Skip to main content

कथा

बहर गुलमोहराचा

लेखक जयवी यांनी मंगळवार, 01/03/2011 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
ती उठून बाहेर आली. लख्ख उजेडामुळे तिचे डोळे दिपले…….पण मग त्या प्रकाशाचं महत्व कळलं. कित्येक दिवसांपासून ती अंधाराच्या साम्राज्यात वावरत होती. अंधाराच्या लाटांमधे गुदमरत होती. तिने मनातले सगळे काळेकुट्ट विचार झटकले आणि तिला एकदम मोकळं मोकळं वाटलं. कित्येक दिवसांची मनावर जमलेली कानाकोपर्‍यातली जळमटं निघाल्यामुळे तिचं तिलाच उत्साही वाटायला लागलं. किती दिवस साठवून ठेवलं होतं आपण हे सगळं…..!! कोंदटलेल्या मनाला जरा ऊन दाखवल्याबरोबर पुन्हा एकदा सगळं टवटवीत झालं. आजूबाजूचा कचरा साफ केल्यावर परत तीच झळाळी दिसायला लागली आणि नव्याने सगळं सुंदर दिसायला लागलं. नकोच आता तो कोंडमारा…..

बिलोरी आरसा

लेखक sneharani यांनी मंगळवार, 01/03/2011 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी वेळ असाच बसून राहिलोय..! काय करावं? झोपावं म्हंटल तर झोप येत नाही अन् नुसत रिकामं बसूनही वेळ जात नाही. जावं का नदीच्या घाटावर फिरत फिरत...पण सांजकाळी कोणी फिरकत नाही तिकडं! कातरवेळ! तशातही तो एकटाच...सोबतीला स्वत:च मन! बस! आणखीन कशाची गरज होती भुतकाळ जगायला? सुर्याची किरणं कमी कमी होत होती.पाखर परतत होती त्यांच्या घरट्यांकड..! घरट्याकडं परतायची एवढी गडबड? माझ घर...! घर म्हणाव का त्याला? "म्हण ना घर!का ते घर नाही...घरात कोणी नाही म्हणून?

मातेचे स्वप्न

लेखक शुचि यांनी गुरुवार, 24/02/2011 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर फिरता फिरता अ मदर्स ड्रीम नावाची कविता वाचनात आली. त्या कवितेवर आधारीत खालील कथा आहे. या कथेचा मुख्य मतीतार्थ हा आहे की भौतिक जगात जरी आपल्या प्रियतम व्यक्तीपासून ताटातूट झाली तरी शोक टाळावा. आपल्याकरता किंवा पुढे गेलेल्या व्यक्तीकरता, कोणाकरताही, शोक हा वाईटच. ___________________________________________________ उदासवाण्या रात्रीच्या अशाच एका प्रहरी, अर्धवट नीद्रीस्त-अर्धवट जागृत अशा अवस्थेत पडलेल्या एका दु:स्वप्नाने मी अस्वस्थ होऊन, घामाघूम होऊन गेले. काय होते बरे ते स्वप्न?

आगरी भयकथा

लेखक आगरी बाणा यांनी मंगळवार, 22/02/2011 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाल्या त्याचेच तंद्रीन् बिरी वरत बांधावरशी घरा चालला होता. येलेची न् आजुबाजूला काय चाल्ललाय याची त्याला अजाबात जानीव पुन व्हत नव्हती. तवर्यान मंगारशी आवाज आयला... "ये भाल्या! थांब तखरच... मी पुन यतय". मंग ते दोघ पुन सोबतीनुच चालाला लागल... "बिरी दे र" भाल्याचे बरब व्हता तो बोलला... भाल्यान मंग त्याला बिरी दिली... बरबचा "च्याला... ३० नबंर!!!... मी पुन यीच रोजचे ईच वरत..." आखरून तख्रूनच्या बाता मारत दोघा चालत व्हत... तवर्यान..."बिरी दे र" बरबचा परत बोलला... ती पुन संपली... मंग परत त्यान बिरी मांगली... भाल्या आजून पयलीच बिरी वरत होता... त्याला बिरी दिली न भाल्या जरासा टरकलाच...

विहीर - माझ्या मनातील... (भाग दोन - शेवट्चा)

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 14/02/2011 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
----क्रमश.... मी हळूच पारावरून उठलो आणि खोल विहिरीत पाहू लागलो. त्यात असंख्य पिंपळाची पाण, घाण होती, कुठे हळूच काहीतरी हलत होत, आणि बारीकश्या लाटा उसळत होत्या, बऱ्याच पाननिवल्या इकडून तिकड भटकत होत्या, कोळ्यांची खूप जाळी, सगळीकडे पसरली होती, हे सगळ पाहत असताना, एक विचित्र भावना माझा थरकाप उडून गेली, कोणास ठाऊक का पण मला वाटत होत की त्या काळ्या पाण्यातून दोन डोळे माझ्याकडे रोखुण पाहतायत, ----क्रमश.... झटशीर मी मागे हटलो, अंगावर शहारा आला, डोक्याला मुंग्या आल्या, तसाच मागे सरून पुन्हा पारावर येऊन बसलो, थोडा शांत झालो.