Skip to main content

कला

आमंत्रण - जीवनशाळांचा बालमेळा!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो. यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.

दी क्लिन (बोल्ड) पिक्चर!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 05/01/2012 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
दी क्लिन (बोल्ड) पिक्चर! त्या पिक्चरच्या नावात जरी ‘डर्टी’ शब्द मुद्दाम टाकला असला तरी एका सत्यकथेची ती क्लीन स्टोरी असून ती पाहतांना त्यातील बोल्ड सीन्स ओघानेच अंगावर येत राहतात व नेमकं फिल्म इंडस्ट्रीत असंच घडतं का? या मंथनात रंगलेला प्रेक्षकच अखेरीस क्लीनबोल्ड होऊन थिएटरच्या बाहेर येतो... कथानक सर्वांना परिचित वाटावं असंच असलं तरी यशाच्या शिखरावर असतांना अल्पावधीत प्राप्त केलेलं ते भौतिकसुख कसं बोचू लागतं, कसा पलटवार करू पाहतं आणि एकदा जिंकलेला जुगार कसा लगेच हारावा लागतो याचं मोठं संयमी चित्रण करण्यात फिल्म यशस्वी ठरली आहे. थोडक्यात ‘विषय’ असा फुलत जातो... ती एक अल्लड मुलगी- रेश्मा.

सत्यम-शिवम-सुंदरम

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 03/01/2012 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावरील व्यक्तीरेखा “स्पा”, यांनी माझे गाव हा लेख लिहीला आणि तो माझ्या वाचनात आला. खरे तर असे गाव कित्येकांचे असू शकेल. मात्र ज्या ज्या गोष्टी वास्तव (सत्यं), पवित्र (शिवं), सुंदर (सुंदरम्‌) वाटाव्यात, त्या त्या सर्व गोष्टींचा आलेख तपशीलवार काढावा तसा तो लेख, मला वाटला. त्या लेखातील उदात्त स्मृतींच्या सान्निध्यात सतत राहावे असे मला वाटू लागले. असेही वाटले की असे सुंदर घर, गाव सोडून लोकं डोंबिवलीत येऊन राहूच कशी शकतात? असो.

शांतिनिकेतन- काही प्रकाशचित्रे

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 02/01/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मागे शांतिनिकेतन या धाग्यात वचन दिल्याप्रमाणे आज तिथले काही निवडक फोटो इथे डकवत आहे. शांतिनिकेतन मध्ये कला विभागात लहान मुलांना संस्कृतीदर्शन व्हावे यासाठी काही भित्तीशिल्पांची निर्मिती करण्यात आली आहे.

हरीनाम सप्ताह (स्थळ नागाव अलिबाग) मध्ये मी काढलेल्या रांगोळ्या

लेखक कान्होबा यांनी सोमवार, 26/12/2011 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
बेळगाव निवासी परमपूज्‍य आई श्री कलावती देवी यांच्‍या कृपाशिर्वादाने पांढरा मारूती मंदीर, हटाळे येथे हरिनाम सप्‍ताह सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2011 ते रविवार दिनांक 18 डिसेंबर 2011 असा पार पड्ला या सात दिवसात मी काढलेल्या रांगोळ्या दिनांक ११ डिसेंबर काढ्ण्याची वेळ रात्री १० ते २ आदिनारायण परमेस्वर मानवरुपे प्रुथ्वी वर झाला वसुदेव देवकी कुमर भगवान विष्नू दिनांक १