Skip to main content

कथा

ब्राऊ...५

लेखक गवि यांनी मंगळवार, 26/07/2011 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
3

स्वप्नातला राजकुमार

लेखक जयनीत यांनी मंगळवार, 26/07/2011 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाचा वाढदिवस होऊन तीन दिवस झाले होते. तरीही अजूनही फोन वरचे मेसेजेस आणि फेसबुक वरच्या कॉम्प्लीमेंटस आणि त्याची उत्तरे ह्यातून पूर्णपणे सुटका अजूनही व्हायची होती. तेच, तेच मेसेजेस अन तीच, तीच उत्तरं! एकच साच्यातून काढल्यासारखी. कधी कधी कंटाळा येतो ह्या सगळ्याचा. असो कितीही कन्टाळवाणं आणि औपचारिक असलं तरीही आपण ही करतोच की अगदी असंच, वाईट दिसू नये म्हणून हेच मेसेजेस कट, कॉपी, पेस्ट करून पाठवतोच की असल्या ओकेजन्सला लोकं ही तेच करतात. औपचारिकच सगळं ह्यात कोण किती मनापासून करतं हे मात्रं शोधत बसायचं नाही. अन हे फोनबुक आणि फेसबुक किती भरलंय? नाव आणि नंबर्स ची गर्दी नुसती!

विश्वासाचं सार्थक

लेखक प्रास यांनी सोमवार, 25/07/2011 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी कोण, काय करतो, माझ्या कामाचं स्वरुप काय, अशा प्रश्नांना खरंच काही अर्थ नसतो. कुणीही, कोणत्याही व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त खोलात शिरून माहिती जाणून घेऊ इच्छित नाही. कारण प्रत्येकालाच तशी हौस नसते. एरवीही आपलं स्वतःच व्यक्तीगत जीवन घड्याळाच्या काट्यानुसार चालवायची सवय लागलेला माणूस कशाला कुणाच्या फालतू चौकशा करत बसेल? त्याला त्याच्या आयुष्यातल्या चिंता सतावत असताना इतर अनोळखी माणसांच्या दु:खाश्रुंना वाट काढून देण्यासाठी स्वतःचा खांदा देण्याची मनोवृत्ती आजकाल कुणी दाखवत नाही.