(पहिल्या लेखाला आलेल्या भरभरून प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! मला काळजी वाटत होती की माझा पहिलाच लेख संस्थळाच्या कामात नाहीसा होतो की काय :))
....
उन्हाचि शेवटची तिरिप आता गढी च्या पुढील दरवाज्यापाशी होती. मंदा शिरीषच्या निर्जीव कलेवरावर डोक टेकवून धाय मोकलून रडत होती. तिचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. अजिंक्य कसबसा पायतले त्राण गोळा करून इतर सर्वांना म्हणाला "आजची रात्र आपल्याला इथेच काढण्याशिवाय पर्याय नाही. उद्या सकाळपर्यंत आपण तग धरून ठेवला तरच शिरीष चे आपण योग्य ते अंतिम संस्कार करू शकू"
... पुढे
अजिंक्य आणि राधानी पुढचा दरवाजा सुरक्षित करून पहारा द्यायचे ठरवले.