Skip to main content

एक प्रेम कहाणी....

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 25/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रेम कहाणी........... ती असेल ८-९ वर्षाची... बागेत खेळताना तिचे लक्ष त्याच्या कडे गेले ..तो पण असेल १२-१३ वर्षाचा.. तो पण तिच्या कडे अधून मधून बघत होता.... तिन्र त्याच्या नकळत त्याचा फोटो काढला...... व त्याने पण... बाबांच्या बदली मुळे तिने शहर बदलले...काळ पुढे सरकत गेला व ति हा प्रसंग विसरली..... पुढे तिचे लग्न झाले...व संसाराला लागली... एकदा पर्स आवरत असताना तिला जुना फोटो सापडला... पती जवळच उभा होता .. त्याने विचारले "कोण आहे हा छोटा मुलगा?" ति हसली अन म्हणाली "माझे पहिले प्रेम..पहिला क्रश"..... असे म्हणताचे त्याने खिशांतून पाकीट काढले... त्यात एका छोट्या मुलीचा फोटो होता.. तो दाखवत तो म्हणाला..हे बघ माझे पहिले प्रेम...मला ति खूप आवडली होती..बागेत यायची खेळायला.. आपला बालपणीचा फोटो बघताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले... आवेगाने ति उठली व त्याला घट्ट मिठी मारली........ परमेश्वर पण असे सुखद चमत्कार करत असतो
लेखनविषय:

वाचने 3719
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

धन्य. मी पैला.

काका, होसुमीयाघ या श्रीरियलला तुमच्यासारख्या पटकथालेखकाची नितांत गरज आहे. निखिल साने यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

In reply to by जव्हेरगंज

नसेल आठवत त्याला लहानपणचा चेहेरा =)) बाकी ११-१२ वर्षांच्या पोरांच्या हातामधे कॅमेरे, कॅमेरा फोन देणारे आईबाप थोर. तसचं पर्स आवरताना असा शब्दप्रयोग वाचला. वर्षानुवर्ष पर्स नं आवरणार्‍या त्या जगन्मातेमनमोहिनीला पण सा-ष टांग णमस्कार.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बाकी ११-१२ वर्षांच्या पोरांच्या हातामधे कॅमेरे, कॅमेरा फोन देणारे आईबाप थोर.
अहो एका महाभाग मित्राच्या २.५ वर्षाच्या मुलाकडे स्वतःचा मोटो-जी (३-जी ईंटरनेट सहीत) आहे. त्या मानाने ११-१२ वर्षांची पोरे म्हणजे म्हातारी झालीत. --- कानडा

In reply to by आदूबाळ

कोणाला समजले नसेल तर नम्रपणे नमुद करतो ऑस्कर हा शब्द मी उपहासाने वापरला होता... कोणीही उठतो कारुण्य चितारतो अन पुरस्कार मिळवुन जातो हा उपहास "ऑस्कर"देण्यामागे होता.- जय हिंद.

In reply to by द-बाहुबली

आसा नाय करायचा हां! एकदा दिलान पुना कारून नाय घेयाचा! ते कांबीकरांक काय वाटन? (कृ.ह.घ्या!)

प्रमुख वर्तमान पात्रीय पोच : "एक मराठी मनाचा हुंकार " दै सामना "अशी ताटातूट युती सरकारातच होते हे दुदैवी आणि संताप जनक आहे : राणे संचालीत "प्रहार" "यात भाजपा वाल्यांचा हात आहे असं साहेबांना वाटतय" = तांबी लागलेला सक्काळ "वियोगातही पुन्हा भेटले एक अजब गजब काहानी " == पटापटा मटा "पहा अच्छे दिन आलेत की नाही" = दै तरूण भारत "असं कॉन्ग्रेसच्या राज्यातच घडलं असावं युती त्याचं श्रेय लाटतेय" = दै लोकमत मध्ये प्रूथ्वी बाबा "भेटायचच होतं तर आधी ताटातूट का?" दै लोकसत्ता "ते भेटलेना तुम्ही तुमची कामं करा" दै पुढारी सात भिकार लेखानंतर एक चांगला लेख दै मिपा