशी कळकळीची विनंती... --आणिबाणीचा शासनकर्ता.