Skip to main content

कथा

वरदान (कथा)

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 29/06/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रम्हदेव अतिशय प्रसन्न होते , कुणाला तरी वर दिल्या शिवाय त्यांना चैन पडेनासे झाले. पण गेल्या कित्येक शतकात हिमालयावर तपश्चर्या करण्याची फॅशन लयाला गेली होती. जेव्हा प्रसन्नता अगदीच अनावर झाली तेव्हा ब्रम्हदेव अप्सरे कडे निरोप ठेऊन त्वरीत पृथ्वीतलावर अवतरले . तिथे सतराशे साठ विघ्ने पार पाडून राम गणेश गडक-यांच्या ठकीचे लग्न अखेरीस जुळले होते. वरातीतील बॅन्ड बाजाचे सूर ऐकून ब्रम्हदेव अजूनच प्रसन्न झाले.

बळी........

लेखक निशदे यांनी गुरुवार, 28/06/2012 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले....... === == = == === तशी मला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. शेजारीच राहायची आमच्या. शेजार्‍यांच्या दारात त्यांनी पाळलेल्या कोंबडीच्या लहान लहान पिलांबरोबर खेळायची, त्या पिलांना दाणे भरवायची. तेव्हाच माझ्या मनात हे असले विचार येऊ लागले होते.

होस्टेलमधील पहिला दिवस.

लेखक जोयबोय यांनी सोमवार, 25/06/2012 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
सदर गोष्ट आहे दहा वर्षापुर्वीची. त्यावेळी मी नुकताच डिप्लोमाच्या दुसर्या वर्षात प्रवेश घेतला होता. पहिले वर्ष मी मित्राच्या खोलीवर रहायला होतो. यावेळी मी होस्टेल्मधे राहायला लागलो. तसा होस्टेलला भीतभीत प्रवेश घेतला. कारणही तसेच होते. कॉलेज शहरापासुन थोडे लांब होते. मनुष्यवस्तीही खुप तुरळक होती. होस्टेल ज्या जागेवर बांधलेले होते तीथे पुर्वी मेलेली मानसांना पुरण्यात येत असे. इमारत बांधत असताना किमान २ सांगाडे सापडले होते. तसा भुताखेतांवर माझा विश्वास नव्हता पन होस्टेलमधील काही मुलांना विचीत्र अनुभव आले होते. त्यातले दोघे माझ्याच वर्गातले.

शेरास सव्वा शेर

लेखक जोयबोय यांनी शनिवार, 23/06/2012 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका सत्याघट्नेवर आधारीत एका गावत गावकर्यांनी महराज श्रीश्रीश्री बाबांचे सत्संग आयोजित करायचे ठरवले. गावकर्यांच्या विनंतीवरुन १० दिवस सत्संगाचे आयोजन केले. त्या सत्संगाला एक सुट्बूट घातलेला भक्त नियमीतपणे हजेरी लावत होता. तो रोज आपल्या मर्सीडीज गाडीने येत असे आणि भक्तीभावाने बाबांची प्रवचने ऐकत असे. सत्संगाच्या शेवटच्या काही दिवसात त्याने एका चेल्याला बाबांना भेट्न्याची इछ्छा व्यक्त केली. चेल्याने थोदे आढेवेढे घेतले.

प्रार्थना

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 22/06/2012 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
जसे जसे बाबांचे गाव जवळ येत होते तशी येणा-या प्रत्येक स्टेशनवर गाडीतली भक्तांची गर्दी वाढतच होती. छातीला लटकणारे बिल्ले, गळ्यातले गमछे, खांद्यावरील बाबांच्या नाव लिहिलेल्या थैल्या, हातातील पोथ्या ह्यावरून बाबांचे भक्त चटकन ओळखू येत होते. डब्यात आता त्यांचीच संख्या जास्त झाली होती. " किती डॉक्टरांना दाखवलं, कोणत्याही उपचारांचा, कुठल्याही औषधांचा परिणाम झाला नाही, नुसता पाण्यासारखा पैसा खर्च झाला, मात्र फायदा काहीच झाला नाही, किती प्रार्थना केली, किती देवांना नवस बोललो असेल, त्याची गणतीच नाही. काहीही फायदा झाला नाही, सगळीकडून निराशाच हाताला लागली, काय करावं कळेनासं झालंय, त्रास बघवत नाही हो!

रत्नहार...........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 20/06/2012 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नहार............. अबोली साने म्हणजे नाजूक सौंदर्याचा एक सर्वोत्तम नमूनाच. नासीफ, चंका, कालिदासांच्याही प्रतिभा कमी पडावी असे तिचे सौंदर्य मग आम्ही कुठे पडावे त्या भानगडीत.. पण म्हणतात ना देवाच्या दरबारात न्यायच नाही. ही नाजूक मुलगी ऐश्वर्यात लोळायची सोडून एका कारकूनाच्या पोटी जन्माला आली आणि आमच्या या नायिकेनेही बापाच्या आर्थिक परिस्थितीकडे बघून एका डिप्लोमा होल्डरच्या गळ्यात माळ घातली. नाहीतरी लग्नाच्या बाजारात तुमच्या आर्थिक परिस्थितीला फारच महत्व असते. तर अबोलीचा नवरा एका मोठ्या कंपनीत शिफ्ट सुपरवायझर म्हणून कामाला होता.

एलियन आणि प्रॉमिथियसच्या निमित्ताने ...

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 13/06/2012 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बघणं हा कधीकधी त्या चित्रपटापेक्षा त्याच्या कथादुनियेत रमवणारा एक अनोखा अनुभव असू शकतो. म्हणजे ज्या इहलोकात तो घडतो, ज्या जगाचे परिमाण त्या चित्रपटाशी आणि त्याच्या पटकथेशी निगडीत असतात तेच कित्येकदा आपणास अत्यंत समाधानकारक अनुभव देऊन जाऊ शकतात. सायन्स फिक्शनचे काल्पनिक जग हे एका कलाविष्कारापुरताही सीमित असू शकते जसे "वॉर ऑफ द वर्ल्ड"चे जग; म्हणजे आधी कॉमिक्स आणि नंतर स्टिवन स्पीलबर्गने टॉम क्रुसला घेऊन बनवलेल्या चित्रपटात दाखवले गेलेले.