Skip to main content

एलियन्स----लघुकथा----जयनीत दीक्षित

एलियन्स----लघुकथा----जयनीत दीक्षित

Published on 31/05/2011 - 16:42 प्रकाशित मुखपृष्ठ
स्पेस क्राफ्ट ३०९ ९८६० २३१ कॉलिंग ब्रेकिंग न्यूज! ब्रेकिंग न्यूज!! आपल्या आकाशगंगे पासून सात लाख प्रकाशवर्ष दूर एका अज्ञात आकाशगंगे मध्ये एक ता-याचा शोध लागला आहे ज्याच्या मंडळातील एका ग्रहा वर जीव सृष्टी आढळून आली आहे . ह्या ग्रहा वर अनेक जीवजन्तूं सोबत एका दोन हात आणि दोन पाय असलेल्या प्रजातीचा वावर आहे. हे एलियन्स विवीध वर्णात विभागलेले असून ह्यांच्यात देश, संस्कृती, भाषा, वर्ग असे अजूनही पोट भेद आढळून आले आहेत. ह्या भेदांच्या अजून अनेक नवीन शब्दांच्या व्याख्या सोबत पाठवत आहोत. ह्या प्रजातीच्या सामजिक प्रणालीत एक छोटा समूह महत्वपूर्ण आहे ज्याला कुटुंब असे म्हणतात. हे कुटुंब एक नर आणि एक मादी आणि त्यांची अपत्ये ह्यांचे मिळून बनलेले असते. ह्या प्रजातीत नर आणि मादीला एका विशिष्ट वया नंतर एकत्र राहण्याची परवानगी दिली जाते त्याला लग्न असे म्हणतात. हे लग्न वेगवेगळ्या देश, संस्कृती, धर्मा प्रमाणे वेगवेगळ्या रीती रीवाजानी होत असते. लग्ना नंतर नर आणि मादी अपत्यांना जन्म देऊ शकतात. हे एलियन्स त्यांच्यातील समानते पेक्षा त्यांच्यातील भेदां वरच खूप प्रेम करतात, आणि ते नष्ट करण्या पेक्षा त्याचा अभिमान बाळगून त्यांचे रक्षण करण्या करता धडपडत असतात म्हणूनच ह्यांचे प्रेम नेहमीच हिंसेच रूप धारण करतं. हा हिंसा हा शब्द आपल्या शब्दकोशात नाही ह्याचा अर्थ प्रजातीतल्या एकाने दूस-या ला इजा करणे वा पूर्णपणे नष्ट करणे. हे आपल्या वर्णा वर फार प्रेम करतात म्हणून दूस-या वर्णाच्या लोकांना नीच समजतात ह्या मुळे ह्याच्या सतत लढाया होत राहतात. हे आपल्या देशावर प्रेम करतात म्हणून त्याचे वर्चस्व वाढवण्यासाठी लढतात. आपआपल्या धर्म अन भाषा ह्याना ते सर्वश्रेष्ठ समजतात आणि त्याच्या अस्मिते साठी सतत लढत असतात. ह्यांच्या मध्ये संपत्ती साठी ही नेहमीच संघर्ष होत असतो. हा संपत्ती हा शब्द आपल्या साठी नवीन आहे संपत्ती म्हणजे ह्यांच्या ग्रहावरची संसाधने. ह्याचे ह्यांनी वाटप करून टाकले आहे त्यालाच हे संपत्ती म्हणतात.हे आपल्या संपत्ती वर प्रेम तर करतातच पण दुस-याच्या संपत्ती वर सुद्धा तितकेच प्रेम करतात, मग त्याला प्राप्त करण्या साठी लढतात. येथील संसाधना वर फार थोड्या लोकांचा अधिकार आहे त्याच्या बळाने ते बाकीच्यां वर ज्यांच्या जवळ संसाधनांचा अभाव आहे त्यांच्या वर नियंत्रण करतात, त्याला सत्ता असे म्हणतात. आणि तरीही हे प्रेम समानता बंधुता हे शब्द नेहमी वापरत असतात ज्याला आम्हीच काय हे लोक ही गंभीरतेने घेत नाही. आजवर च्या आमच्या संशोधना वरून आम्ही ह्या निष्कर्षा वर पोहचलो आहोत की ह्या प्रजाती शी संबध ठेवणे आपल्याला हानिकारक आहे. जर ह्यांच्या हिंसा, द्वेष, संपत्ती, अधिकार, भेदभाव इत्यादी विषाणुचे संक्रमण आपल्या प्रजातीत झाल्यास ते आपल्या अस्तित्वा साठी फार घातक ठरेल. आम्ही ह्यांच्या पासून सुरक्षित अंतर ठेऊन आहोत, परत फिरण्याच्या अनुमती ची वाट बघत आहोत.

याद्या 2353
प्रतिक्रिया 10

अतिलघुकथा कल्पना आवडली पण ती परिच्छेद वगैरे पाडून लिहिली असती तर वाचताना सोपे गेले असते असे वाटले, प्ण काही हरकत नाही अशीच स्टाईल असेल तर असुदे आम्ही समजून घेऊ पण इथे काही लोक भेटतील ते मात्र अशा फाल्तु सूचना उपसूचना करत राहतील पण तुम्ही मनावर घेऊ नका लिहित राहा आम्ही वाचत राहू...अतिलघुकथा कल्पना आवडली पण ती परिच्छेद वगैरे पाडून लिहिली असती तर वाचताना सोपे गेले असते असे वाटले, प्ण काही हरकत नाही अशीच स्टाईल असेल तर असुदे आम्ही समजून घेऊ पण इथे काही लोक भेटतील ते मात्र अशा फाल्तु सूचना उपसूचना करत राहतील पण तुम्ही मनावर घेऊ नका लिहित राहा आम्ही वाचत राहू...अतिलघुकथा कल्पना आवडली पण ती परिच्छेद वगैरे पाडून लिहिली असती तर वाचताना सोपे गेले असते असे वाटले, प्ण काही हरकत नाही अशीच स्टाईल असेल तर असुदे आम्ही समजून घेऊ पण इथे काही लोक भेटतील ते मात्र अशा फाल्तु सूचना उपसूचना करत राहतील पण तुम्ही मनावर घेऊ नका लिहित राहा आम्ही वाचत राहू...अतिलघुकथा कल्पना आवडली पण ती परिच्छेद वगैरे पाडून लिहिली असती तर वाचताना सोपे गेले असते असे वाटले, प्ण काही हरकत नाही अशीच स्टाईल असेल तर असुदे आम्ही समजून घेऊ पण इथे काही लोक भेटतील ते मात्र अशा फाल्तु सूचना उपसूचना करत राहतील पण तुम्ही मनावर घेऊ नका लिहित राहा आम्ही वाचत राहू...अतिलघुकथा कल्पना आवडली पण ती परिच्छेद वगैरे पाडून लिहिली असती तर वाचताना सोपे गेले असते असे वाटले, प्ण काही हरकत नाही अशीच स्टाईल असेल तर असुदे आम्ही समजून घेऊ पण इथे काही लोक भेटतील ते मात्र अशा फाल्तु सूचना उपसूचना करत राहतील पण तुम्ही मनावर घेऊ नका लिहित राहा आम्ही वाचत राहू...अतिलघुकथा कल्पना आवडली पण ती परिच्छेद वगैरे पाडून लिहिली असती तर वाचताना सोपे गेले असते असे वाटले, प्ण काही हरकत नाही अशीच स्टाईल असेल तर असुदे आम्ही समजून घेऊ पण इथे काही लोक भेटतील ते मात्र अशा फाल्तु सूचना उपसूचना करत राहतील पण तुम्ही मनावर घेऊ नका लिहित राहा आम्ही वाचत राहू...

In reply to by रेवती

रेवती आपले म्हणणे बरोबर आहे पण ज्या गुणदोषां बद्दल लिहिलेय तो विषय कधी न संपणारा आहे आणि त्यापासून मी सुद्धा कुठे मुक्त आहे? अर्थात वेगवेगळ्या पद्धती विषय मांडण्याच्या असतात, मी नेहमी नाटकाच्या फॉर्म मध्ये लिहितो ह्या विषया साठी मला लघुकथा हा फॉर्म ठीक वाटला. आपल्या सूचनेबद्दल आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

माफ करा, पण पुणेकर असल्याने ही अतिलघुकथा वाचून मला काही प्रश्न पडले आहेतः १) हिंसा हा शब्द तुमच्या शब्दकोषात नाही तर तुम्हाला धर्म, भाषा आणि अस्मिता हे शब्द कसे काय परिचित आहेत? २) हिंसा माहिती नाही तर तुम्हाला 'लढणे' हा शब्द कसा काय माहित? ३)संपत्ति हा शब्द तुम्हाला नवीन असेल तर प्राप्त, अभाव आणि वाटप हे शब्द तुम्हाला कसे काय परिचित आहेत? ४) >> ... आणि तरीही हे प्रेम समानता बंधुता हे शब्द नेहमी वापरत असतात ज्याला आम्हीच काय हे लोक ही गंभीरतेने घेत नाही. -- मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे ? ..... एकूणात काय उगाचच आपला वांग्मयविस्तार (वांग्मय हा शब्द इथे शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे लिहीता येत नाहीये)

माफ करा, पण पुणेकर असल्याने ही अतिलघुकथा वाचून मला काही प्रश्न पडले आहेतः १) हिंसा हा शब्द तुमच्या शब्दकोषात नाही तर तुम्हाला धर्म, भाषा आणि अस्मिता हे शब्द कसे काय परिचित आहेत? २) हिंसा माहिती नाही तर तुम्हाला 'लढणे' हा शब्द कसा काय माहित? ३)संपत्ति हा शब्द तुम्हाला नवीन असेल तर प्राप्त, अभाव आणि वाटप हे शब्द तुम्हाला कसे काय परिचित आहेत? ४) >> ... आणि तरीही हे प्रेम समानता बंधुता हे शब्द नेहमी वापरत असतात ज्याला आम्हीच काय हे लोक ही गंभीरतेने घेत नाही. -- मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे ? ..... एकूणात काय उगाचच आपला वांग्मयविस्तार (वांग्मय हा शब्द इथे शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे लिहीता येत नाहीये)

In reply to by sagarparadkar

आपल्या प्रतिक्रिये बद्दल मना पासून धन्यवाद. येस सर! तुमचं म्हणणे अगदी बरोबर आहे. ह्या साठी मी एक परिशिष्ट सोबत जोडणार होतो मूळ प्रतीत ते जोडलेच होते. त्यात वर्ण देश इत्यादी शब्दांचे अर्थ टाकणार होतो, उदा. देश म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात राहणारा समूह, वर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात राहिल्याने कातडी च्या रंगातील असलेले बदल (जे दूस-या वातावरणात राहूनही जायला काही हजार वर्षे लागतात) संस्कृती आणि लढण्याची पण वेगळी व्याख्या केली होती. आपला आक्षेप अगदी खरा आहे पण ते सर्व करायचे मुद्दाम टाळले आहे कारण हा एका बाजूने होणारे रिपोर्टिंग आहे, त्यावर दोन्ही बाजूने होणारे पूर्ण संभाषण नाही, आणि जे ही काही तथाकथित स्पेस क्राफ्ट आणि त्यातील लोकांनी काही काळ केलेल्या संशोधना नंतर त्यानी त्यांच्यातील अन आपल्यातील फरक समजून घेतल्यावर केलेले रिपोर्टिंग आहे, त्यानी त्या फरकाच्या काही व्याख्या केल्या असणारच. आणि काही काळ आपण एका विशिष्ट परिस्थितीत राहिल्या वर आपल्या समजुतीत आणि भाषेत बदल होतोच. गुलामी आज आपल्यात अस्तित्वात नसली तरीही आपल्याला इतिहासा द्वारे माहित आहेच आणि जात ही गोष्ट भारता बाहेरच्या लोकांना अकल्पनीय असली तरीही थोडं फार समजावल्यावर कळतेच. मी आधीच म्हटल्या प्रमाणे आपला आक्षेप अगदी चुकीचा नाही पण अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ जर तिथे दिला असता तर ते थोडे जडजम्बाळ झाले असते म्हणून मुद्दाम टाळले आहे. आणि आपला शोध घेणारे एलियन्स म्हणजे आपलाच भविष्य काळ असे समजून मी लिहिले आहे जेव्हा आपल्यात ह्या सगळ्या गोष्टी असणार नाहीत.तेव्हाचे जग आजच्या पेक्षा जास्त सुंदर असेल. आपल्या प्रतिसादा साठी आणि आक्षेपा साठी ही पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

In reply to by sagarparadkar

आपल्या प्रतिक्रिये बद्दल मना पासून धन्यवाद. येस सर! तुमचं म्हणणे अगदी बरोबर आहे. ह्या साठी मी एक परिशिष्ट सोबत जोडणार होतो मूळ प्रतीत ते जोडलेच होते. उदा. देश म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात राहणारा समूह, वर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात राहिल्याने कातडी च्या रंगातील असलेले बदल (जे दूस-या वातावरणात राहूनही जायला काही हजार वर्षे लागतात) संस्कृती आणि लढण्याची पण वेगळी व्याख्या केली होती. आपला आक्षेप अगदी खरा आहे पण ते सर्व करायचे मुद्दाम टाळले आहे कारण हे एका बाजूने होणारे रिपोर्टिंग आहे, त्यावर दोन्ही बाजूने होणारे पूर्ण संभाषण नाही, आणि जे ही काही तथाकथित स्पेस क्राफ्ट आणि त्यातील लोकांनी काही काळ केलेल्या संशोधना नंतर त्यानी त्यांच्यातील अन आपल्यातील फरक समजून घेतल्यावर केलेले रिपोर्टिंग आहे, त्यानी त्या फरकाच्या काही व्याख्या केल्या असणारच. आणि काही काळ आपण एका विशिष्ट परिस्थितीत राहिल्या वर आपल्या समजुतीत आणि भाषेत बदल होतोच. गुलामी आज आपल्यात अस्तित्वात नसली तरीही आपल्याला इतिहासा द्वारे माहित आहेच आणि जात ही गोष्ट भारता बाहेरच्या लोकांना अकल्पनीय असली तरीही थोडं फार समजावल्यावर कळतेच. मी आधीच म्हटल्या प्रमाणे आपला आक्षेप अगदी चुकीचा नाही पण अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ जर तिथे दिला असता तर ते थोडे जडजम्बाळ झाले असते म्हणून मुद्दाम टाळले आहे. आणि आपला शोध घेणारे एलियन्स म्हणजे आपलाच भविष्य काळ असे समजून मी लिहिले आहे जेव्हा आपल्यात ह्या सगळ्या गोष्टी असणार नाहीत.तेव्हाचे जग आजच्या पेक्षा जास्त सुंदर असेल. आपल्या प्रतिसादा साठी आणि आक्षेपा साठी ही पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

धन्यवाद सागर. आणी प्रेम समानता आणी बन्धुता हे शब्द आम्हिच काय हे लोक ही गम्भिर तेने घेत नाही ह्यात ले आम्ही म्हणजे फक्त स्पेस क्राफ्ट वर चे एलियन्स इथे आपण म्हणजे त्या दुस-या प्रजतीचे सर्व एलियन्स असा नाही.