तशी गरज नाही. पण आधी हे चॉकलेट खा !
डबलक्लिकच्या आधी इथ मात्र सिंगल क्लिक! केलच पाहिजे!
==========================================================
तुडुंब भरलेली गटारं. रस्त्यावर उसळलेलं पाणी. धो धो पाऊस. फवारा उडवत आलेली कार. अन काच खाली करत बाहेर डोकावलेला फ्रेंच कट.
खरंतर अशा चिकचिकीत करायचं काय हा एक जबरदस्त प्रश्न असतो. भिजत फिरणे हा एकमेव पर्याय मी कायम निवडतो. होऊंदे सर्दी खोकला.
"हेलो बॉस, इथर न्यू सेंट्रल किधर है?" काळा गॉगल शोभत होता फ्रेंच कटवर.
माहितीचा पत्ता असेल तर सांगायला मजा येते. पण इथून न्यू सेंट्रल म्हणजे लय किचकट.
"मै उधरीच जारा हू, क्रॉसींग के उस पार"
हा अस्सा फुल भिजलेला मी. अंगावर एक म्हणून कोरडी जागा नव्हती. नाकावरची माशी उडवावी तसं काच लावून घेत तो म्हणाला
"बैठो"
झ्झूम कार निघाली. मी तर कुडकुडतच होतो. एसी लावला होता साल्याने. वर केक खात मोबाईलशी खेळत बसला होता मागच्या शिटवर. याचा ड्रायव्हर एवढा काळा असेल वाटलं नव्हतं.
"और भाई, जरा गाना बिना चला दो"
मग ड्रायव्हरनंसुद्धा नाकावरची माशी उडवली.
डोळे झाकले तर बाहेर पाऊस पडतोय हे कळलंसुद्धा नसतं. एवढी शांतता. पावसाचं सोडा, गाडीचा आवाजही कान देऊन ऐकवा लागत होता. गुबगुबित गाद्यांची अलिशान गाडी.
तेवढ्यात फ्रेंच कटचा मोबाईल वाजला.
"हा बोल मास्टर"
"..........."
"क्या?"
"..........."
"मै यहा चुदवाने नै आया"
"..........."
"तो मै क्या करु?"
"..........."
"च्युत्या समजा है क्या?'
"..........."
"बेटा, तू टेलरसे बात कर रहा है, इतना याद रख"
"..........."
"किसी का भी भोसडा फाडो, डिल तो आजही होगी"
"..........."
"चलेगा"
"..........."
"आता मै उधर"
"..........."
"१० ठिक रहेगा"
"..........."
"न्यू सेंट्रल?"
"..........."
"डन'
साला फ्रेंच कट कसला खतरनाक बोलतो. डिट्टो बेडकासारखा. खर्ज म्हणतात त्याला.
"गाडी ऑरलँड ले चलो" हा तर हुकूमच.
ड्रायव्हरनं गाडी थांबवली.
"बॉस, आप उतरो, हम उधर नै जारे"
गपचिप खाली उतरलो. खरंतर त्याला "थँक्स फॉर द लिफ्ट" म्हणायचे होते. पण गाडी झ्झूम. फवारेच फवारे.
फुटपाथवर आलो.
किती धो धो पाऊस पडतो आहे. त्याचा हाय डेफिनेशन मनात आवाज घुमतो आहे. आभाळ म्हणजे डॉल्बी डिजीटलच. फुल व्हॉल्यूमच्या राक्षसी गडागडाटात कोणीही टरकेल.
उंच उंच इमारती. गगनचुंबीच. खाली एक छोटीशी टपरी. चहाची. (ऑफकोर्स उफाळत्या)
द पॉप्युलर डेस्टिनेशन इन मुसळधार पाऊस.
जागोजागी गळणाऱ्या त्या टपरीच्या शेडमध्ये निवांतपणा असा नव्हताच. लाकडी फळकुटावर कुडकुडत मी बसलो आहे. कटींग चहा पितो आहे. वर बीडीपण ओढतो आहे.
टेलर नामक फ्रेंच कट असावा तरी कोण? डोक्यात किडा वळवळला. न्यू सेंट्रलला रात्री दहा वाजता? कसलतरी डिल? बघूयातरी.
आता कुठे सहा वाजत आले होते. चार तास करायचं तरी काय?
मग निघालो चालत, भिजत, पाणी उडवत.
न्यू सेंट्रल आलो तेव्हा रेल्वे आदळाआपट करत जात होत्या. पाऊस असला म्हणून काय झालं. घंट्याची थांबते मुंबई.
एक बाकडं पकडलं. आणि झोपलोच.
स्वप्नात पक्या दिसला. पक्या आमचे जिगरी दोस्त. श्रीहरीकृपेने आमच्याच झोपडीत राहतात. अंडी खातात. बिड्या ओढतात. रेल्वे स्टेशन त्यांना खूप आवडतं. मूळचे खिसेकापू. हाफमर्डर एक्सपर्ट. आतापावतो चार पोलीसतरी धुतलेत त्यांनी. या पावसाळ्यात कुठे ऊलथले होते त्यांचे त्यांना माहीत.
बऱ्याच वेळानं जाग आली. जबरदस्त अंधार पडला होता. आज इथच मुक्काम टाकण्यास हरकत नव्हती.
फलाटावरच्या लांब एका कोपऱ्यात गर्दी दिसली. बक्कळ पोलीसपण दिसले.
चप्पल घालून निघालोच तिकडे. धो धो पावसात चिकचिक गर्दी. रेनकोट घातलेले पोलीस कुत्री घेऊन उभे होते. फ्लॅश मारुन फोटोच फोटो.
वाट काढत मध्ये आलो तर काय, फ्रेंच कट आडवा पडलेला. पावसात त्याचं रक्तपण वाहून जात होतं. चार पाच गोळ्या तरी नक्की झाडल्या असणार. छताडावर.
घड्याळात बघितलं १०:३० झाले होते.
विश्वासच बसेना. डोक्यात भुंगा पेटला. आतापर्यंत विसरून गेलेलं ते मशीन बाहेर काढलं. प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलं होतं भिजू नये म्हणून.
मी नॉब ऍंडजस्ट केला.
क्लिक!
मग निघालो चालत, भिजत, पाणी उडवत.
न्यू सेंट्रल आलो तेव्हा रेल्वे आदळाआपट करत जात होत्या. पाऊस असला म्हणून काय झालं. घंट्याची थांबते मुंबई.
एक बाकडं पकडलं. आणि ???
नको!
ही वेळ झोपायची नाही.
बसून राहिलो तसाच. फलाटाच्या लांब कोपऱ्यावर नजर मारली. फक्त काळोख.
भिकारी येत होते, जात होते. वेळ जात गेला तशी गर्दीही कमी होत गेली.
मी एक कटींग मागवला. बऱ्याच बिड्या फुकल्या. पेपर आणून वाचला. कालीगंगा!
शेवटी घड्याळात दहाचा टोल पडला. मी सावध झालो.
जबरदस्त बॉडी असलेले चौघे जण माझ्यापुढून फलाटावरच्या कोपऱ्यात निघून गेले.
मी नॉब ऍंडजस्ट केला.
क्लिक!
भिकारी येत होते, जात होते. वेळ जात गेला तशी गर्दीही कमी होत गेली.
मी एक कटींग मागवला. बऱ्याच बिड्या फुकल्या. पेपर आणून वाचला. कालीगंगा!
घड्याळात दहाला पाच कमी होते. मी चालत चालत फलाटावरच्या कोपऱ्यात गेलो. दाट काळोखात एका झुडपाआड लपून बसलो. डेंजर पाऊस होता.
जबरदस्त बॉडी असणारे चौघे जण तिथे चालत आले. प्रत्येकाकडं एकेक छत्री. त्यातला एकाकडं तपकिरी सुटकेस. भली मोठ्ठी.
मागून फ्रेंच कट येताना दिसला. एकटाच. त्याच्या हातात एक काळी सुटकेस. छोटीशीच
हातानं क्रॉस करुन तो म्हणाला,
"जीझस"
"जय माता दी" छत्रीवाला पुढे होत म्हणाला.
"और मास्टर, साले तेरी गाडी किधर अटक गयी थी ?, चार घंटेका लॉस हुआ मेरा"
"जाणता हू, मजबूरी थी, वैसेभी तेरी फ्लाईट कल सुब्बा है"
"भाड मे जा, फटाफट माल खाली कर, अर्जंसी नै समजेगा तू"
"एक बात बता टेलर, तेरेको इतना अर्जंसी क्यूं है?"
"तुझसे मतलब? अरे तू भाडमे जाना साले, पैले मेरको माल दे"
मास्टर पिस्तूल काढून सरळ फ्रेंच कटवर रोखतो.
"सॉरी टेलरभाय, उपर से ऑर्डर है इसलिये, नै तो आपुन इस झमेले नै पडता"
"व्हाट द फक?"
"तेरी रशियन डिल पहुंच गयी है बॉसतक, बाय बाय"
धडाम धुड. धाड धाड धूडूक!
डोळ्यासमोर फ्रेंच कट जमीनीवर कोसळला. आणि दोन्ही बॅगा घेऊन चौघेजण फरार. ये डील तो बडा जबरी हुआ!
बसल्या बसल्या विचार केला. तसा आपण काही समाजसेवक नाही. पण एक शक्कल सुचली.
मी नॉब ऍंडजस्ट केला.
क्लिक!
नाकावरची माशी उडवावी तसं काच लावून घेत तो म्हणाला
"बैठो"
झ्झूम कार निघाली. मी तर कुडकुडतच होतो. एसी लावला होता साल्याने. वर केक खात मोबाईलशी खेळत बसला होता मागच्या शिटवर. याचा ड्रायव्हर एवढा काळा असेल वाटलं नव्हतं.
"और भाई, जरा गाना बिना चला दो"
मग ड्रायव्हरनंसुद्धा नाकावरची माशी उडवली.
डोळे झाकले तर बाहेर पाऊस पडतोय हे कळलंसुद्धा नसतं. एवढी शांतता. पावसाचं सोडा, गाडीचा आवाजही कान देऊन ऐकवा लागत होता. गुबगुबित गाद्यांची अलिशान गाडी.
"और टेलरभाय, क्या चल रहा है" मागे वळून बघत मी म्हणालो.
करकचून ब्रेक दाबत गाडीच थांबवली.
"कौन है बे तू?"
"म.. म.. मै मास्टर का आदमी, वो सुटकेस मेरे पास देने को बोला है" जाम घाबरलो होतो खरंतर.
"और माल?"
"वो ऑरलँड मे आपके केबिन मे मिलेगा"
"फक, तेरेको कैसे पता?, मैने तो ऑरलँड अभी बुक भी नै किया"
तेवढ्यात फ्रेंच कटचा मोबाईल वाजला.
"हा बोल मास्टर"
"..........."
"क्या?"
"..........."
"तो फिर ये पंटर कौन हे मेरे गाडीमे"
"..........."
"एक मिनीट रुक जा"
कट.
सायलेन्सर लावलेली रिवॉलव्हर बाहेर काढत तो म्हणाला.
"सीबीआय से आया तू? अब उपर जाके चोदूगिरी कर"
मी नॉब अगोदरच ऍंडजस्ट केला होता.
क्लिक!
धो धो पावसात मी सुटकेसच्या दुकानात गेलो. सेम टू सेम बॅग विकत घेतली. मास्टरसारखी. साडे तीन हजार रुपये खर्च झाले. साली बॅग हाय का भूत. मग भरले त्यात बिस्कीटाचे पुडे.
तुडुंब भरलेली गटारं. रस्त्यावर उसळलेलं पाणी. धो धो पाऊस. फवारा उडवत आलेली कार. अन काच खाली करत बाहेर डोकावलेला फ्रेंच कट.
खरंतर अशा चिकचिकीत करायचं काय हा एक जबरदस्त प्रश्न असतो. भिजत फिरणे हा एकमेव पर्याय मी कायम निवडतो. होऊंदे सर्दी खोकला.
"हेलो बॉस, इथर न्यू सेंट्रल किधर है?" काळा गॉगल शोभत होता फ्रेंच कटवर.
"डील इधरीच होगी" मी विचारपुर्वक ठोकलं.
हातातल्या तपकिरी बॅगकडं त्यानं क्षणभर बघितलं. अन चमकलाच.
"क्या मतलब?"
"मास्टरने भेजा है मुझे, वो नै आयेगा, गाडी फस गयी है उसकी, गड्डेमे"
"पर... पर.... यहा? "
"जादा सोचो मत टेलरभाय, आपका टाईम कितना किमती मालूम है हमको"
"जीझस"
"जय माता दी"
"ला चल माल दे" त्याची सुटकेस मला देत तो म्हणाला.
माझी बॅग त्याला दिली.
"मास्टर को मेरा सलाम बोलना" गाडी झ्झूम.
पावसाला आज काय मरण नव्हतं. धो धो कोसळतच होता. झोपड्याकडं झपाझप पावलं टाकत निघालो. हातात काळी बॅग होती. त्यात जबरदस्त माल असणार. डोळेच पांढरे होणार.
झोपड्यात आलो. कडी लावून घेतली. पक्या उताणा पडला होता. साला आयत्या वेळी उगवला. मला बघून जागा झाला.
विदाऊट लॉकची ती बॅग झटक्यात उघडली. माझं सोडा पक्यानेसुद्धा डोळे पांढरे केले. हजार हजाराचे बिंडेल खच्चून भरलेले. उभं आयुष्य मोजण्यात जाईल.
फटाफट घर आवरलं. सॅकमध्ये कापडं भरली. बॅगेतला रोकडा प्लास्टिकमध्ये गुंडाळून कापडात लपवला. सगळं झोपडं पुसून घेतलं. गटारात मोकळी बॅग टाकून दिली. ह्यातच वेळ गेला.
रात्रीच्या दहा वाजून गेल्या होत्या. पोलीस कधीपण टपकू शकतात. पाठीला सॅक अडकवून मी आणि पक्या जंक्शनवर आलो. समोर दिसेल त्या रेल्वेत चढलो.
धडधडत रेल्वे पळत सुटली. फ्रेंच कट जिंदाबाद म्हणत असतानाच न्यू सेंट्रलला गाडी थांबली.
मी सहज बाहेर बघितले आणि हादरुनच गेलो.
फलाटावरच्या एका कोपऱ्यात बरीच गर्दी जमली होती. रेनकोट घातलेले पोलीस पंचनामा करत होते. फ्लॅश मारुन फोटोच फोटो. मुसळधार पावसात मला दिसत होते अस्ताव्यस्त पडलेले चार मृतदेह.
जबरी फायरींग झाली असणार.
मला मशीन आठवलं. खिशामध्ये सुरक्षित होतं. बाहेर काढून मी प्रेमानं त्याच्यावर हात फिरवला. लाल बटन दाबायची आता अजिबात गरज नव्हती.
वाचने
14326
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पायला
लय झाक
विंटरन्याशनल स्टोर्या सुरु
Awsome!
:)
In reply to Awsome! by तुषार काळभोर
अहाहा!! काय सुंदर...!
भन्नाट
प्रिन्स ऑफ पर्शिया: सॅन्ड्स
बापूसाहेब!! आभारी आहे!
In reply to प्रिन्स ऑफ पर्शिया: सॅन्ड्स by कैलासवासी सोन्याबापु
डबलक्लिकच्या आधी इथ मात्र सिंगल क्लिक! केलच पाहिजे!कन्सेप्ट समजून जाईल!!आयला भारीच...
हा हा!
In reply to आयला भारीच... by संजय पाटिल
डबलक्लिकनंतर आता राइट क्लिक
In reply to हा हा! by जव्हेरगंज
गुड वन!
गोष्ट भारिये.
कोण म्हणायचे हे पहलाज निहलानी
In reply to गोष्ट भारिये. by धनंजय माने
कोट्यावधी रुपये खर्च करून
पटाईतकाका!
In reply to कोट्यावधी रुपये खर्च करून by विवेकपटाईत
जाऊ द्या हो ! कायम प्रचार मोड
In reply to पटाईतकाका! by जव्हेरगंज
बापु, कइसन हो भईया.
In reply to जाऊ द्या हो ! कायम प्रचार मोड by कैलासवासी सोन्याबापु
पतंजली?? फिर्से...?
In reply to बापु, कइसन हो भईया. by धनंजय माने
बहुदा पटाईत काकांना उडता
In reply to पटाईतकाका! by जव्हेरगंज
पटाईत काकांनी बरोबर दिलाय
In reply to बहुदा पटाईत काकांना उडता by किसन शिंदे
मस्तय..
शेवटच क्लीक आवडल
भन्नाट
जव्हेर भौ
भाउ
भन्नाट आहे कथा.
तुकडाच पाडलात राव
नाद लागलाय मशीनचा... :)
जबराट.
लै भारी!
लै भारी!
भन्नाट
+१११ एक नंबर कथा आहे.
In reply to भन्नाट by आदिजोशी
जब्बरदस्त!__/\__
जबरदस्त
___/\___
भारी.
डॉन आहात!
जबराट
जव्हेरभौ
बोकेशभाऊ,
In reply to जव्हेरभौ by बोका-ए-आझम
अशा लिखाणावर पहलाज निहलानी
जबरि
जव्हेरभौ, एक नंबर सोनं...
लै म्हणजे लैच भारी....
खरच मस्त जमत तुम्हाला
एक लंबर!
क्लिक! क्लिक! क्लिक!
जबरी