बुठ्ठी
माझी ती पहिलीच नोकरी होती. त्यावेळी मी मेडिकल इलेक्टॉनिक्स या क्षेत्रात काम करत होतो. मी ज्या कंपनीत काम करत होतो, ती कंपनी ऑपरेशन थिएटर व आयसीसीयुला लागणारी इलेक्टॉनिक मशिन पुरवायची. माझ काम होत, त्या मशीनची देखभाल करणं व ही मशीन कशी वापरायची त्याच ट्रेनिंग देणं. त्यामुळे हॉस्पिटलशी सतत संपर्क यायचा. असाच एकदा केईएम् मधुन सकाळीच फ़ोन आला, एक ऑपरेशन चालू होणार होतं व त्यांना आमच्या कंपनीनी दिलेल्या "बलुन पंप" या मशिनची गरज लागणार होती. त्यावेळी हे मशिन नुकतच या हॉस्पिटलनी विकत घेतलेल होत. ते कस वापरायच याचं ट्रेनिंग पूर्ण दिलेल नव्हत. त्यामुळे मला हजर राहायला सांगितलं.
मी पोहोचलो तो पर्यंत ऑपरेशन चालू झालेल होत. मी ऑपरेशन थिएटरमधे जात असताना मला एका अति वृद्ध बाईनी बोलावल व माझ्या पायाला हात लाऊन म्हणाली माझ्या मुलाला वाचवा. एका वृद्ध बाईनी पायाला हात लावणं इतक विचित्र वाटल. मी तीला सांगितल की मी डॉक्टर नाही. व आत गेलो.
ऑपरेशन झाल पण पेशंटच ब्लड प्रेशर फ़टाफ़ट उतरतच गेल. त्यावेळी heart lung machine वापरली जायची. ऑपरेशन चालू असताना १२०/६० असलेल ब्लड प्रेशर उतरत गेल. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर ४० च्या खाली गेल. "बलुन पंप" लावण्यात अर्थच नव्हता. डॉक्टरांनी तसा निर्णय घेतला. पेशंट वाचण अशक्य होत. बेडवरच पेशंट माझ्या समोरच गेला. मी ऑपरेशन थिएटरमधे पहिला मृत्यु.
बाहेर नातेवाईकांना ही बातमी सांगीतली गेली व थोड्याच वेळात मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर पडलो. बाहेर रडारड चालू होती आणि पेशंटची वृद्ध आई भिंतीला टेकुन थरथरत उभी होती. तीला रडतासुद्धा येत नव्हत. दोनतीन नातेवाईकांनी फ़क्त हाताला धरलेल होत. आणि तीची सून मोठ्यामोठ्यानी रडत व ओरडत होती.
"ये बुठ्ठी नब्बे सालकी हुई , ये नही मरती. चार बच्चोंको खा गयी है साली. चारो बच्चे हार्ट अॅटॅक आक एमर गये. इस बुठ्ठीको कुछ होता नही है. इसको मरनेको क्या हुआ था ? जा तू मर जा मेरे मरदकॊ वापिस ला."
मी त्या वृद्ध बाईकडे पाहिल, न रडता थरथरत ती बाई उभी होती. काय विचार असतील त्या माऊलीच्या मनात? का मन बधीर झाल असेल ? माझी नजर त्या वृद्धेच्या चेहर्याकडे गेली, ते डोळे ते भाव मी कधीच विसरु शकणार नाही.
वर्गीकरण
शब्द नाहीत प्रतिक्रिया
वाईट वाटल :(
In reply to वाईट वाटल :( by गणपा
हेच म्हणतो.
(विषय दिलेला नाही)
ते डोळे ते भाव मी कधीच विसरु
(विषय दिलेला नाही)
निरंजन काका नेहमीप्रमाणेच
बापरे!! वाचूनही सुन्न झालं,
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by प्रभो
सहमत आहे.
छान स्फूट
In reply to छान स्फूट by प्रदीप
राणी!!!!!
अस बोलणारी माणसे खरच असतात .
पंचींग बॅग्ज असतात म्हातारी
अतिशोक
In reply to अतिशोक by मिसळभोक्ता
सहमत
सुन्न...
कळ आली वाचुन ! ज्यांच्या
कल्पना नाही करवत ...
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !!!!!
म्हातारीबद्दल वाईट