Skip to main content

कथा

समयाकडून मिळणारा दिव्य दिलासा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 15/06/2009 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
वनिता शर्मा माझ्या मुलीची शाळकरी मैत्रीण.कॉलेज संपून नंतर लग्न झाल्यावर ह्या मैत्रीणी आपआपल्या निर्माण केलेल्या जगात संसार करायला निघून गेल्या.पण पृथ्वी गोल आहे आणि जग लहान होत चालंय.परवां तिच्या ह्या मैत्रीणीचा फोन आला.घरी मी एकटाच होतो.माझ्या मुलीची तिने चौकशी केली. कुणीतरी तिला पत्ता आणि फोन नंबर दिला होता.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग 3

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 12/06/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?) आधीचे भाग येथे वाचा भाग एक - http://misalpav.com/node/८१२७ भाग दोन - http://misalpav.com/node/8138 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग २

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 11/06/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग येथे वाचा http://misalpav.com/node/8127 पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस.

वास्तविकता आणि भ्रम

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 11/06/2009 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
" त्या बाईला दुःखाच्या वेदना होत असताना ती रडताना पाहून त्याच क्षणाला माझी धडधडणारी वेदना मला जर नसती तर मी तिच्यासाठी रडले असते का?" सुमतीची परिस्थिती बघून मला कवी सुरेश भट्ट यांची आठवण आली.त्यांच्या पायाला पोलिओ झाला होता.सुरेश भट्टाना त्याबद्दल खूप खंत व्हायची. अगदी लहानपणी शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्यांना उस्फुर्त विषय देऊन बोलायला सांगितलं होतं.

अंत... भाग-३

लेखक दशानन यांनी बुधवार, 10/06/2009 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी फोन बंद केला व गाडी बंद करुन सरळ.. जे होईल ते होईल हा विचार करुन त्या गाडीच्या दिशेने चालू लागलो... दरवाजा उघडा होताच, मी जरासे आत बघण्यासाठी वाकलो तोच एकदम पोटात जोरात कळ आली, माझा हात आपसूकच पोटाकडे गेला तर हाताला काही तरी ओले लागले..... मी ओरडलो... वोह शट... गोळी मारली मला तू.... असे म्हणत मी खाली कोसळलो.... ! मागील भाग... डॉक्टरांनी माझा जिव वाचवला, पण मला गोळी मारणारा तो कोण ?

अमानवी - भाग २

लेखक गोगोल यांनी बुधवार, 10/06/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
(पहिल्या लेखाला आलेल्या भरभरून प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! मला काळजी वाटत होती की माझा पहिलाच लेख संस्थळाच्या कामात नाहीसा होतो की काय :)) .... उन्हाचि शेवटची तिरिप आता गढी च्या पुढील दरवाज्यापाशी होती. मंदा शिरीषच्या निर्जीव कलेवरावर डोक टेकवून धाय मोकलून रडत होती. तिचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. अजिंक्य कसबसा पायतले त्राण गोळा करून इतर सर्वांना म्हणाला "आजची रात्र आपल्याला इथेच काढण्याशिवाय पर्याय नाही. उद्या सकाळपर्यंत आपण तग धरून ठेवला तरच शिरीष चे आपण योग्य ते अंतिम संस्कार करू शकू" ... पुढे अजिंक्य आणि राधानी पुढचा दरवाजा सुरक्षित करून पहारा द्यायचे ठरवले.