Skip to main content

कथा

Dead Man's Hand - ९

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 13/04/2018 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
रोहितचा चेहरा पाहताच काहीतरी भानगड आहे याची कदमना कल्पना आली होती. त्याने पुढे केलेल्या कागदावरच्या त्या मेसेजचा अर्थ लक्षात येताच ते सुन्नपणे त्याच्याकडे पाहतच राहीले. एक शब्दही न बोलता त्याने खंडाळा पोलीस स्टेशनला फोन केला आणि फोन आढळलेल्या जागेचं साधारण लोकेशन सांगून त्यांना चौकशी करण्याची विनंती केली. पाठोपाठ मुंबईला येण्यासाठी निघालेल्या देशपांडेंना खंडाळा गाठण्याची सूचना देण्यासही तो विसरला नाही. दरम्यान कदमनी किरणच्या मोबाईलला कॉल लावला होता. रिंग जात होती पण किमान पाच - सहा वेळा प्रयत्नं करुनही किरण फोन उचलत नव्हता.

Dead Man's Hand - ८

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 12/04/2018 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
रिझवानच्या मृत्यूला पंधरा दिवस उलटले होते.... उत्तर प्रदेशात गेलेले रिझवानचे कुटुंबिय मुंबईत परतल्यावर त्यांनी एकच गोंधळ घातला होता. त्याच्या अंत्यविधीच्या वेळेस त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह बांद्रा पोलीस स्टेशनच्या आवारात आणून ठेवला आणि त्याचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून आहे आणि पोलीस त्याच्या खुन्याला अटक करत नाहीत तोपर्यंत त्याचं दफन करणार नाही असा पवित्रा घेतला! रिझवान हा आमदार चव्हाणांच्या मुलाचा जवळचा मित्रं असल्याने विरोधी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या त्याच्या नातेवाईकांना चिथावण्यास सुरवात केली होती.

Dead Man's Hand - ७

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 11/04/2018 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
बांद्र्याच्या न्यू गार्डन व्ह्यू सोसायटीचा वॉचमन मिथिलेशकुमार भूमिया सोसायटीच्या गेटशेजारी असलेल्या आपल्या चौकीत बसून मोबाईलवर गाणी ऐकण्यात गुंग झाला होता. अठ्ठावीस वर्षांचा मिथिलेश गेल्या दोन वर्षांपासून ही वॉचमनची नोकरी करत होता. सतत येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांमुळे आणि सोसायटीच्या इतर कामांमुळे दिवसभर धावपळ होत असली तरी नाईट शिफ्टला तसा आरामच होता, त्यामुळे तो नाईटलाच येणं पसंत करत असे. त्याचा जोडीदार असलेल्या बसंतकुमारलाही ते मान्यं होतं, कारण बसंत हा बालबच्चेवाला होता, त्यामुळे सहसा नाईटला तो नाखूश असायचा. गाण्याचा आवाज चिरत आलेल्या कारच्या कर्कश्श् हॉर्नमुळे मिथिलेशची तंद्री भंगली.

दोसतार-६

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 11/04/2018 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42377
या शंकेत हसण्यासारखे काय होते कोण जाणे. घाटे सरांना प्रचंड हसू आले. पोट धरून ते हसत राहिले. सरच हसता आहेत म्हंटल्यावर सगळा वर्ग हसायला लागला. निमीत्तच हवं होतं कायतरी. हे हसू थांबतय न थांबतय तोच दारात महादू शिपाई येवून उभा राहिला.
तो दारात उभा राहिल्याचे कोणाच्याच लक्ष्यात आले नाही. सरांसहीत सगळा वर्गच हसण्यात सामील होता .

Dead Man's Hand - ६

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 10/04/2018 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईलवर अनोळखी नंबर दिसताच उदयच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं. कोणाचा फोन असावा? "हॅलो...." "......" "येस, थिस इज उदय इनामदार, व्हू इज धिस?" "उदय, मी......" "व्हॉट अ सरप्राईज..... ओह रिअली? ग्रेट..... " "......" "शुअर! आय विल बी देअर अ‍ॅट अराऊंड एट!" ****** रात्रीचे अकरा वाजत आले होते. रोहित झोपण्याच्या तयारीत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. कदमांचं नाव पाहताच तो क्षणभर चमकलाच. काय झालं असावं? या विचारातच त्याने फोन उचलला. "बोला कदम....." "सर....." "आर यू शुअर कदम?....

दोसतार-५

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 10/04/2018 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://misalpav.com/node/42365
इतक्यात तिसरी घंटा झाली. गजेंद्रगडकर बाई ही वर्गात आल्या. सगळॅ जणगणमन साठी उभे राहिले. संपल्यावर खाली बसले. बाईनी उपस्थिती घेतली. आमच्या डोक्यातून दप्तराचा विषय काही जात नव्हता. समोरचा रिकामा बेंच दुसरे काही सुचूच देत नव्हता.
सुदैवाने तो इतिहासाचा तास होता. त्यामुळे वही किंवा पुस्तकाची फारशी गरज पडणार नव्हती. खरेतर इतिहास हा विषय का शिकायचा असतो कोण जाणे. कोणत्यातरी राजाने कोणावर तरी आक्रमण केले आणि कोणाला फाशी दिली, कोणी उठाव करुन कोणाचे मुंडके उडवले....

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू –२

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 09/04/2018 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
भुलीची कोठी आणि त्यासाभोवातलचा रिकामा माळ, जो भुलीचा माळ म्हणून ओळखला जाई, आमच्या गावातले एक कुप्रसिद्ध ठिकाण होते. गावाच्या बाजूने वळण घेऊन वाहणाऱ्या नदीच्या पलीकडच्या बाजूला दगडाधोंड्यांची एक उतरंड नदीचा चढाव चढत गेली होती. त्यातले काही दगड जुनेपुराणे ताशीव घडीव तर काही अनवट. त्या उताराच्या वरच्या अंगाला काही शेते राने आणि मग एक प्रचंड माळ होता. दहा एक एकर तरी असेल. माळ संपला की काही तुरळक शेते, राने आणि मग जंगल सुरु होत होते. माळाच्या मध्यावर काळ्या करंद घडीव दगडांची प्राचीन वास्तू होती. तिला भुलीची कोठी म्हणत. या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे तिला एकही दरवाजा अगर खिडकी नव्हती.

Dead Man's Hand - ५

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 09/04/2018 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे साडेचार वाजता मोबाईलच्या रिंगने रोहितला जाग आली. एवढ्या पहाटे कोणाचा फोन असावा या विचारात त्याने मोबाईलवर नजर टाकली असता स्क्रीनवर नाव दिसलं - संजय कदम! ज्या अर्थी एवढ्या पहाटे कदमनी फोन केला त्या अर्थी नक्कीच काहीतरी मोठी भानगड असणार याची त्याला कल्पना आली. "गुड मॉर्निंग कदम! काय झालं?" "सर......" "व्हॉ SS ट?" रोहित ताडकन बेडवरुन खाली उतरला, "आर यू शुअर कदम?" "येस सर! खुद्दं किरण चव्हाणने १०० नंबरला ही इन्फॉर्मेशन दिली आहे! अंधेरी पोलीस तिथे आल्यावर आपल्या माणसाने चौकशी केली असता ही बातमी कळली सर!" "कदम, तुम्ही ताबडतोब तिथे जा आणि अंधेरी पोलिसांकडून सगळी सूत्रं तुमच्या हाती घ्या.

होत अस कधी कधी

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 07/04/2018 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
होत अस कधीतरी कधीतरी काहीतरी राहून जात. निवांत वेळी अचानक आठवत रहात. ऑफीस मध्ये कुठल्यातरी विषयावर प्रेझेंटेशन चालू आसत.तुम्ही त्यात असता आणि नसताही. कधी तरी अस होतेही किंवा होतही नाही. समोरच्या सफेद पडद्या वर अचानक तुमच्या आयुष्यातील क्षण चित्रे नव्हे स्थिर चित्रे दिसायला लागतात. तुम्ही दचकता इतराना तुमच्या मनातले पडद्यावर दिसतेय म्हणोन.

दोसतार - ४

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 07/04/2018 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : https://misalpav.com/node/42343 हा मोका साधून म्हादू शिपायाने एकदम बोलो भारत माता की ...असे म्हंंटले. त्यावर पोरानी ही हात उंचावून जोरात जय म्हंटले आणि आमचे समूहगीत संपवले. मटंगे बाईनी आम्हाला गायन वर्गात चला अशी खूण केली. पण त्याकडे लक्ष्य न देता काय व्हायचं ते होऊ दे म्हणत आम्ही मुलांमधे जाऊन बसलो. त्या दिवशी कार्यक्रम संपला तसे आम्ही तेथूनच पसार झालो.