मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेवजह

भरत्_पलुसकर · · जनातलं, मनातलं
परवा एका मित्रान हे गाणं पाठवलं. पहिल्यांदा वाटलं काहीतरी रॉक ढिन्कच्याक असेल. पण आश्चर्याचा धक्का बसला. पूर्ण गाणं ऐकून झालं तेव्हा तर अगदी शांत वाटतं होतं. मग हेच गाणं लूप मधे सुरू आहे सध्या. पहिल्यांदा सगळ्याच शब्दांचे अर्थ नाही कळले. पण जे ऐकतोय ते काहीतरी भारीये एवढ कळत होतं. गाण्याचा पहिलाच शब्द हिज्र ए यारा हाच कितीतरी वेळ कळत नव्हता. पण त्याने गाण्याची मजा काहीच कमी नाही झाली. शेवटी रेखतावर त्याचा अर्थ सापडला. प्रिय व्यक्तीपासून दुरावा. म्हणजे मला वाटत होतं की हे गाणं प्रिय व्यक्तीला उद्देशून आहे पण हा तर पठ्ठा त्या दुराव्यालाच उद्देशून गाणं म्हणतोय! अगदी साधीशी गोष्ट. त्याच्या अगदी जिवाभावाची मैत्रीण त्याच्यापासून दूर गेलीये. तर तो तिला काहीच नाही म्हणत. त्याला तक्रार आहे त्या दुराव्याची. काही कारण नसताना हा दुरावा त्याला छळतोय. तस काहीच कारण नसताना हा दुरावाच कारण बनलाय. आता मनाला कसं सांभाळू? ही धावणारी वेळ थांबवता येईल का इथेच? वेडं मन आधीच तिच्या प्रेमात स्वतःला झोकून द्यायला चाललंय. विनाकारणच! तस तर मी तिला कधीचाच विसरलोय. आता माझ्या मना तू उगाच हा विषय पुढे वाढवू नको. मी काही ठरवून तिचं नाव घेतलं नाही. कसा कुणास ठाऊक तिचा विषय निघाला काहीच कारण नसताना. तिला भेटण्यासाठी माझ्याकडे कारण तर काहीच नाही पण तरी हे मन का बर कारण शोधत राहत काहीच कारण नसताना? गाण्याची थीम काही फार नवीन नाही. जवळपास सर्वच प्रेमकाव्य याच आशयाची असतात. तरीही या गाण्याची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याचा मूड. त्या शब्दांचा स्वतःचा असा मूड आहे आणि गायकानी तो सही सही पकडलाय. अगदी अलगद त्या जिवलगाच्या जवळ नेऊन ठेवणार हे गाणं नक्की ऐका. विडीयो (संपादकाना विनंती, विडीयो इथेच दिसेल असं करता येईल का क्रुपया )

वाचने 1465 वाचनखूण प्रतिक्रिया 3

बाबा योगिराज 23/05/2016 - 00:07
गाणं नंबरी आहे. कोक स्टुडियो ची सगळी गाणी श्रवणीय आहेत. मला कोक स्टुडियो हा प्रकार खूपच भावला.