खिडकी
"तुम्ही काही काळजी करू नका. दिवसाचा तर प्रवास आहे. पोहोचल्यावर लगेच फ़ोन करतेच मी तुम्हाला."
गाडी सुटता सुटता अनुराधाने पुन्हा एकदा सुभाषला सांगीतले. वेग घेणाऱ्या गाडीबरोबर धावणारा सुभाष तिला आणि सोनुला हात हलवून निरोप घेता घेता दिसेनासा झाला. त्याबरोबर आणखी वेळ न दवडता शेजारी बसलेल्या बाईने लगेच सोनुकडून आपली खिडकीची जागा मागून घेतली. मस्तपैकी मांडी घालून कोपऱ्याला रेलून तिने मासीकात डोके खुपसले.
सोनुने नाराज होऊन आईच्या बाजुची आपल्या जागेवर टेकल्यासारखे केले. त्या लठ्ठ खवीस बाई शेजारी बसण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. जरी खिडकीच्या बाहेरचे तिथून चांगले दिसले असते तरी!
मिसळपाव