Skip to main content

हम भी कुछ कम नही

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी सोमवार, 26/10/2015 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
..... हम भी कुछ नाही ......... मला आपलं कोकणातच आता निवृतीनंतर बरं वाटतंय .मुलगा ,सून ,नातू येतचं असतात वर्षातून एक दोन वेळा इकडं,आपल्याला भेटायला, मग आपलं काय ठेवलंय आता तिकडं पुण्याला?असं आम्ही म्हणतो खरं पण तसं अगदिच टाळून चालत नाही,नातू कांहीं वेळा फारच खनपाटिला बसतो,सारखे फोनवर फोन येऊ लागतात,मग जावचं लागतं तिकडं पुण्याला . या खेपेलाहि तसंच झालं, आमचं फायनल इयरचं टेक्निकल एक्झिबिशन आहे,अाॅल इंडिया पार्टिसिपंट आहेत, अन्य देशातूनहि कांहीं युनिव्हर्सिटीज भाग घेणार आहेत,तुम्ही आलं पाहिजे म्हणाला .तुमच्या नातवाचं कौतुक करायला या म्हणाला .इंजिनीयरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे तो,मला जाणं भागच होतं.ही आणि मी दोघंहि निघून आलो . पुण्याला ,माझा मुलगा औंध परिसरात एका छोट्या बंगल्यात राहतो. आज दसर्याचा दिवस ,संध्याकाळी लक्ष्मी रोडला चक्कर मारुन यावी असा,विचार होता पण मुलगाच नवरा बायको ,मॉलमध्ये जाऊन येतो ,एखादे वेळेस विशाल(नातू) चे मित्र सोनं द्यायला घरी येथील ,तुम्ही थांबाल का म्हणाले,त्यामुळं घरीच ही आणि मी थांबलो.व्हरांड्यात वार्‍याला खुर्च्या टाकून बसलो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालल्या होत्या.पुणं काय झपाट्याने वाढतय हो,सगळीकडे ऊंच ऊंच इमारती,रस्त्यावरच्या गाड्या ,रहदारी बघून थक्क व्ह्यायला होतं.ही म्हणाली. "आहो,टी. व्ही. वर परवा मजाच बघायला मिळाली,"ही सांगत होती," तांदूळ चक्क प्लास्टिकचे, अगदी हुबेहुब चायनानं काढलेत खास भारतासाठी ,लग्नात अक्षदासाठी म्हणे" "कांहीहि काढतील,ऊद्या,आपट्याची पानहि काढतील" मी म्हणालो,"हो तीहि काढलेत त्यानी,अगदी तंतोतंत,वर आणि कांही संदेशहि छापलेत म्हणे" ती,म्हणाली असं आमचं बोलणं चाललं होतं एव्हड्यात बाहेर एक गाडी येवून थांबली.विशालच त्यातून ऊतरला,सोबत आणखीन दोन तीन मित्रहि होते. आत आले.आजोबा, हे माझे मित्र तुम्हाला सोनं द्यायला आलेत म्हणाला .दिलं त्यानी सोनं ,आम्हीहि त्याना दिलं, आमच्याकडं, उभयातानि द्यायची पद्धत आहे. वाकून नमस्कारही केला त्यानी .मात्र पाठच्या एकाला पाठीचा कांहीं त्रास असावा असं वाटलं ,त्याला नीट वाकता येत नव्हतं. "काय बोलणं चाललं होतं आजोबा" " नाही तेच चायनानं काय काय प्रगती केलीय, पहिल्य़ांदा गणपतीच्या मूर्ती, नंतर अक्षदासाठी तांदूळ आणि आता तर आपट्याची पानही,आपण नुसतं,त्यांचं कौतुक करता बसायचं,आपलं, काय?आपण कधी गाठणार हा पल्ला? " " आपण त्याच्याही पुढं जाऊ शकतो" " नुसत्या तोंडाच्या गप्पा काय, उपयोगाच्या रे" असं आमचं बोलणं चाललं होतं,त्याचा मित्र वर्ग नुसती श्रोत्याची भूमिका बजावत होता , पण त्याना फारच गडबड असावी ,फक्त हातावर साखर घेतली आणि निघालेहि. विशाल पळतच पुन्हा परत आला ,गाडीची किल्ली राहिली,म्हणाला. आजोबांचा नातू शोभतोय हं !,आजोबा सुद्धा चावी नाही कायम किल्लीच म्हणणार,त्याच्या आजीनं दोघानाही थोडी किल्ली दिली. "अरे विशाल,मला सांग तुझा तो सगळ्यात पाठीमागं असलेला,मित्र ,तो काय नेपाळी होता काय? त्याची पाठ पण जरा धरल्यासारखी वाटली ,त्याला हे सोनं देणं,वगैरे जरा नवीन होतं काय? काय नांव काय त्याचं?" "आजोबा जरा दमानं ! सांगतो सगळं.त्याच्या नेपाळी, चायनीज् अशा पेहरावर जाऊ नका , तो पक्का इथलाच, पुण्याचाच आहे .त्याची पाठ वगैरे कांहीं, धरलेली नाही.आपल्यासगळ्या पेक्षा चपळ आहे तो, उद्या यायचंच आहे तुम्हाला, कॉलेज कॅंपसवर ,टुर्नामेंट्स आहेत नं,टेबलटेनिसच्या त्या बघायला. त्यात आमचा वाय टी एम् किंवा यंशा हे मेन आकर्षण आहे . त्याच्या विजयावर मोठ्या पैजाहि लागलेल्या आहेत. उद्या कळेल,तुम्हाला ,हम भी कुछ नही ते." "तू काय बोलतोस मला कांहींच कळत नाही,वाय टी एम् म्हणजे काय?" "वाय टी मानव नांव आहे त्याचं" "मानव हे कुठलं आडनांव?,कर्नाटकात मानवी आहेत, हे मानव कुठूनं आलं?" "वाय टी एम्, म्हणजे यंशील त्रम्बक मानव,एम्. त्रम्बक हे त्याचे आणि खरंतर आमचेही बाप ,आमचे एच्ओडी आहेत ते." "? ? ? ? ?" "अजून नाही लक्षात, येत तुमच्या आजोबा ? त्याचं मराठी अद्याक्षर आहे यंत्रमानव ! ! ! आता कळलं न आजोबा? आम्ही रोबोटीक्स चे स्टूडंट्स आहोत, तुम्ही आणि आजी दोघंहि ओळखू शकला नाहीत नां यंशाला यंत्रमानव म्हणून? आता उद्या चायना टीमला जेव्हां जिंकू ना तेंव्हा कळेल हम भी कुछ कम नही. पळतो आता यंशा ची बँटरी चार्ज करायला पाहिजे." आता थक्क व्हायची पाळी माझी होती .
लेखनविषय:

वाचने 1060
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

:-)