Skip to main content

कथा

एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 19/04/2014 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही. स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले.

येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - २ (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 19/04/2014 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
येल्लागीरीच्या टेकड्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आहेत. दक्षिण रेल्वेच्या जालारपेट जंक्शनपासून दोन मैल अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूटांवर या टेकड्या जमिनीतून झाड उगवावं तशा उभ्या आहेत. जालारपेट स्टेशनपासून एक पायवाट येल्लागीरीच्या माथ्यावर जाते. काही ठिकाणी घनदाट जंगल तर काही ठिकाणी सरळसोट कातळांवरुन चढत जाणारी ही वाट वाटसरुची कसोटी पाहणारी आहे. आणि जोडीला नरभक्षक झालेला बिबट्या, मग तर काय विचारायलाच नको ! १९४१ सालच्या सुमाराला मी येल्लागीरीला जमिनीचा एक छोटासा तुकडा विकत घेतला होता.

व्यवहारज्ञान

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 18/04/2014 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज जेन आत्याचा गोष्टी सांगण्याचा चांगलाच उत्साह दिसत होता. तिच्या असंख्य भाचे, पुतण्यांपैकी रेमंड हा तिचा सर्वात लाडका होता. का ते तसं सांगता येणार नाही. पण बहुदा दोघांचा आवडीचा विषय समान असल्यामुळे असेल... मनुष्यस्वभाव, सवयी आणि वर्तणूक हा मिस जेन मार्पलचा आवडीचा विषय . म्हणजे त्यात तिने कॉलेज मध्ये जाऊन कुठली पदवी संपादन केली नव्हती, परंतु जीवनाच्या विशाल शाळेमध्येच ती सारं काही प्रत्यक्ष अनुभवातून शिकली होती. आणि रेमंड हा एक लेखक होता. मिस जेन मार्पल च्या मते त्याचे कथाविषय असलेली माणसे काहीशी वेगळीच असत, म्हणजे तिच्या जुन्या पुराण्या व्हिक्टोरियन जगामध्ये सामावली न जाणारी अशी.

येल्लगिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - १

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 18/04/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतातलं घनदाट अरण्यं होतं ते. दुपार कललेली होती. सकाळभर खाण्याच्या शोधात भटकणारे पक्षी आणि जनावरं सावलीला विसावली होती. असह्य उन्हाच्या तलखी मुळे डेरेदार वृक्षाच्या सावलीतही जीव नकोसा होत होता. वाराही साफ पडला होता. गवताची काडी देखील हलत नव्हती. जंगल अगदी शांत होतं. या शांततेचा भंग होत होता तो जंगलात चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांच्या आवाजाने. गुरांच्या गळ्यात घंटा बांधण्यामागे दोन उद्देश होते. एक म्हणजे आपली गुरं कुठे आहेत हे गुराख्याला कळावं आणि दुसरं म्हणजे वाघ-चित्त्यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून गुरांचं संरक्षण व्हावं.

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ५ ( अंतिम )

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 16/04/2014 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १ http://misalpav.com/node/27564 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - २ http://www.misalpav.com/node/27574 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३ http://www.misalpav.com/node/27582 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ४ http://misalpav.com/node/27588 **************************************** एस्केप फ्रॉम डाऊन अंडर ही लेखमाला आज संपली.

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ४

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 15/04/2014 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
टँगची पुढची टॉर्पेडो रूम अर्धवर्तुळाकार होती. नौसेनीक मॉमसेन लंग्ज चढवत असतानाच पॉल लार्सन आपल्या जखमी सहका-यांवर उपचार करण्यात मग्न होता. सुदैवाने टॉर्पेडो रुममध्ये त्याला जास्तीचं मेडीकल किट सापडलं होतं. पाणबुडीतील हवा झपाट्याने दुषीत होत होती. दृष्यमानताही काही फूट अंतरापर्यंतच उरली होती. बॅट-यांमध्ये हळूहळू पाणी झिरपू लागलं होतं. इमर्जन्सी दिवेही मध्येच बंद पडू लागले होते. लेफ्टनंट मेल एनॉसच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना चमकली. कंट्रोल रूममध्ये पाणबुडीच्या तोफेकडे जाणारी हॅच उघडता आली तर बाहेर पडणं शक्यं होतं.

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 14/04/2014 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
टँगमधून निघालेला शेवटचा चोवीसावा टॉर्पेडॉ परत फिरला होता आणि आता भस्मासुराप्रमाणे टँगच्याच दिशेने झेपावत होता ! काहीतरी भयानक घोटाळा झाला होता. टॉर्पेडोचं रडार जाम झालं असावं किंवा त्याच्या दिशादर्शक यंत्रणेत असलेला गायरोस्कोप बिघडला असावा. काहीही असलं तरी त्याच्या तडाख्यातून पाणबुडी वाचवणं हे आद्य कर्तव्य होतं ! " इमर्जन्सी स्पीड !" ओ'केनने आज्ञा सोडली, " ऑल अहेड इमर्जन्सी ! राईट फुल रडार ! पाणबुडी वळवा ! पूर्ण वळवा !" इंजीनरुम मध्ये चीफ इलेक्ट्रीशियन जेम्स कल्प पाणबुडी वळ्वण्यासाठी लागणारी आवश्यक विद्युत शक्ती पुरवण्याचा आकांती प्रयत्न करु लागला !

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - २

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 13/04/2014 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
" ऑल बॅक टू थर्ड !" " लेफ्ट ट्वेंटी डीग्री रडार. ऑल अहेड टू थर्ड. शिफ्ट द रडार !" पर्ल हार्बरपासून निघाल्यावर तीन दिवस उलटून गेले होते. पूर्वेच्या दिशेने असणा-या अरुंद खाडीत टँग शिरली होती. मात्रं या खाडीच्या चिंचोळ्या पट्ट्यातून मार्ग काढताना ती खाडीच्या दोन्ही टोकांकडे पाळीपाळीने ढकलली जात होती. मोठ्या मुष्कीलीने किना-यावर किंवा खाडीतील प्रवाळ खडकांना धडकण्याचं टाळून अखेर चौथ्या दिवशी सकाळी सातच्या सुमाराला टँग मिडवे बेटावर विसावली.

थोडं समजून घ्या ना... भाग ३

लेखक वडापाव यांनी शनिवार, 12/04/2014 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं समजून घ्या ना... भाग १ थोडं समजून घ्या ना... भाग २ 'आयला धमाल!! मग?' 'मग काय!! फाटली ना माझी...' कट्ट्यावर माझं कथाकथनसत्र चालू होतं. चार दिवस कॉलेजला बुट्टी मारल्यानंतर आणि त्यापाठोपाठ आलेल्या वीकांतात सुखाचा अत्यानंद मिळवल्यानंतर मी एकदाचा सोमवारी कॉलेजला गेलो. कट्ट्यावर ग्रुप आधीच जमा झालेला दिसला. मी तिथे पोचल्यावर मैत्रीणींकडून प्रश्नांची आणि मित्रांकडून शिव्यांची सरबत्ती सुरू झाली.

एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 12/04/2014 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
दूर अंतरावर दिसणा-या जपानी फ्राईटर्स पाहून टँगचा कमांडर रिचर्ड 'डिक' ओ'केन समाधानाने हसला. शिकार ! ओ'केनने आपल्यासमोरचा लाऊडस्पीकर ऑन केला. पाणबुडीत सर्वत्र पसरलेल्या त्याच्या सैनीकांना त्याच्या सूचना स्पष्टपणे ऐकू जाणार होत्या. ओ'केन पासून काही अंतरावरच एकवीस वर्षांचा फ्लॉईड 'फ्रायर ट्रक' कॅव्हर्ली कानाला हेडसेट लावून जहाजांचे येणारे आवाज टिपत होता. आपल्या इतर अधिका-यांसह ओ'केन कोनींग टॉवरच्या छोट्याशा जागेत उभा होता. " वेगात कोणताही बदल नाही कॅप्टन !" कॅव्हर्लीने ओ'केनला सांगीतलं. " पुढच्या बाजूची बाहेरील दारे उघडा. स्टँड बाय् फॉर फायनल बेअरींग.