Skip to main content

कथा

अवंतिका बाईंची समाजसेवा

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 11/02/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज अवंतिका बाईंची फार म्हणजे फारच लगबग चालू होती . आपला अवजड देह ( शक्यं तितक्यां) चपळाईने हालवतं त्या कामे उरकीत होत्या . सकाळी सकाळी त्यांनी आधी निर्मलाबाईंना नाश्त्याचा मेन्यू सांगितला. रामूला घराची साफ - सफाई नीट करण्याच्या सूचना दिल्या. ही महत्वाची दोन कामे उरकल्या नंतर नाही म्हणले तरी त्यांना थोडासा शीण आला होताच . म्हणून त्यांनी निर्मला बाईंना आलं घालून चहा करायला सांगितला. तेव्हढा चहा घेण्यापुरत्या काय ते त्या जरा सोफ्यावर विसावल्या . नंतर लगेच माळ्याला बागेच्या निगराणी संबंधी सूचना देण्यासाठी स्वतः बंगल्याच्या (चार ) पायर्‍या उतरून बागेत आल्या .

वेज हाक्का नूडल्स

लेखक स्वैर परी यांनी शुक्रवार, 04/02/2011 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. सकाळचा नाश्ता करायला न मिळाल्यामुळे तुम्हाला कडकडून भूक लागली आहे. अशातच तुम्हाला गुप्त खबर मिळते कि तुमच्या हापिसातल्या खानावळवाल्याने (खानावळ हा योग्य शब्द आहे, कँटीन म्हणाव अस थोर पक्षी:चविष्ट काम काही त्या कँटीन वाल्याने केलेले नाहीये ) काही नवीन (?) पदार्थ विकायला सुरुवात केलेली आहे. हर्षाची लहर मनात उठून तुम्ही थेट त्या कँटीनच्या दिशेने चालायला सुरुवात करता. पोटातले कावळे ४ मिनिटांच अंतर १ मिनिटात पार करायला उद्युक्त करतात.

तारका-पुष्प

लेखक मराठे यांनी गुरुवार, 03/02/2011 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव डॉ. सुधा देशपांडे. मी एक वनस्पती शास्त्रज्ञ आहे. मी आज इथे हे लिहून ठेवतेय.. कदाचित कोणालातरी आमची परिस्थिती कळेल.. कदाचित त्यांना आमची दया येईल आणि आमचं दुसर्‍या कुठल्यातरी ग्रहावर पुनर्वसन करतील... अर्थात याची शाश्वती नक्कीच नाही. सत्तावीस वर्ष झाली त्या गोष्टीला... आकाशातून पाउस पडावा तशी पुष्प-वृष्टी होउ लागली होती. सगळा फुलांचा पाउस त्यांनीच पाठवला होता. चिटुकली चंदेरी, सोनेरी रंगांची फुलं... सगळ्या जगभर त्यांची बरसात झाली होती. एकही देश एकही गाव सुटलं नव्हतं.

वनराणी ..५

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 01/02/2011 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
वनराणी..४ आश्रमाच्या पाकगृहात मी अजून प्रवेश नाही केला आहे. वासंतिका ..!! मनू ऋषींच्या अर्धांगिनी, गुरूभार्याच म्हणायला हवं वास्तविक!; त्या पाकगृह सांभाळतात. माझं भोजन पत्रावळीवर वाढून ठेवतात.. मग मी आणि साऊ दोघी भोजन करतो. मुनीवरही आवर्जून विचारपुस करतात माझी. काय कमी आहे इथे? काहीच नाही. मा', बा' तुम्ही दोघे एकदा येऊन बघा.. तुमची शबरी इथे एका ऋषींच्या आश्रमात राहते आहे. रोजचे स्त्रोत्रपठण ऐकते आहे.