झोंबाड
लेखनप्रकार
आभाळ भरुन आलं हुतं. सोसाट्याचा वारा सुटला हुता. धुळीचे लोट सगळ्या वावरात ऊठत लांबवर पसरत चाललं. आभाळातनं एकेक टिपका पडाय लागला.
शेलामायनं गवताचा भारा ऊचलुन गोठ्यात ठिवला. भराभरा धुणं काढुन घरात ठिवलं.
"आगं रेडकु तर सोड तेव्हढं" उंबऱ्यापाशी नुसतीच ताटकळलेली रुपी तशी भानावर आली. लगबगीनं जाऊन तिनं रेडकाचं दावं सोडलं. वढत वढत आणुन त्याला गोठ्यात बांधलं. आन पुन्हा ताटकळत तशीच ऊभी राहिली. रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच येतो. पण संध्याकाळच्या वेळेस आला की जोरदार कोसळतो. आणि अशा कातरवेळी तिच्या चित्तवृत्ती जाग्या करुन जातो.
कोपऱ्यात धुणं ठेऊन शेलामायनं ऊदबत्ती पेटवली. देव्हाऱ्याच्या पुढं केळात खोचली. हाळदी कुकु लावुन फुलं ऊधळत निवद दाखवला. भक्तिभावानं होत जोडत माथा टेकवला. आभाळ फाटलं तरी शेलामायची रोजची पुजा कधी चुकली नाही. सकाळ संध्याकाळ तिचा पुजेचा कार्यक्रम ठरलेला. रुकडीआयची ती निस्सीम भक्त होती. घराम्हागं शेताच्या तुकड्यात एक छोटसं देऊळही तिनं बांधुन घेतलेलं. गळ्यात कवडीच्या माळा घालुन, सणावाराला परडी घेऊन घरोघरी ती जोगवाही मागायची.
चुल पेटवुन शेलामाय धुराड्यात सैपाक करत बसली. रुपीनं काटकुटं ऊचलुन तिच्याम्होरं सरपानाला ठिवलं. तिचं पांढरफटक कपाळ बघुन शेलामायला पुन्हा एकदा कससचं झालं. बाहेर पावसाचा जोर वाढला.
कंदिलाच्या मिनमीनत्या ऊजेडात रुपी भिताडाला टेकुन शुन्यात नजर लावुन बसली. अडीत-तीन वर्षाखाली तिचं लगीन झालेलं. पण आठवड्याभरातच नवरा खपलेला. तिला नवऱ्याचा चेहराही नीटसा आठवत नव्हता. त्याला नेमका कोणता रोग होता हे ही तिला नाही समजलं. पण तेव्हापासुन गोऱ्यागोमट्या रुपीचं काळं दिवस सुरु झालेलं. पुढं नुसताच अंधार वाढुन ठेवलेला. तिनं एकटक कुठेतरी बघत बसनं नित्याचचं झालं होतं.
"हाय का शेलामाय घरात?" दार ऊघडुन भाऊसाहेब आत आला. तशी रुपीची तंद्री भंगली.
"कोण भावसाब हायतं का?, या की" कंदिल ऊचलुन शेलामाय दरवाज्याकडं बघत नीट न्याहाळत म्हणाली.
"व्हय मीच हाय, जेवन झालं का रुपे?"
"न्हाय आजुन व्हय चय" रुपी खोल आवाजात बोलली. त्याचे तांबरलेले डोळे आणि हातातली बाटली तिच्या नजरेतुन सुटली नाही.
भाऊसाहेबनं आत येऊन टावेलानं डोकं पुसलं. दुसऱ्या खोलीत जाऊन कापडं पण बदलली. मग तिथच खाटंवर त्यानं ताणुन दिली.
शेलामायनं त्याला 'जेवायचं का?' म्हणुन पण विचारलं नाही. 'येवढ्या रात्री कसं आला?' हे पण विचारलं नाही. रुपीनं पण जास्त विचार केला नाही. भाऊसाहेब हा शेलामायच्या माहेरी नेहमी ऊठबस असणारा महत्वाचा माणुस. आपल्या लग्नाअगोदर ईकडं घरी नेहमी यायचा. नान्याला खेळवत बसायचा, फटफटीवरनं गावात फिरवुन आणायचा. पण आपलं हे असं झाल्यापासुन त्याचं घरी येणं जवळपास बंदच झालं होतं. आज तो बऱ्याच दिवसांतुन आला होता. ते पण येवढ्या रात्री. मुक्काम तर त्यानं आजपर्यंत कधीच केलेला न्हवता. रुपी विचारात हरवली.
"जेवुन घी गं पोरे, आन आज पलिकडच्या खुलीत झोप, भावसाब झोपल्यातं खाटंवरं" शेलामायचा सैपाक अजुन झालाही न्हवता. पण रुपीला तिनं गळ घातली.
जेवण ऊरकुन रुपीनं माजघरात अंधरुन टाकलं. हे माजघर अगदी छोटसं. तिथं बरच जुनं सामान रेचुन ठेवलेलं. घरात कोणीही पाहुणे आले तर रुपीची ही खोली ठरलेली. एरव्ही ती घरात खाटेवरच झोपायची.
मिट्ट अंधारात रुपी पावसाची रिपरीप ऐकत पडली. माजघरातली ईकनं बघुन तिला तिचा बाप आठवायचा. आठ दहा वर्षापुर्वी तिचा बाप वारीला गेला होता. टाळ, मृदुंग आणि किर्तनात त्याचा जीव हरपला. घरी आला तो देवाचा नाद घेऊनच. मग पुन्हा वनवासाला गेला. तिथनं आल्यावर दाढ्या वाढवुन, कपाळावर भगवा लावुन, गळ्यात माळा घालुन गावोगावी फिरत राहिला. मग त्याचं घरी येणं बंदच झालं. रुपीला त्याचाही चेहरा काहीकेल्या आठवेना.
बारका भाऊ नान्या घरी असल्यावर तिचा जीव रमायचा. मात्र तोही आता आजोळी गेला होता. नाही म्हणायला तिचा एक वर्गमित्र बाब्या जो पवाराच्या वस्तीत राहायचा तो अधुन मधुन तिचे हालहवाल विचारायचा. एरव्ही तिच्याशी बोलायला कुणीच नसायचं. घरात मायलेकी तरी किती बोलणार. रुपीचे दिवस असे हे मुकाट होत चाललेले.
घरात एकटी पडल्यावर भुतकाळातला सारा पट तिच्यासमोर ऊलगडत जायचा. रात्री तिला लवकर झोपही यायची न्हाय. मग जुन्या आठवणींना कुरवाळत ती पडुन राहायची. त्यात तिला मौज ही वाटायची. पण आज येवढ्या पावसात अवेळी आलेला भाऊसाहेब तिच्यासाठी एक भलमोठ्ठं प्रश्नचिन्हं घेऊन आला होता. ऊघड्या दरवाज्यातुन बाहेर कोसळणारा पाऊस बघत ती हा गुंता सोडवत बसली.
आधी हा भाऊसाहेब जेव्हा कधी यायचा, तेव्हा ऐण दुपारी दाराला आतुन कडी घालुन घरात झोपायचा. आपल्याला हे नवीन नव्हतं, पण शेलामायही कुठे नजरेस पडत नसायची तेव्हा आपला जीव खालीवर व्हायचा. मग बारक्या नान्याला खेळवत आपण गोठ्यातच बसायचो. ही आठवण खुपच जुनी. म्हणजे शेलामाय आणि भाऊसाहेब यांचं काही शिजत तर नसेल.
बाहेर पावसाचा जोर अजुनच वाढला. पण येवढ्या धुवाधार पावसात आणि वाऱ्याच्या घोंघाटात पलिकडच्या खोलीतुन आलेली बांगड्याची किणकीण, हपापलेले श्वास, आणि पायांची धुसमुस तिच्या कानात शिरत गेली. रुपीची रात्र अजुनच गडद होत गेली.
शेलामायनं तिला फसवलं होतं. शेलामाय ही एक निब्बर बाई होती. तिचा साजशृंगार बघुन गावकरी तिला नखरेल म्हणत. पण भांडखोर स्वभाव बघुन कोणाची तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची टाप होत नसे. रुपीला आपल्या आईचा अभिमान वाटायचा, पण आज तिनं सगळ्यालाच सुरुंग लावला होता. पलिकडुन येणाऱ्या हपापणाऱ्या श्वासांचा आवाज वाढतच चालला.
रुपीच्या रोमारोमात धुंदी चढत गेली. 'सुख' म्हणजे काय हे जिला समजलंही नव्हतं तिच्या बाजुलाच ते ऊपभोगलं जात होतं. शरीरात पेटलेली धग तिला सहन होईना. मग माजघरातनं ऊठुन ती बाहेर मोकळ्या अंगणात आली. गडद अंधारात एका दगडावर बसुन ती चिंब भिजत राहिली. याआधीही जेव्हा जेव्हा तिचं शरीर बंड पुकारायचं, तेव्हा ती पावसात भिजत राहायची.
पाऊस तिला आवडायचा, कारण पावसात तिचा निचरा व्हायचा.
भान हरपुन रुपी तशीच बसुन राहीली. प्रश्न असा होता की शेलामायनं आजपर्यंत लपवुन ठेवलेलं गुपित आज आपल्यापुढं का फोडलं?. शेलामाय खरचं नखरेल बदनाम बाई होती का? नवरा घरातुन निघुन गेल्यावरही तिचं फारसं बिघडलं न्हवतं.
घरामागच्या शेताच्या तुकड्यावरही पाटील नजर लावुन बसला होता. पण उलट तिनंच त्याच्याशी जमीनीचा सौदा सुरु केला. पाटीलही व्यवहार करायला घरी येत राहिला. पण शेलामाय त्याला खेळवत राहिली. शेतीची नांगरणी, पेरणी, खुरपणी सगळं त्याच्याकडुनचं करुन घेतलं. शेतीही ताब्यात राहिली, आणि पाटलासारख्या रांगड्या गड्याला अंगावरही घेत गेली. हा पाटीलही नंतर देशोधडीला लागला.
नवरा निघुन गेला म्हणुन शेलामायनं कधी दु:ख नाही केलं. संसाराचं वाटोळं झालं म्हणुन रडत भेकत बसली नाही. कमरेला पदर खोचुन संसाराचा गाडा दिमाखानं ओढत राहिली. गरीबीची कुठलीही धग आपल्या मुलांना जाणवु दिली नाही. पाहिजे तेव्हा नव्या गड्याला जवळ करत गेली, पाहिजे तेव्हा त्यांच्याशी मनासारखं खेळत राहिली.
कठोर परीस्थितीत शेलामाय आपल्या मर्जीनं जीवन जगत राहिली.
रूपीनं विचार करतचं राहिली. तिच्या बोडक्या जिवनात कुठुनसा येणारा एक अंधुकसा किरण दिसायला लागला. आपण आपल्या वैधव्याचं दु:ख करत किती बसायचं. जीर्ण कापड नेसुन रडत कुजत आयुष्य घालवत लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा किती झेलायच्या. आता या सहानुभूतीवर थुंकायलाच हवे. आपणही आता निलाजरेपणाने जगायलाच हवे. आपल्याही शरीरात आग आहे, आणि ती आपल्या मर्जीनं भागवण्याचा अधिकार आपल्याला आहे. ताठ मानेनं जगत, पाहिजे त्याच्याशी खेळत, मनसोक्त जगण्याची मजा आपणाला अनुभवायलाच हवी. ऊद्याच्या बदनामीला आजची जिंदगी ओवाळुन टाकायलाच हवी. भले कोणी आपणाला नखरेल, चवचाल, बाजिंदी म्हणोत. दु:खी, कमजोर, बिचारी यापेक्षा त्या उपाध्या कधीही बऱ्या. आयुष्यात चढउतार येणारचं, पण म्हणुन आजचा क्षणिक ऊपभोग तरी का सोडायचा. आज शेलामायनं कळत नकळत तिला एक धडा घालुन दिला होता.
समोरच्या वस्तीतला बाब्या आशाळभुत नजरेने आपल्याकडे बघतो. त्याच्या नजरा आपल्याला कळतचं नाही असं नाही. भर दुपारी उघड्याबंब शरीराने आपल्याकडे बघत राहतो. ऊद्या दुपारी जेव्हा घरी तो एकटाच असतो, तेव्हा त्याच्याकडे जायलाच हवे. रुपी खुदकन गालात हसली. तिला आयतचं एक माकड खेळवाय भेटणार होतं.
पाऊसही आता ऊघडत चालला. पहाटेच्या गारठ्यात तिचा चेहरा टवटवीत झाला. मघापासुन हाताला झोंबणारे जास्वंदाचे एक चिंबाट फुल तिनं हलकेच तोडले.
वाचन
19504
वाचनखूण
प्रतिक्रिया
95
एक नंबर भाऊ
जबराकुस....
सुंदर .छोटे प्रसंगहि
आवडेश. असंच लिहित जा.
तुफ्फान जमलीये!!
आवडली.
वा!
कथा आवडली. तुमच्या कथांचे
भार्री
एकच नंबर जबरदस्त!! ग्रामीण
जबरदस्त!
जबराट जव्हेरगंज
In reply to जबराट जव्हेरगंज by बोका-ए-आझम
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by जव्हेरगंज
प्रमाण
In reply to धन्यवाद! by जव्हेरगंज
जव्हेरभाउ
In reply to जव्हेरभाउ by चतुरंग
येस येस, आलं ध्यानात,
In reply to जबराट जव्हेरगंज by बोका-ए-आझम
एक्झ्याक्टली!
In reply to एक्झ्याक्टली! by चतुरंग
ओह, असं झालं तर, मला वाटलं
In reply to ओह, असं झालं तर, मला वाटलं by जव्हेरगंज
नको तसं नको
In reply to नको तसं नको by भाकरी
भाकरी तै/भौ बिनधास्त विचारा !
भन्नाट झालीय कथा.
भारी!
मस्त! लिहित रहा.
जमलीय.
कथा मस्त आहे.
जबरदस्त हो जव्हेरभाऊ.
अप्रतिम जमलीय कथा
वास्तव असं अंगावर येतं तुमच्या लेखनातून...
खूप वर्षांपूर्वी...
सशक्त कथा..
असे किस्से बघितलेत. अगदी एकाच
In reply to असे किस्से बघितलेत. अगदी एकाच by प्यारे१
आजच वाचलेली ही बातमी पण पहा
In reply to आजच वाचलेली ही बातमी पण पहा by अभ्या..
दोन्ही बाजू वाईटच अभ्या...
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्
छान फुलवली आहे. असेच लिहीत
In reply to छान फुलवली आहे. असेच लिहीत by अरुण मनोहर
+१
In reply to +१ by पैसा
म्हणजे , फक्त ते वाक्य आवडलं
In reply to म्हणजे , फक्त ते वाक्य आवडलं by जव्हेरगंज
शेवट आवडला
सुंदर कथा !
In reply to सुंदर कथा ! by डॉ सुहास म्हात्रे
+१ कथेला
कथा आवडली.
In reply to कथा आवडली. by मार्मिक गोडसे
झोंबाड = भांडण , हाणामारी,
+१
चाम्गले ल्हिता की भौ.
अफाट लिहिलंय!
कथा आवडली.
बेस्टेस्ट लेखक मिपा हॅज गाॅट!
मस्तच!
कथा आवडली पण
In reply to कथा आवडली पण by इडली डोसा
कथा आवडली पण व्यभिचाराला
In reply to कथा आवडली पण व्यभिचाराला by जव्हेरगंज
कथा आवडली !
In reply to कथा आवडली पण व्यभिचाराला by जव्हेरगंज
नाही पटलं
In reply to नाही पटलं by इडली डोसा
एकतर मी म्हणेन कि नखरेल,
In reply to एकतर मी म्हणेन कि नखरेल, by जव्हेरगंज
आणि हो खेळाची सगळी सुत्रं ती
In reply to एकतर मी म्हणेन कि नखरेल, by जव्हेरगंज
हम्म
In reply to हम्म by इडली डोसा
ओके ईडो,
In reply to ओके ईडो, by जव्हेरगंज
तुमच्या वरच्या प्रतिसादात पण
In reply to तुमच्या वरच्या प्रतिसादात पण by इडली डोसा
एकदा आपलं वागणं समर्थनीय
In reply to एकदा आपलं वागणं समर्थनीय by प्यारे१
हाहाहा
In reply to हाहाहा by इडली डोसा
लं कार्त मदाम! म:सी.
In reply to लं कार्त मदाम! म:सी. by प्यारे१
लिव्हा हो जव्हेरभाउ. काय
In reply to लिव्हा हो जव्हेरभाउ. काय by अभ्या..
'जबरा' नीट लिहित जा रे. ;)
In reply to 'जबरा' नीट लिहित जा रे. ;) by प्यारे१
हे पीएम झालेल्याच्या
In reply to हे पीएम झालेल्याच्या by अभ्या..
शुद्धलेखन. शुध्द्लेखन नाही.
In reply to लिव्हा हो जव्हेरभाउ. काय by अभ्या..
प्रा. व. बा. बोध्यांच्या कथा वाचायला कधी देताय?
In reply to प्रा. व. बा. बोध्यांच्या कथा वाचायला कधी देताय? by इडली डोसा
गावाचे नाव सांगितलेय. जायचे
In reply to गावाचे नाव सांगितलेय. जायचे by अभ्या..
वाचायला द्यायला पाहिजेत म्हणजे मीच द्यायला पाहिजेत असे नाही.
In reply to वाचायला द्यायला पाहिजेत म्हणजे मीच द्यायला पाहिजेत असे नाही. by इडली डोसा
अहो ईडली डोसा, उपमा तरी इचार
In reply to अहो ईडली डोसा, उपमा तरी इचार by अभ्या..
वन प्लेट उपमा टू प्लीज.
In reply to लिव्हा हो जव्हेरभाउ. काय by अभ्या..
अगदी
In reply to अगदी by प्रदीप
हा नेमका प्रतिसाद दिला आहात
मस्तच
सर्वच प्रतिसादकांचा अत्यंत
जबरदस्त लिहिलंय.
वा मस्त !!!
कथेचा ग्रामीण बाज आवडला :)
कथा आवडली. भाषेवर छान पकड आहे
मस्त !!!
कथा अतिशय आवडली.
एक नंबरी
मस्त छान...
!!
In reply to !! by तुषार काळभोर
ज्या गोष्टी आहेत त्या कितीही
In reply to ज्या गोष्टी आहेत त्या कितीही by बॅटमॅन
+१ ...
In reply to +१ ... by अस्वस्थामा
वाचक म्हणून वाचकांनी सूचना
मस्तच
In reply to मस्तच by अद्द्या
कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला
In reply to कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला by रातराणी
येस, टँट्स द पॉईंट, नोटेड!
In reply to कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला by रातराणी
मिपावर नवकवी आणि लेखांची जर
कथेवर चर्चा