आदरांजली -१ टोबा टेक सिंह
स़ाअदत हसन मन्टो
मित्रांनो,
ज्या प्रमाणे इस्मत चुगताईच्या तीन कथांचे भाषांतर करुन मी त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचप्रमाणे अजून एका लेखकाला आदरांजली वाहतोय. तीन कथांचे भाषांतर करुन. अर्थात तुम्ही त्या वाचल्या असतील पण मी हे माझ्या समाधनासाठी लिहितोय असे समजुयात.....
आदरांजली -१ टोबा टेक सिंह
मूळ लेखक : स़ाअदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
कथेचे नाव : टोबा टेक सिंह.
फाळणीनंतर लगेचच पाकिस्तान व हिंदुस्तानच्या सरकारांच्या लक्षात आले की इतर खितपत पडलेल्या कैद्यांची अदलाबदल तर आपण केली पण वेड्यांच्या इस्पितळात खितपत पडलेल्या मनोरुग्णांची आदलाबदल करयचे राहूनच गेले. म्हणजे हिदुस्तानातील वेड्यांच्या इस्पितळात खितपत पडलेल्या मुसलमान वेड्यांना पाकिस्तानात पाठविले पाहिजे तसेच पाकिस्तानमधील इस्पितळातील हिंदू मनोरुग्णांना हिंदुस्तानात पाठविले पाहिजे.
आता हा निर्णय योग्य होता की नाही हे माहीत नाही पण दोन्ही बाजूच्या विद्वान मंडळींमधे अनेक बैठका होऊन हा ठराव दोन्ही देशात मांडण्यात आला व ठराव संमत होऊन या अदलाबदलीचा मुहुर्तही काढण्यात आला. हिंदुस्तानात ज्या मुसलमान मनोरुग्णांचे नातेवाईक इथेच राहिले होते त्यांना सोडून सर्वांची रवानगी पाकिस्तानात करण्यात आली. पाकिस्तानात मात्र जवळ जवळ सर्व हिंदू व शिख पाकिस्तानातून आधीच स्थलांतरीत झाले असल्यामुळे ही चाळणी लावायचा प्रसंगच उद्भवला नाही. जेवढे रुग्ण होते तेवढ्या सगळ्यांचीच हिदुस्थानाच्या सीमेवर पोलिस बंदोबस्तात रवानगी करण्याची योजना आखण्यात आली.
हिंदुस्थानात काय घडले याची कल्पना नाही पण इकडे पाकिस्तानात लाहोर येथे एका वेड्यांच्या इस्पितळात हा विषय मोठ्या चवीने चघळला जात होता. एका वेड्या मुसलमानाला ज्याने गेली बारा वर्षे कुराण पठणात घालविली होती त्याला त्याच्या मित्राने विचारले,
‘‘मौलवीसाब हे पाकिस्तान, पाकिस्तान म्हणतात ते काय आहे ?’’
मौलवीच्या कपाळावरील आठ्या अधिक दाट झाल्या. त्याने बराच वेळ विचार करीत, दाढी खाजवत उत्तर दिले,
‘‘अरे बाबा हा हिंदुस्थानातील असा एक भाग आहे जेथे चांगले वस्तरे बनतात.’’ हे ऐकून त्या मित्राचे समाधान होऊन तो गप्प झाला.
याच गोंधळात एका वेडसर सरदारजीने दुसऱ्या वेड्या सरदारजीला प्रश्र्न केला,
‘‘ सरदारजी हे आपल्याला हिंदुस्थानात का पाठवणार आहेत ? मला तर तेथील भाषाही येत नाही’’
दुसरा हसून म्हणाला, ‘‘मला तर हिंदुस्थानच्या लोकांचीच बोली भाषा येते. हिंदुस्तानी फार बदमाश ! स्वत:ला फार शहाणे समजतात !’’
त्याच दिवशी एका मुसलमान वेड्याने आंघोळ करता करता ‘‘पाकिस्तान झिंदाबादचे नारे इतक्या जोरात लावले की त्याला तो कुठे आहे याचे भान राहिले नाही. तो तेथेच पाय घसरुन पडला व भिंतीवर डोके आपटून बेहोष झाला. काही वेडे अट्टल गुन्हेगार होते. ते वेडे नव्हतेच. त्यांना फासावरुन सोडविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच चारुन, त्यांना वेडे ठरवून या इस्पितळात भरती केले होते. यांना मात्र हिंदुस्थान काय आहे व पाकिस्तान का होणार आहे याची थोडीफार कल्पना होती. पण अर्थातच बाहेरच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना असणे शक्यच नव्हते. वर्तमानपत्रे तेथे येत नसत व पहारेकरी तर त्यांच्यापेक्षाही अडाणी होते. त्यांना एवढेच माहिती होते की कोणी जिनाह नावाच्या माणसाने मुसलमानांसाठी वेगळा मुलुख मागितला आहे ज्याचे नाव पाकिस्तान आहे. हा कुठे आहे, याचा आकार केवढा आहे हे त्यांना काहीही माहीत नव्हते. त्यामुळे ज्यांना हिंदुस्थानमधे तेथे डांबण्यात आले होते त्यांना हे समजत नव्हते की हा हिंदुस्थान आहे तर पाकिस्तान कुठे आहे. जर ते आत्ता पाकिस्तानमधे आहेत तर काही दिवसापूर्वी ते तेथेच रहात असताना हिंदुस्थानमधे कसे होते... त्यांच्या मनात या सगळ्याचा भयंकर गोंधळ उडाला होता.
एका वेड्याच्या मनात हिदुस्थान व पाकिस्तान या दोन शब्दांनी इतका गोंधळ उडाला की की त्याला वेडाचा झटका आला. तो एक झाडू घेऊन छपरावर चढला व तेथून त्याने या नाजूक विषयावर भाषण देण्यास सुरुवात केली. त्याचे हे भाषण जेव्हा संपता संपेना तेव्हा त्याला शिपायांनी खाली उतरण्यास सांगितले त्यावर तो जोरजोरात किंचाळू लागला, ‘‘ मला हिंदुस्थानातही जायचे नाही ना पाकिस्तानात. मला येथेच या छपरावर राहुद्या !’’ बऱ्याच वेळानंतर जेव्हा त्याचा हा झटका ओसरला तेव्हा तो खाली उतरला व आपल्या शिख सोबत्यांच्या गळ्यात गळे घालून रडला. त्याला ते त्याला सोडून हिंदुस्थानात जाणार या कल्पनेनेच रडू फुटले होते. या दोन शब्दांनी त्या इस्पितळात असा भयंकर गोंधळ घातला होता. एक इंजिनिअर होता त्याने अचानक आपले कपडे फेडले व तो बागेत तसाच नागडा हिंडूफिरु लागला. त्याला कसेबसे पकडून शिपायांनी एका खोलीत कोंडले पण दुसरीकडे पार मारामारीचा प्रसंग उद्भवला. एका जाड्या मुसलमानाला तो साक्षात मोहमदअली जिन्हा असल्याचा साक्षात्कार झाला. हा पूर्वी मुस्लिम लीगचा एक कारकून होता. पाक मुसलमान असल्यामुळे याला दिवसातून शंभरवेळा आंघोळ करावी लागत असे. त्याने तो जिन्हा असल्याचे जाहीर करताच एका शीख वेड्याने तो तारा सिंह असल्याचे जाहीर केले. प्रकरण चिघळल्यावर त्या दोघांनाही धोकादायक रुग्ण म्हणून घोषीत करण्यात आले व वेगवेगळ्या खोल्यांतून डांबण्यात आले.
लाहोरचा प्रेमभंग झालेला एक तरुण वकीलही वेड लागून या इस्पितळात भरती झाला होता. त्याने अचानक सर्व हिंदू मुसलमान पुढाऱ्यांना शिव्याशाप देण्यास सुरुवात केली. त्यांच्यामुळे हिंदुस्थानचे दोन तुकडे पडले त्याची प्रेयसी आता हिंदुस्थानी होणार होती तर तो पाकिस्तानी. जेव्हा अदलाबदलीच्या वाटाघाटी सुरु झाल्या तेव्हा सगळ्यांनी त्याची समजूत काढली की त्याला आता निराश व्हायचे काही कारण नाही कारण त्याला आता त्याच्या प्रियतमेकडे हिंदुस्थानात पाठविले जाईल. पण त्याला तेथे जायचे नव्हते कारण त्याची वकिली अमृतसरमधे चालण्याची शक्यता नव्हती.
युरोपिअन वॉर्डमधे अँग्लोइंडियन वेडे ठेवले होते. जेव्हा त्यांच्या कानावर इंग्रज हिंदुस्तान सोडून जाणार ही बातमी कळली तेव्हा ते गंभीरपणे तसनतास या विषयावर चोरुन चर्चा करु लागले. त्यातून त्यांनी हा निष्कर्ष काढला की या वेड्यांच्या इस्पितळात आता त्यांचे कसे होणार ! हा खरा प्रश्र्न आहे. हा वॉर्ड राहणार का बंद होणार...ब्रेकफास्ट मिळणार का नाही...ब्रेड ऐवजी आता त्यांना ब्लडी रोटी खावी लागणार की काय.... अशा अनेक महत्वाच्या विषयांवर् ते कुजबुजत चर्चा करु लागले.
एक शिख वेडा होता ज्याला या वेड्यांच्या इस्पितळात येऊन जवळजवळ पंधरा वर्षे झाली होती. तो स्वत:शी काहीतरी विचित्र, सतत पुटपुटत असे. बऱ्याच प्रयत्नांनंतर इतरांना तो काय म्हणतो हे कळले. तो पुटपुटत असे,
‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल उफ दी लालटिन...’’
पहारेकऱ्यांचे असे म्हणणे होते की तो गेल्या पंधरा वर्षात कधीही आडवा झालेला त्यांनी बघितलेले नाही. कधी कधी मात्र भिंतीला टेकून तो उभा रहायचा. सतत उभे राहिल्यामुळे त्याचे पाय कायम सुजलेले असत. सुजुन सुजुन त्याचे पाय हत्तीसारखे झाले होते. जेव्हा केव्हा इतर वेड्यांमधे हिंदुस्थान, पाकिस्तान व रुग्णांच्या अदलाबदलीबद्दल चर्चा होई तेव्हा मात्र तो ती कान देऊ ऐकत असे. कोणी कधी त्याचे मत विचारलेच तर तो मोठ्या गंभीरपणे उत्तर देत असे, ‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी वॉल ऑफ दी पकिस्तान गव्हर्नमेंट...’’ नंतर नंतर ‘‘ऑफ दी पकिस्तान गव्हर्नमेंट’’ याची जागा ‘ऑफ दी टोबा टेक सिंह गव्हर्नमेंट’’ ने घेतली. हे झाल्यावर मात्र त्याने माझे गाव टोबा टेक सिंह कुठे आहे असे विचारण्यास सुरुवात केली. पण दुर्दैवाने ते गाव कुठे आहे हे कोणालाच माहिती नव्हते. सगळा गोंधळच होता. जे कोणी उत्तर देण्याचा प्रयत्न करीत त्यांना आज हिंदुस्तानात असलेले सियालकोट आता पाकिस्तानात येणार आहे असे वाटे, तर कोणी म्हणत लाहोर जे आज पाकिस्तानात आहे उद्या कदाचित हिंदुस्थानात जाईल किंवा सारा हिंदुस्थानच पाकिस्तानमधे जाईल...तर कोणी म्हणत पाकिस्तान आणि हिंदुस्थान दोन्हीही राहणार नाही बहुतेक...
या शिखाच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. कधीतरी आंघोळ करीत असे..डोक्यावरील केस व दाढीच्या केसाचा गुंता झला होता व या सगळ्या प्रकाराने त्याचे रुप भयंकर दिसत असे. पण माणूस होता एकदम सभ्य.. गेल्या पंधरा वर्षात त्याला दुसऱ्याला उलटून बोललेलेसुद्धा कोणी पाहिलेले नव्हते. जे जुने रुग्ण होते ते सांगत की टोबा टेक सिंहमधे त्याची शेकडो एकर जमीन होता पण डोके फिरले आणि चांगल्या खात्यापित्या घरच्या हा जमिनदाराला त्याच्या नातेवाईकांनी जाडजुड साखळदंडामधे जखडले व या इस्पितळात भरती केले. महिन्यातून एकदा ते त्याला भेटण्यास येत व त्याची विचारपूस करुन चालते होत. या हिंदुस्थान, पाकिस्तानच्या धांदलीत मात्र हे नातेवाईक आले नाहीत, का येऊ शकले नाहीत याची कल्पना नाही. या शिखाचे नाव होते बिशन सिंह पण सगळे त्याला टोबा टेक सिंह म्हणूनच हाका मारीत. टोबा टेक सिंहला दिवस, महिना व वर्षाचे भान उरले नव्हते. त्याला येथे येऊन किती वर्षे झाली हेही त्याला माहीत नव्हते. पण त्याला प्रत्येक महिन्यात ज्या दिवशी त्याला भेटण्यास त्याचे नातेवाईक येणार आहेत त्या दिवसाची बरोबर जाण होती. घाणेरडे कपडे घालणारा बिशनसिंह त्या वेळेस मात्र साबण लावून, आंघोळ करुन, चांगले कपडे घालून केस विंचरुन तयार होई व वॉर्डाच्या कार्यालयात जाऊन सांगे की त्याला आज भेटायला येणार आहेत. कोणी विचारले तर तो उत्तर देत असे, ‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल ऑफ दी लालटिन...’’
त्याला एक मुलगी होती जी पंधरा वर्षात वाढत वाढत तरुण झाली. बिचारी लहान होती तेव्हाही आपल्या बापाला पाहून रडे व आताही बापाला पाहिल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागत कारण बिशनसिंह आता तिला ओळखतच नसे.
हा हिंदुस्थान, पाकिस्तानचा किस्सा चालू झाला तेव्हा मात्र त्याने इतर वेड्यांना विचारण्यास सुरुवात केली, ‘‘टोबा टेक सिंह कुठे आहे ? हिंदुस्थान की पाकिस्तान ?’’ या प्रश्र्नाचे मनासारखे उत्तर न मिळाल्यामुळे त्याचे वेड वाढतच गेले. आता त्याला भेटण्यासही कोणी येत नसे त्यामुळे बिचाऱ्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली.
त्याच वॉर्डात एक वेडा होता तो स्वत:ला खुदा समजत असे. एक दिवस बिशन सिंहने त्याला विचारले,
‘‘ माझे टोबा टेक सिंह कुठे आहे ? पाकिस्तानात का हिंदुस्तानात ?’’ यावर सवयीने गडगडाटी हास्य करीत तो म्हणाला,
‘‘ते पाकिस्तानमधे नाही आणि हिंदुस्थानातही नाही कारण मी अजून त्याबाबतीह हुकुम दिलेला नाही’’.
बिशन सिंहाने त्याला कळवळून सांगितले की त्याने एकदाचा तो निर्णय देऊन टाकावा म्हणजे हे झंझट मिटेल. पण खुदा म्हणाला,
‘‘ मला इतके निर्णय घ्यायचे आहेत की याच्यासाठी माझ्याकडे वेळच नाही. मी तरी काय करु ?’’ ही उत्तरे ऐकून एक दिवस बिशन सिंह वैतागून म्हणाला,
‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल ऑफ दी..... वाहे गुरु जी दा खालसा अँड वाहे गुरु की फतेह..जो बोले सो सत् श्री अकाल. बहुदा त्याचा अर्थ ‘‘तू मुसलमनांचा खुदा आहेस...शिखांचा खुदा असता तर माझे म्हणणे त्याने जरुर ऐकले असते’’.
रुग्णांच्या अदलाबदलीच्या थोडे दिवस आधी टोबा टेक सिंहचा एक मुसलमान मित्र त्याला भेटण्यास आला. या अगोदर तो तेथे कधीच आला नव्हता. त्याला बघून बिशन सिंह तेथून निघून जाऊ लागला. एका शिपायाने त्याला अडविले,
‘‘हा तुझा मित्र आहे. फ़ज़लदीन ! तुला भेटायला आला आहे.’’.
बिशन सिंहने फ़ज़लदीनकडे एक नजर टाकली व तो बडबडायला लागला. त्याची ती अवस्था पाहून फ़ज़लदीनने त्याच्या खांद्यावर आपले हात ठेवले.
‘‘ मी बऱ्याच दिवसापासून तुला भेटण्याचे ठरवीत होतो पण वेळच मिळाला नाही.... तुझी सगळी माणसे हिंदुस्थानला सुखरुप पोहोचली. मला शक्य होती तेवढी मदत मी केली... तुझी मुलगी रुप कौर....’’ असे म्हणून तो थबकला. बिशन सिंहला काहीतरी आठवत होतं... हंऽऽऽऽबेटी रुपकौर...
फ़ज़लदीनने वाक्य पुरे केले, ‘‘ हा बेटी रुपकौर, तीही त्यांच्याबरोबर हिंदुस्थानला गेली.’’
बिशन सिंह गप्प राहिला.
‘‘त्यांनी मला तुझी चौकशी करायला सांगितले होते. मी ऐकले की आता तूही हिंदुस्थानला जातो आहेस. भाई बलबीर सिंह आणि भाई वधवा सिंहाला माझा सलाम सांगा... आणि बहन अमृत कौरलाही माझा सलाम... भाई बलबीरला सांगा त्याने ज्या दोन गाभण म्हशी माझ्याकडे सोडल्या होत्या त्या विल्या..... आणि सांगा माझ्यासाठी काही काम असेल तर जरुर सांगा. संकोच करु नका... तुमच्यासाठी थोडे मरोंडे आणले आहेत... ’’
बिशन सिंहने ते बाचके घेतले आणि शिपायाला देऊन टाकले व फ़ज़लदीनला विचारले,
‘‘ टोबा टेक सिंह कुठे आहे ?’’
‘‘कुठे असणार ? जेथे आहे तेथेच आहे !’’ त्याने गडबडून उत्तर दिले.
‘‘पाकिस्तानात का हिंदुस्थानमधे ?’’
‘‘हिंदोस्थान ? नाही...पाकिस्तानातच आहे.’’
बिशनसिंग बडबडत तेथून निघून गेला. ‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल ऑफ पाकिस्तान अँड हिंदोस्थान दरफ़टे मुह...’’
अदलाबदलीची सगळी तयारी पूर्ण झाल्यावर इकडच्या आणि तिकडच्या वेड्यांना वाघा सीमेवर पोचविण्यात आले. दिवसही मुक्रर झाला. थंडी मी म्हणत होती. इकडचे वेडे आणि तिकडचे वेडे यांची अदलाबदल रात्रभर चालू राहणार होती. मोठे कठीण काम होते ते. काही जण बाहेर पडतच नव्हते तर काही उड्या मारुन पळत होते. ज्यांना कपड्यांची शुद्ध नव्हती त्यांना कपडे घालण्यात येत होते तर काही वेडे घातलेले कपडे फाडण्यात मग्न होते. यातच सर्व स्त्रियांना वेगळे करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु होता. काही ओरडत होते तर काही मोठ्या आवाजात गात होते. वेड्या स्त्रियांचा गोंधळ वेगळाच होता. थंडी तर इतकी होती दातांवर दात आपटत होते. बऱ्याच वेड्यांना त्यांना त्यांच्या मुळापासून उखडून दुसरीकडे फेकून देत आहेत हेच उमगत नव्हते. ज्यांना थोडेफार उमगत होते ते पाकिस्तान मुर्दाबाद किंवा पाकिस्तान झिंदाबदच्या घोषणा तारस्वरात देत होते. काही वेळा हमारतुमरीही झाली...
जेव्हा बिशन सिंहाचे नाव पुकारले गेले तेव्हा बिशनसिंहाने त्याचे नाव लिहिणाऱ्या अधिकाऱ्याला विचारले, ‘‘ टोबा टेक सिंह कुठे आहे ? पाकिस्तानात की हिंदोस्थानात ?
‘‘पाकिस्तानात !’’ त्या अधिकाऱ्याने सांगितले. हे ऐकल्यावर बिशन सिंह तेथून पळाला व आपल्या पाकिस्तानी सोबत्यांकडे गेला. पाकिस्तानी शिपाई त्याला सीमेच्या पलिकडे नेण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांनी त्याला खूप समजावले की टोबा टेक सिंह आता हिंदोस्थानात गेले आहे, तुही जा पण त्याने एकही पाऊल पुढे टाकण्यास नकार दिला. आपल्या सुजलेल्या पायावर भार टाकत तो असा उभा राहिला की जणू आता त्याला आता तेथून कोणी हलवू शकत नाही. तो जोरजोरात किंचाळू लागला,
‘‘ओपड दी गड गड दे अनेक्स दी बे ध्याना दी मंग दी दाल ऑफ टोबा टेक सिंह अँड पाकिस्तान’’ निरुपद्रवी बिशन् सिंहला त्यांनी तेथेच तसेच सोडले व ते आपल्या पुढील कामास लागले.
पहाटे सूर्याचे पहिले किरण फाकले आणि खाली पडलेल्या बिशन सिंहच्या तोंडातून आकाश भेदणारी ह्रदयद्रावक किंकाळी बाहेर पडली. ती ऐकू आजुबाजूचे सैन्यातील अधिकारीही तेथे धावत गेले. बिशन सिंह जो गेले पंधरा वर्षे जमिनीवर झोपला नव्हता आता जमिनिवर निपचित पडला होता.
त्याच्या पुढ्यातील काटेरी तारांच्या कुंपणापलिकडे हिंदुस्थान होता तर त्याच्या मागच्या काटेरी तारांमागे पाकिस्तान.
या दोन कुंपणाच्या मधील जागेत, ज्याला काही नाव नव्हते त्यावर टोबा टेक सिंह त्याच्या पायांना अखेरची विश्रांती देत पहुडला होता.....
भाषांतर : जयंत कुलकर्णी.
क्रमश:

Book traversal links for आदरांजली -१ टोबा टेक सिंह
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सादत हसन मंटो _/\_
_/\_
वाचतोय....
येवु द्या... पुभाप्र...
मंटोंची कथा म्हणजे प्रश्नच
मस्त! अनुवाद छान जमलाय.
बापरे
गामा पै.,
आवड आहे.
अरे वा, जयंतराव तुमच्या
खूप भावली कथा मनाला...
+ १
सर्वांना धन्यवाद !
अनुवाद आवडला, कथा आवडली
+१
खूप छान लिहलय सर
छान आहे.
छान झालाय अनुवाद!
सुंदर अनुवाद!
http://www.misalpav.com/node
http://www.misalpav.com/node
मस्त रुपांतर जयंतराव. आवडले.
__/\__
जबरी कथा!!!
आई गं. कथा वाचुन खरेच वाईट
खूप भेदक व सुंदर कथा.
उत्तम भाषांतर
एकदम मस्त
ओहहो
अनुवाद आवडला.
सुंदर
मस्त सर!
कसंसंच झालं..
ही कथा सुद्धा आवडली! आधी खोल
जबराट
ऊत्कृष्ठ अनुवाद अतिशय आवडला जबर कथा
नशीब माझे, मूळ कथा नंतर
अरे सर काय गंमत करताय
या गोष्टीवर एक लघुपट येतो आहे