टेडी (भाग-3)
क्षणार्धात वीणा आणि चव्हाण आवाजाच्या दिशेनं पळत सुटले. हॉलच्या डाव्या बाजूच्या बेडरूममधून आलेला होता आवाज. वीणा झटकन खोलीत शिरली. डाव्या कोप-यात एक जुनं लाकडी कपाट होतं. त्याच्या दरवाज्याशी आतून कुणीतरी झटत होतं. बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. वीणाने पटकन दरवाजा अगदी जीव खाऊन ओढला. त्यासरशी दिया एकदम बाहेर येऊन फरशीवर पडली. आता तर ती अगदी जोरजोरात रडत होती. अगदी फ्रॅंटिकच झालेली होती. वीणानं तिला उचलून घेऊन थोपटायला सुरुवात केली, तशी ती थोडी शांत झाली.
काय झालं असावं ते आता त्यांच्या लक्षात आलं. त्या कपाटात एका कोप-यात एक मळकट टेडी बेअर ठेवलेला होता.
मिसळपाव