Skip to main content

कथा

तारा वर्तक..व तीचे बाळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 26/11/2015 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
तारा वर्तक..व तीचे बाळ ..................................... धनंजय जोशी ब्यांकेत ऑफिसर होता.. गावात वडलोपार्जीत राहता बंगला. पत्नी शकुंतला... तो प्रेमाने तिला शकू म्हणायचा व ती जय... शकूच पहिले मूल गेले होते..गर्भाशय व नलिकेत काही कोम्पिकेशन्स झाली होती... डॉक्टरांनी औषधे दिली होती.. शकू पुन्हा गर्वार्शी होती ७ महिन्याची...रिपोर्ट्स नॉर्मल होते ..जय काळजी घेत होता.. जय ला जवळच कुणीच नव्हत..आई बाबा पण देवाघरी नुकतेच गेले होते.. लग्नात देणी घेणी..मानापनावरुन शकुच्या घरच्या शि बिनसले होते..त्या मुळे शकू व जय ने शकुच्या माहेरच्या शी संबंध तोडलेले होते.. जय ची दूरची आत्या होती.तीच पण वय झालं होत.."

इतस्तत:

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 25/11/2015 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या डोंगरकडांवरुन वाहणारे वारे गारठा घेऊन पश्चिमेकडील पाटवाटा समृद्ध करत गेले. बुंदेलखंडाच्या तीव्र ऊतारावरुन अवजड शिळा गडगडत खाली आली. काम फत्ते झाले. चढणी भाजणीचा रस्ता तुडवत वर्दी द्यायला भिवा गडावर पोहोचला. तुघलक खान दाढी कुरवाळत सिंहासनावर आरुढ होता. "क्या पैगाम लाये हो?" "वो पत्थर हमने हटाया जनाब" "बहोत खुब, सुभा नल्ला" अक्रम पठाणाकडे नजरत-ए-हुकुम गेला. दाढीदारी सैन्य डोंगर उतारावर एकवटले. जिथुन शिळा काढली होती तिथे एक भलामोठा खंदक पडला होता. पहारी तुटून पडल्या. त्या खंदकात जोमाने खोदकाम सुरु झाले. धामनीच्या सुभेदाराकडे खबर उडत उडत गेली.

दोन वेडे - उपसंहार

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 24/11/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मार्कवर देशद्रोहाचा खटला भरला गेला! त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण 'पूल ऑफ़ डेड' मधे त्याचा अंत झाला! डेड्पूल अमेरिकी सरकारच्या मानवताविरोधी कारवायांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होता! शेवटच्या लॉझगन्स कुठे वापरल्या जाणार हेही ठरलं होत! भारत अमेरिका युद्ध! जनरल सोन्याबापू ह्याच चिंतेत होते. कारण लॉझ्गन्स विरोधात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते! "सर आपल्यासाठी पत्र आले आहे" बापूंनी चिंतेत पत्र हातात घेतले! "लॉझ्गन्स वर उत्तर!"पत्रात लिहिले होते! त्या पत्राबरोबर एक केमिकलची बाटली देखील होती!!!!

रन फॉरेस्ट रन

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 24/11/2015 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर मध्यंतरी 'काही वेगळे चित्रपट' या धाग्यावर हॉलीवुडचे बरायचश्या सुंदर चित्रपटांचे उल्लेख मिळाले, त्यापैकी 'टॉम हँक्स' अभिनीत 'फॉरेस्ट गम्प' पासून सुरवात केली. निसर्गाने मानवाला बनवताना कोणते रसायन वापरले याचा उलगाड़ा अजूनही आपल्याला झालेला नाही, फॉरेस्ट गम्प मधून पुन्हा एकदा हे रसायन समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. विन्स्टन ग्रूम या लेखकाने लिहिलेल्या "फॉरेस्ट गम्प' याच शीर्षकाच्या कादंबरीवर हा चित्रपटला ऑस्करचे उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, संपादन इत्यादी एकूण सहा पुरस्कार मिळाले.

दिवाळी कुणाची?

लेखक आनंद कांबीकर यांनी सोमवार, 23/11/2015 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
"ये आये, दिवाळी कधीच्याला हाय गं!" "हाय उंद्याच्याला" "आये, मंग तू दाळीचे लाडु कव्हा करणार हैस" "करतीना उंद्याच्याला" "आये, त्वा रोजच् उंदया उंदया म्हंतीस" "मंग जाय रासन आलं का नय ते यी बघुन. रासनात दाळ येणार हाय " __________________________________________________________________________ रातपासुन पांधीत दबा धरून बसलेले दोन ट्रक नानासाहेबाच्या मळयाकड़े निघाले. त्यातला एक ट्रक अजुन तसाच होता, अगदी सीलबंद. दुसऱ्या ट्रक मधली अर्धी निम्मी पोती पांदितच काढुन ट्रॅक्टरणे गावांत पाठवली. ट्रॅक्टर राषन दुकानसमोर येताच, राषन आल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. थांबलेल्या दिवाळीत उत्साह संचारला.

दिवस असे की - कथा

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 23/11/2015 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
-----दिवस असे की - कथा---------------- दुकानातल्या दर्शनी भागामध्ये ठेवलेल्या नव्या को-रया चपलांकडे राहुन राहुन विनुचे लक्ष जात होते . त्याचवेळी आपल्या पायातल्या फाटुन चिंध्या होऊ लागलेल्या चपलांच्या जाणिवेने त्याचे मन खिन्नही होत होते . मनाचा हिय्या करुन त्याने दुकानदाराला चपलांची किंमत विचारली . पण तीस रुपये आकडा ऐकुन आपली निराशा लपवत , मान हलवत तो बाहेर पडला . त्यावेळी तरी त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते . बाहेर पडल्यावर तो स्वताची समजुत घालु लागला . "आपल्या पायातल्या फाटक्या चपलांकडे पाहुन वर्गातली मुले हसतात , आपली टर उडवतात . आपल्यालाही चालताना खुप त्रास होतो .

योजना

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 22/11/2015 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
(पात्रांची मानसिकता खरी असली तरी दुर्दैवाने योजना काल्पनिक आहे) मंत्रीन् बाईंनी फर्मान काढलं तशी कागदं वरुण खाली अन खालुन वरती फिरली. योजनेची ताबडतोब अंमलबजावणी झाली. खेड़ोपाड़ी शिक्षण सेविका पदर खोचुन उभा ठाकल्या. पाट्या, पुस्तकं पोहचली. भत्ते सुरु झाले. शाळात लाइटं लागली. दिवसभर राणात् राबनारी हातं रातच्याला लेखान्या धरु लागली. वर्गा वर्गातून बांगड्याची सळसळ वाढू लागली. पण जेव्हा गणना झाली, टक्केवारी हाती आली तेव्हा बाई हदरल्याच. पाण्यासारखा पैसा ओतून, मोठी फौज उभारुण फ़क्त दहा टक्केच बाया शाळात येतात, हे ऐकून बाईंच्या डोक्यात आग आग झाली.

दोन वेडे -३

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 21/11/2015 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
तो वेडा ब्रेड कापत होता. "हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला. वेडा फक्त त्याकडे बघत होता. "१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस" वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला. मार्कने तो शिताफीने चुकवला. "१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं! बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता.

एक मनस्वी अद्वैत

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/11/2015 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक मनस्वी अद्वैत अनुराग कंपनीत कामाला जाताना रोज त्या घड्याळाच्या शो रूम वरून जायचा . काहीवेळा क्षणभर थांबायचाही. ती चकचकीत फॅशनेबल चुटूकशी शोकेसमध्ये ठेवलेली लेडीज घड्याळं त्याला मोहवायची.रागीणीच्या हातावर कुठलं जास्त खुलून दिसेल याचा विचारहि तो करत रहायचा. उद्या त्यांच्या लग्नाला पांच वर्ष होतायतायात. अजून तेच लग्ना आधीचं जूनं घड्याळ ती वापरते . उद्या कोणत्याहि परिस्थितीत लग्नाच्या वाढदिवसाला तिला सरप्राइज द्यायचंच तो मनोमन ठरवतो.

शिंद्री

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 19/11/2015 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
वाजत गाजत छबिना भाईर आला. तालासुरात अगडबंब ढोल बडवले जाऊ लागले. गुरवानं आईराजाचा जोरदार ऊदोऊदो केला. एका हातानं घंटी वाजवत आन दुसऱ्या हातात पंचारतीचं ताट घीऊन गुरव एकएक पाऊल पुढे टाकत चालला. एवढ्या गर्दीत कोपऱ्या कोपऱ्यातनं कुणाच्याना कुणाच्या अंगात यीव लागलं. हाताची घट्ट तिढी मारुन डोळं गच्च मिटुन नानाप्रकारे थयाथया नाचत गुरवाच्या पुढं ते भर अंधारात जाऊ लागले. त्यांनी ना दगड बघीतला ना धोंडा. आप्तगण त्यांच्यावर फुलं ऊधळत ऊदोऊदो करत राहीले. पालखी जेव्हा पायऱ्यांवरुन खाली मोकळ्या पटांगणात आली तवा आधीच जाळावर शेकलेल्या हलग्या तडातडा बडवल्या जाऊ लागल्या.