स्वप्नांचे कवडसे
लेखनविषय:
लँग्स्टन ह्यु या अमेरिकन कवीची ही एक कविता फार आवडली, तिचा अनुवाद करण्याचा प्रयत्न.
पंखांसारखे हात पसरून
स्वच्छ उन्हात नाहत
स्वत:भोवती गिरक्या घेत रहावं, नाचावं
सूर्य मावळेस्तोवर..
आणि मग खुशाल पहुडावं गार वारं अंगावर घेत
उंच, डेरेदार वृक्षाच्या छायेत संध्याकाळी
आणि रात्र अलगद उतरावी
काळीसावळी, माझ्यासारखी.
असं माझं स्वप्न आहे..
पंखांसारखे हात पसरून
टळटळीत उष्ण दुपारी
नाचावं! गिरक्या घ्याव्या! झपुर्झा व्हावं!
आणि दिवस चटकन सरावा
उदास संध्याकाळी पाठ टेकावी
उंच, किरकोळ झाडाजवळ
रात्र तशीच यावी अलगद
काळीशार. माझ्यासारखीच..
वाचन
2379
प्रतिक्रिया
0