सुवर्चला, ह्या कोणाच्या कोण बरे ?
मागच्या आठवड्यात नरसिंह जयंती निमीत्ताने एका मंदिरात जाणे झाले. मंदिराचे नाव लक्ष्मी- नरसिंह मंदिर होते , माझ्या सोबतच्या अलिकडील जनरेशनच्या एका नरसिंहभक्ताने लक्ष्मीचे नाव नरसिंहासोबत कसे ? हा प्रश्न विचारला ! बहुधा , नरसिंह हा वीष्णूचा अवतार म्हणून, असे त्रोटक उत्तर दिले कारण मलाही तेवढाच अंदाजा. सोबतच्या व्यक्ती तेवढ्यावर थांबली हे बरे झाले. 'अमूक हा तमूकचा अवतार म्हणून तमूकच्या पत्नीचे अमूक सोबत नाव जोडणे' असा काही अवघड प्रश्न त्याक्षणी नाही विचारला गेला हे नशीब कारण पुराणकारांप्रमाणे हजर जवाबी कथा तयार करण्याचे कौशल्य आपल्यात -म्हणजे माझ्यात- नाही.
मिसळपाव