Skip to main content

कथा

अनिला

लेखक abhajoshi14 यांनी मंगळवार, 24/05/2016 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज जेल मध्ये पोचल्या पोचल्या एक वेगळीच केस हाताळावी लागली. एक चाळीशी उलटून गेलेला माणूस समोर अपराधी म्हणून बसला होता. त्याचा अपराध म्हणजे चोरी आणि लबाडी. एका सुप्रसिद्ध हॉटेल मध्ये तो शेफ म्हणून नोकरीला होता. महिन्याला तीस हजार पगार होता. पण हाव फार वाईट गोष्ट असते. मालकाचा विश्वास संपादन करून एक दिवस त्याने हॉटेल मधला माल लंपास करायला सुरुवात केली. त्या मालाला विकून त्यातून मिळालेल्या पैश्याने स्वताची व्यसनावर झालेली उधारी मिटवली. त्याचे नावे अनिल परचुरे. हॉटेल व्ययसाय मधील पदवी घेतलेला आणि बरीच वर्ष परदेश मध्ये नोकरी करून परत आलेला.

शिट्टी

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 22/05/2016 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
भानू कुत्रं आज तळ्याकाठी एकटंच बसलं होतं. बाभळीच्या झाडाखाली आज त्याला निवांत झोप लागली होती. तसंही करण्यासारखं काही नव्हतं. दिवसभर रानावनात उंडारल्यावर तळ्याकाठी येऊन शांत पडण्याचा त्याचा दिनक्रमच होता. बरेच दिवस जवानीचा हिसका न दाखवल्यानं खरंतर तो तुंबला होता. सोय म्हणून त्यानं डोंगरपायथ्याच्या चार-पाच कुत्र्या बघून ठेवल्या होत्या. पण सुगीचा हंगाम नसल्याने त्या याला विशेष दाद देत नसत. उन्हाची तिरीप डोळ्यावर आली तसं भानू कुत्रं उलथापालथा होत जागं झालं.

सरदार दिठेरीकरांची गढी - भाग ३ ----- कथा ------ काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 22/05/2016 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार दिठेरीकरांची गढी ---- भाग १ ---- कथा ---- काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी - भाग ३ ----- कथा ------ काल्पनीक -- पुढे चालु - रविकांतराव यांनी त्या हॉलच्या टोकाला असलेल्या एका उंच आसनावरील बैठकीकडे निर्देश केला आणी ते पुढील माहिती सांगु लागले . "या दिवाणखान्यामधे एकेकाळी न्यायदानाचे काम चालत असे . दिठेरी गाव आणी बाजुचा मुलुख इथल्या जनतेचे न्याय निवाडे इथे होत असत . खुद्द सरदार दिठेरीकर हे न्याय निवाड्याचे काम बघत असत .

होरपळ

लेखक रातराणी यांनी रविवार, 22/05/2016 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
"मॅडम तुमच्या आईंचा फोन येऊन गेला दोनदा" बरं म्हणत सवयीने तिनं एप्रनच्या खिशात हात घातला. खिशात फोन काही नव्हता. कामाच्या व्यापात कसं काय आपल्या लक्षात नाही आलं बरं, आज फोन काढलाच नाही पर्समधून, म्हणत तिनं पर्स उघडली. फोन पाहिला तर आईचे सात मिसकॉल. तरीच हॉस्पिटलमधे फोन केलेला दिसतोय. आणि इतक्या वेळा ट्राय केला म्हणजे काहीतरी गंभीर असणार. तसाच तिने आईला फोन केला. हॅलो वगैरे म्हणायच्या आतच पलीकडुन काहीसा रडवेला आवाज आला, "अग अरु त्यांना परत त्रास व्हायला लागलाय. तू लगेच ये" "हम्म आलेच मी" एक खोल श्वास घेऊन अरुंधती गाडीची चावी घेऊन बाहेर पडली. बाहेर रखरखीत ऊन.

सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 22/05/2016 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार दिठेरीकरांची गढी ---- भाग १ ---- कथा ---- काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी - भाग २ ----- कथा ------ काल्पनीक -- पुढे चालु --- एक झोकदार वळण घेउन बस गढीच्या मुख्य दारापाशी येउन थांबली . बाहेरुन दिसणारी गढीची भव्य तटबंदी पाहुन सर्व प्रवाशांची उत्सुकता चाळवली गेली . गढीचा मुख्य दरवाजाही चांगलाच भव्य , बुलंद दिसत होता . "चला मंडळी . आपले मुक्कामाचे ठिकाण आले . सरदार दिठेरीकरांची गढी ." कारेकरांनी सुचना दिली . सर्व प्रवासी लगबगीने खाली उतरले .

एक लग्नसमारंभ . . . . . जो खरं तर झालाच नाही

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 20/05/2016 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
तीन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत. साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच महत्वाचे आणि धनाड्य लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. बौद्धिक घेणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता. माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते.

अधांतर -2

लेखक समीर१२३४५६ यांनी शुक्रवार, 20/05/2016 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
- परंतू नियतीच्‍या मनात मात्र एक वेगळाच डाव ठरलेला होता अलकाचे लग्‍न जुळत नव्‍हते, तिच्‍या वडिलांनी ब-याच ठिकाणी बोलणी करुन पाहिली होती, परंतू सगळीकडे नकारघंटाच ऐकू येत होती. अलकाचे दिसणे वागणे खूपच चांगले होते, परंतू का कोणास ठाऊक सर्व लोक कृष्‍णाला खूृृप घाबरत असायचे. कृष्‍णााला मात्र या गोष्‍टीचा थांगपत्‍ता नव्‍हता, तो आपल्‍या बहिणीसाठी वणवण फिरत असायचा.

राँग नंबर

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 19/05/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे! मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो! सगळा ग्रुप जमला होता. मग खूप धमाल केली होती. अशाच एका क्षणी हसता हसता त्याने अचानक तिला I love you म्हटलं होतं. त्याचं सगळंच धक्कादायक आणि अनपेक्षित. कधी काय करेल याचा नेम नाही. हीच spontaneity तिला भावली होती. आणि ती काय लाजली होती!

सरदार दिठेरीकरांची गढी - कथा - काल्पनीक

लेखक सिरुसेरि यांनी गुरुवार, 19/05/2016 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार दिठेरीकरांची गढी - कथा - काल्पनीक शहरातुन दुपारी बाराच्या सुमारास निघालेली जीवनराज ट्रॅव्हल्सची बस दिठेरी गावापाशी आली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. बसमधील प्रवासी जरा पेंगुळले होते . बसमध्ये पुढच्या सीटवर बसलेले टुर मॅनेजर श्री. कारेकर हे सर्व प्रवाशांना तत्परतेने माहिती सांगु लागले . "मंडळी , दिठेरी नदीच्या काठी वसलेले गाव म्हणुन या गावालाही दिठेरी किंवा दिठेरीवाडी असे म्ह्णतात . आपण चाललो आहोत ते ठिकाण इथुन फार लांब नाही . फार तर अर्धा तास . आता हा उजवीकडे जाणारा रस्ता दिठेरी नदीवरील पुलावरुन जातो . हि नदी ओलांडली की ते पहा दिठेरी देवीचे मंदिर लागते.

एक ओपन व्यथा २

लेखक वटवट यांनी गुरुवार, 19/05/2016 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं अत्यंत गूढ घर असावं. त्या घराबद्दल खूप मतमतांतरे असावीत. बर्याच जणांची त्या घराबद्दल वेगवेगळी धारणा असावी. ह्या अश्या कुतुहुलमिश्रीत वातावरणात त्या घराकडे सगळे शंकित नजरेने बघत असावेत. त्या घराबद्दल, त्या घरामध्ये राहणार्या माणसांबद्दल नक्की आणि खात्रीलायक माहिती कोणालाच नसावी. आणि त्याचवेळेस त्या घरामध्ये जायचीही तयारी कोणाची नसावी. अश्यावेळेस एकानं धाडस करून त्या घरामध्येच जाऊन चौकशी करण्याचे ठरवावे. गेट उघडून आत जावे. आणि आता दार ठोठावण्याचा विचार करावा.