तटबंदी
पुढे त्यांच्या कामाला निघालेल्या बाबांनी चिन्मयला त्याच्या कंपनीच्या गेटपाशी सोडलं. आज सकाळीच त्याची गाडी दोन दिवसांसाठी सर्व्हिसिंगला दिलेली असल्याने त्याने बाबांना राईड मागितली होती.
"संध्याकाळी किती वाजता pick up करू?" बाबांनी विचारलं.
"सव्वा सहापर्यंत आलात तरी चालेल"
"मग असं करतो, आईला बिग बझार मध्ये जायचंय, मी घरी जाऊन तिला घेऊन साडेसहा पर्यंत इथे येतो, आपण तिघेही मग पुढे जाऊयात, चालेल तुला?"
"हो, चालेल." म्हणत चिन्मय उतरला. तो दिसल्यावर शेजारच्याच कॅफे कॉफी डे च्या बाहेरच्या बाजूने बसलेल्या तरुण मुला-मुलींच्या ग्रूपने त्याला हातांनी 'हाय' केलं ,आणि त्यांतली काही मंडळी उठून उभी राहिली.
"तुमचा ग्रूप का?" बाबांनी विचारलं.
"हो, ही सगळी माझी टीम."
'टीम लीड' असलेल्या आणि "माझी टीम' म्हणणाऱ्या गोऱ्या, उंच चिन्मय कडे बाबांनी अभिमानाने पाहिलं, चिन्मय त्याच्या सहकाऱ्यांकडे चालत गेला तशी बाबांनी गाडी रस्त्याकडे वळवली. तशात ग्रुपमधल्या अद्याप कॉफी संपवत बसून असलेल्यांपैकी एका अप्रतिम सुंदर मुलीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं, नक्कीच worthy of a second look अशी होती. बाबांनी ट्रॅफिककडे पहात गाडी पुढे घेतली.
संध्याकाळी आई-बाबा दोघेही आले तेंव्हा चिन्मयचा ग्रूप त्याच्या सोबतीसाठी थांबलेला होता. सकाळची मुलगी तिच्या Nanoच्या driving seat मध्ये बसलेली होती, आणि इतर सर्व जण आसपास बोलत उभे होते. चिन्मय आई-बाबांच्या गाडीकडे आला तसे सर्व जण आपापल्या वाहनांच्या दिशेने निघाले.
बाबांनी आईला त्या मुलीविषयी सांगितलं असणार, कारण आई म्हणाली, "चिन्मय, ती गाडीतली मुलगी कोण रे? सुंदर आहे!"
"सुंदर आहे ना? मी तिला म्हंटलं, तू राजा रविवर्म्याच्या चित्रातल्यासारखी दिसतेस म्हणून!" चिन्मय मिष्कील हसत म्हणाला.
बाबांनी चमकून त्याच्याकडे आणि मग आईकडे पाहिलं, "तिला म्हणालास? आईसाहेब, युवराजांचा बुरूज ढासळायला लागलेला दिसतोय! सगळी तटबंदी नावाचीच! म्हणे सून तुम्हीच शोधायची! सून जर आम्ही शोधायची तर सुंदर मुलींकडे पाहतोस कशाला रे?"
"अरे वा! पहायला काय हरकत आहे? कोणी डाएटवर असेल म्हणून मेन्यू पहायला थोडीच बंदी असते? आणि बुरूज वगैरे काही ढासळत नाहीये, कुणात काही चांगलं दिसलं की जरूर कौतुक करावं असं तुम्हीच शिकवलंय ना? आणि शिवाय ते 'सत्यं वदेत प्रियं वदेत' वगैरे…"
"गप रे, शहाण्या!" आई म्हणाली, "'प्रियं वदेत' म्हणे! अरे पण तिला आवडलं का तू तसं म्हंटलेलं? "
"नावडल्याचं काही म्हणाली नाही, म्हणजे आवडलं असावं!" पुन्हा मिश्कील हसत चिन्मय म्हणाला.
"अरे, पण खरंच खूप सुंदर आहे मुलगी" आई म्हणाली.
"अगं हो, पण beauty is just skin deep, हो ना?"
"असू दे! नाव नाही सांगितलंस तिचं?"
"पद्मिनी."
"पद्मिनी?" बाबांनी विचारलं, "अरे किती जुनं नाव आहे!"
"जुनं?"
"अरे मग? एकदम डोळ्यांपुढे राणी पद्मिनी किंवा फारतर राजकपूरच्या सिनेमातली पद्मिनी उभी रहाते! तुझ्या वयाच्या मुलींमध्ये हे नाव कधी ऐकलं नाहीये."
"असू देत हो, आडनाव काय रे?"
"रांझणे."
"रांझणे? म्हणजे कोण रे?" बाबांनी विचारलं.
चिन्मय मोठ्याने हसला. बाबांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं.
"बाबा, मला तुम्ही सांगितलेला २० वर्षांपूर्वीचा अमेरिकेतला अनुभव आठवला, एका गोऱ्याने तुमच्या brown skin कडे पाहून तुम्हाला "What are you?" विचारल्यावर तुम्ही "What if I say a human being?" असं उत्तर दिलं होतंत, तसंच उत्तर द्यावंसं वाटलं मला. Watch out, बाबा, your prejudices are showing! आणि तुम्हीच आजीला सांगायचात ना, की 'नावावरून जात, धर्म वगैरे शोधण्याच्या फ़ंदात पडू नाही, शोधायचंच झालं तर स्वभावात माणूसकी शोधावी' म्हणून?"
बाबा हसले, "Yes Sir! You're right! मेरा अंमळ चुक्याच!"
"आणि आपल्या ऐकिवात असलेलीच नावं अस्तित्वात असतात असंही नाही ना?"
"घ्या! तुमच्याच बुरुजाला खिंडारं पडताहेत!" आई हसत म्हणाली, "आणि ए, मला काही प्रेज्युडिस वगैरे नाहीये हं," आई म्हणाली, "पुढच्या वेळी ओळख करून दे बरं का!"
"तिचीच? का सर्वांची?"
"सर्वांची दे रे, शहाण्या! पण मला तिच्याशी बोलण्यातच स्वारस्य आहे. मराठी बोलते ना?"
"हो ती मराठीच बोलते, आई-वडिल साताऱ्याचे आहेत, दोघांची कसलीतरी mechanical parts factory आहे तिथे. तुम्ही खुशाल ओळख करून घ्या तिच्याशी, but behave yourselves and speak to all, I don't want to start any unnecessary rumours!" चिन्मयने खडसावून सांगितलं.
दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी आई-बाबा दोघेही गाडी घेऊन चिन्मयला घ्यायला आले. कालच्या सारखाच त्याचा ग्रूप पद्मिनीच्या गाडीच्या आसपास घोळका करून उभा होता, आणि ती driving seat मध्ये बसलेली होती. आई-बाबा गाडीतून उतरल्यावर चिन्मय आणि त्याचा ग्रूप त्यांच्या दिशेने चालत यायला लागला. चिन्मय आई-बाबांजवळ पोहोचला. पद्मिनीनेही गाडीचं दार उघडलं, आणि सुरेख मोरपिशी चुडीदारमधला उजवा पाय रस्त्यावर टेकला. आई-बाबा पुढे झाले तशी ती डावीकडे गाडीत वाकली आणि मग दोन्ही हात बाहेर काढून तिने हातांतल्या कुबड्या जमिनीवर टेकवल्या आणि ती खाली उतरली. डाव्या पायातला चुडीदार हवेत नुसताच तरंगत होता.
आईने चमकून वळून बाबांकडे पाहिलं, बाबांनी आधी गाडीच्या काचेवरच्या 'Handicapped' स्टिकरकडे आणि मग चिन्मयकडे पाहिलं, चिन्मय डोळ्यांत आव्हान घेऊन त्या दोघांच्याचकडे पहात होता, "येताय ना ओळख करून घ्यायला आई-बाबा?"
याद्या
7861
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
+१
अप्रतिम जमली आहे कथा.
हेच म्हणतो
In reply to अप्रतिम जमली आहे कथा. by पद्मावति
कथा आवडली.
वा!
बापरे!! आईबाबांची अवस्था समजू
मस्त कथा आवडली.
चांगली कथा
एकदम ट्विस्टच की.
वां !! गुगली एंड आहे गोष्टीचा
भन्नाट आवडली :)
कथा आवडली. मस्तच आहे.
अप्रतिम कथा.
कथा आवडली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'हसीना' मान जाएगी? पाकिस्तानी मुहाजीरांचे 'रॉ कनेक्शन'सुरेख
कथा एकदम आवडली. १० पैकी १०
सुरेख कथा !
व्वा, सुंदर बहुगुणी कथा.
कथा
कथा आवडली.
पाय नसल्यालर गाडी कशी चालवनार
कदाचित कृत्रिम पाय
In reply to पाय नसल्यालर गाडी कशी चालवनार by उगा काहितरीच
Nano modified for handicapped drivers
In reply to कदाचित कृत्रिम पाय by श्रीरंग_जोशी
खासंच
In reply to Nano modified for handicapped drivers by बहुगुणी
आवडली !
In reply to खासंच by श्रीरंग_जोशी
आवडली.
मस्त...
मस्त twist.
छान..
कथा आवडली !
आवडली.खरच असं घडू शकेल का असा
कथा आवडली!
अनपेक्षित.
सुरस कथा.
छान गोष्ट...
आपल्या आई बापांना जज
In reply to छान गोष्ट... by असंका
छे छे..काय बोलता? अहो उलट
In reply to आपल्या आई बापांना जज by बॅटमॅन
ऑ
In reply to छे छे..काय बोलता? अहो उलट by असंका
बस एवढंच???? :-)
In reply to ऑ by बॅटमॅन
माफ करा..
In reply to छान गोष्ट... by असंका
माझं ते वरचं पहिलं वाक्य चूक
In reply to माफ करा.. by चिगो
काहीच नाही..
In reply to माझं ते वरचं पहिलं वाक्य चूक by असंका
म्हणजे पहिला टोकाचा पर्याय-
In reply to काहीच नाही.. by चिगो
पसंद अपनी अपनी..
In reply to म्हणजे पहिला टोकाचा पर्याय- by असंका
दुसरी बाजू
In reply to छान गोष्ट... by असंका
प्रेमविवाह हा अगदी सरळ सरळ या
In reply to दुसरी बाजू by श्रीरंग_जोशी
अरे बापरे
In reply to प्रेमविवाह हा अगदी सरळ सरळ या by असंका
आता बघा....म्हणजे खरं तर
In reply to अरे बापरे by श्रीरंग_जोशी
एक शक्यता व्यक्त केली होती
In reply to आता बघा....म्हणजे खरं तर by असंका
कुठले दोन पर्याय?
In reply to एक शक्यता व्यक्त केली होती by श्रीरंग_जोशी
मस्त व्टीस्ट! लेखामधल्या
भयानक आवडली !
आवडली कथा.
कथा आवडली.
वा:!
अप्रतिम कथा!!!
जबरदस्त कथा..
अनपेक्षित शेवट
धन्यवाद!