मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद

नरेंद्र गोळे · · जे न देखे रवी...
पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद (१ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत) मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८११०७ १ महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः . तुझा ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता स्तुती ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता मला वाटे गावे अवगत जसे स्तोत्र तव ते शिवा स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे २ अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोः अतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः . मनाने वाचेने कथुन महिमा सरत न तुझा श्रुती नाही, नाही, वर्णन असे करत असते परी साकाराचे किति गुण कथू लोक म्हणती मनाला वाचेला न कळत परी चित्र रचती ३ मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवतः तव ब्रह्मन किंवागपि सुरगुरोर्विस्मयपदम मम त्वेतांवाणींगुणकथनपुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन पुरमथन बुद्धिर्व्यवसिता . कशी वाणी केली अमृतमय तू निर्मित अशी तुला ब्रम्हा किंवा सुरगुरुस्तुती स्तिमित न करी नसो आश्चर्याचे, तरि करत मी वर्णन तुझे शिवा माझी बुद्धी गुणकथन पुण्यात रमते ४ तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत त्रयीवस्तु व्यस्तं तिस्रुषु गुणभिन्नासु तनुषु अभव्यानामस्मिन वरद रमणीयामरमणीं विहन्तुंव्याक्रोशींविदधत इहैके जडधियः . जगाची उत्पत्ती, स्थिति, विलय देवा घडवसी तुझे हे ऐश्वर्य, सत-रज-तमा दे परिणती मनोहारी भासे वरद तव हे रूप बरवे न रूपा जाणूनी, जड जन पहा क्षोभ करती ५ किमीहः किंकायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसर दुःस्थो हतधियः कुतर्कोऽयं कांश्चित मुखरयति मोहाय जगतः . निराकाराने हे जगत सगळे काय घडले तया आधाराला सृजन कसले साधन ठरे तुझे हे ऐश्वर्य न कळत असे लोक सगळे कुतर्कांनी होती मुखर, करण्या मोहित मते ६ अजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि जगतां अधिष्ठातारं किंभवविधिरनादृत्य भवति अनीशो वा कुर्याद भुवनजनने कः परिकरो यतो मन्दास्त्वांप्रत्यमरवर संशेरत इमे . न का ईशावीणा जग घडवणे संभव असे न का आधाराची गरजच तया भासत असे कुतर्काने ऐशा कलुषितच ज्यांचे मन अती तुझ्या लीलांनाही बघुन न असे मान्य म्हणती ७ त्रयी साङ्ख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च रुचीनांवैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव . असो सांख्यांचेही, शिवमत व विष्णूप्रिय जरी अशा मंतव्यांना हितकर असे मार्ग मिळती रुची वैविध्याने अवघड, सुधे पंथ धरती परी सार्‍यांनाही, तव वरच वाटे परिणती . ८ . महोक्षः खट्वाङ्गं परशुरजिनं भस्म फणिनः कपालं चेतीयत्तव वरद तन्त्रोपकरणम सुरास्तांतामृद्धिंदधति तु भवद्भूप्रणिहितां न हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति . कपाली, संपत्ती, परशु, जिन, सर्पादी, भस्मे तुझ्या संसाराचा रथ फिरत त्यांचेसह असे सुरांना लाभे श्री, लव उचलिता तूच भुवई कळे ज्याला त्याला, विषय सगळे ना भ्रमवती . ९ . ध्रुवं कश्चित सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं परो ध्रौव्याऽध्रौव्ये जगति गदति व्यस्तविषये समस्तेऽप्येतस्मिन पुरमथन तैर्विस्मित इव स्तुवन जिह्रेमि त्वांन खलु ननु धृष्टा मुखरता . जगा काही नाशी, म्हणत अविनाशी जग कुणी असा विचारांचा असत सगळा गोंधळ जगी तरीही पाहोनी जग स्तिमित लीलेत तुझिया स्तुती वाचेने ही, उगंच नच वाचाळपण हे . १० . तवैश्वर्यं यत्नाद यदुपरि विरिञ्चिर्हरिरधः परिच्छेतुंयातावनिलमनलस्कन्धवपुषः ततो भक्तिश्रद्धा-भरगुरु-गृणद्भ्यांगिरिश यत स्वयं तस्थे ताभ्यांतव किमनुवृत्तिर्न फलति . तुला ब्रम्हाविष्णू हुडकत वरी आणिक तळी तिथे नाही नाही म्हणत मग झाले चकितही तुझ्या ऐश्वर्याने स्तिमित करती कौतुक तुझे शिवा भक्तीश्रद्धा धरुन मिळसी निश्चितपणे . ११ . अयत्नादासाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरं दशास्यो यद्बाहूनभृत-रणकण्डू-परवशान शिरःपद्मश्रेणी-रचितचरणाम्भोरुह-बलेः स्थिरायास्त्वद्भक्तेस्त्रिपुरहर विस्फूर्जितमिदम . तया लंकेशाचे स्फुरण सरल्यावीण सहजी जरा ना झुंझूनी पदरि पडले त्रिभुवन तया शिरोपद्मांची जो चरणी रचुनि रास, भजतो तयाला दुस्साध्य शिव न जगती ठेवत स्थिती . १२ . अमुष्य त्वत्सेवा-समधिगतसारं भुजवनं बलात कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः अलभ्यापातालेऽप्यलसचलितांगुष्ठशिरसि प्रतिष्ठा त्वय्यासीद ध्रुवमुपचितो मुह्यति खलः . अशा लंकेशाने न स्मरत कृपा धीर करुनी बळाने कैलासा हलवुन तुला नेऊ म्हटले तवा पाताळाचे तळि सहज त्याला दडपले तिथेही मोहाने तववरकृपे, तो न बधला . १३ . यदृद्धिंसुत्राम्णो वरद परमोच्चैरपि सतीं अधश्चक्रे बाणः परिजनविधेयत्रिभुवनः न तच्चित्रं तस्मिन वरिवसितरि त्वच्चरणयोः न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः . तुझ्या आशीर्वादे अधिपति असा बाण सजला तिन्ही लोकी त्याने जय मिळवुनी राज्य रचले तुझ्या ठायी श्रद्धा असुन मनु पूजा तव करे तया नाही नाही अवनति मुळी ठाउक असे . १४ . अकाण्ड-ब्रह्माण्ड-क्षयचकित-देवासुरकृपा विधेयस्याऽऽसीद यस्त्रिनयन विषं संहृतवतः स कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः . जवा ब्रम्हांडाचा क्षय समिप देवासुर जगा त्रिनेत्राने विश्वा अभय दिधले प्राशुन विषा तये नीळ्या कंठा मिरवत असे शंकर सदा जगाला तो वाटे खरच जगदुद्धार करता . १५ . असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः स पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत स्मरः स्मर्तव्यात्मा न हि वशिषु पथ्यः परिभवः . जयाला पाहोनी तुज वगळता देव सगळे असो वा दैत्यादी मनुज अवघे विद्ध असती अशा कंदर्पाला दहन करुनी सिद्ध करसी कधीही श्रेष्ठांना दुखवुन नसे श्रेय जगती . १६ . मही पादाघाताद व्रजति सहसा संशयपदं पदं विष्णोर्भ्राम्यद भुज-परिघ-रुग्ण-ग्रह- गणम मुहुर्द्यौर्दौस्थ्यं यात्यनिभृत-जटा-ताडित-तटा जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता . तुझ्या पादाघाते थरथरत पृथ्वी थिरकता तुझ्या बाहून्यासे डळमळत तारे गगनिचे जटांच्या पाशांनी पिडित तट स्वर्गास थटती जगा रक्षिण्या तांडव करसि, डावेच तरि ते . १७ . वियद्व्यापी तारा-गण-गुणित-फेनोद्गम-रुचिः प्रवाहो वारांयः पृषतलघुदृष्टः शिरसि ते जगद्द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमिति अनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः . जगाला द्वीपाचे रुप मिळत धारेतच जिच्या पुर्‍या आकाशाला उजळत जिचे फेस उठती अशा गंगेलाही अवतरत माथ्यावर तुझ्या मिळे बिंदू जागा, बघुन तव देवा मिति कळे . १८ . रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो रथाङ्गे चन्द्रार्कौ रथ-चरण-पाणिः शर इति दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बर विधिः विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः . धरेला चंद्रार्का करुन विधि चाके निघतसे धनुष्या मेरूच्या हरिस शर योजे, शिव वधे असा काही मोठा त्रिपुर नव्हता थोर वधण्या तरी शंभोचीही उमजत नसे काय किमया . १९ . हरिस्ते साहस्रं कमल बलिमाधाय पदयोः यदेकोने तस्मिन निजमुदहरन्नेत्रकमलम गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः त्रयाणांरक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम . हरी देई डोळा कमलसहस्रा पूर्ण करण्या तुवा भक्तीने त्या गहिवरुनी चक्र, वर दिले भक्तिसामर्थ्याला स्मरुन दिधले अस्त्र तव ते जगा रक्षायाला त्रिपुरहर वृत्तीच धजते . २० . क्रतौ सुप्ते जाग्रत त्वमसि फलयोगे क्रतुमतां क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते अतस्त्वांसम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदान-प्रतिभुवं श्रुतौ श्रद्धांबध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः . परीत्यागाला बा सहज फळ लाभो म्हणुन तू सदा जागूनीया सुरस फल देसी म्हणुनही तुझ्या विश्वासाने सुजन करण्या कर्म धजती श्रुत श्रद्धेने ते बद्ध करण्या कार्य असती . २१ . क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृतां ऋषीणामार्त्विज्यं शरणद सदस्याः सुर-गणाः क्रतुभ्रंशस्त्वत्तः क्रतुफल-विधान-व्यसनिनः ध्रुवं कर्तुंश्रद्धा विधुरमभिचाराय हि मखाः . जरी होता दक्ष यजनकरता तज्ञ अगदी ऋषींच्या साह्याने सुरगणसहाय्ये यजत तो तरी विध्वंसूनी यजन सगळे सिद्ध करसी विनाश्रद्धा, कर्त्या, यजनहि मुळी साधत नसे . २२ . प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वांदुहितरं गतं रोहिद भूतांरिरमयिषुमृष्यस्य वपुषा धनुष्पाणेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुं त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः . प्रजेचाही स्वामी भुलुन पद मोहात पडला मुलीच्याही मागे फिरत वनी व्याधास दिसला शिवा वेधूनी त्या भयचकित केले तूच जगती स्थिती ती आकाशी मिरवत मृग होऊन विधी . २३ स्वलावण्याशंसा धृतधनुषमह्नाय तृणवत पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि यदि स्त्रैणं देवी यमनिरत-देहार्ध-घटनात अवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः . स्वसौंदर्यगर्वे मदन सजला युद्ध करण्या तया पाहूनी त्वा त्वरित वधिले भस्म उरण्या उमेला मोहूनी शिव वसवि अंगात अरध्या असे नाही, त्याचेवरचि युवती मुग्ध असती . २४ . श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः चिता-भस्मालेपः स्रगपि नृकरोटी-परिकरः अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणांवरद परमं मङ्गलमसि . स्मशानीची क्रीडा, स्मरहर पिशाच्चे सहचरे चिताभस्मालेपासहित नरमुंडे तव गळा अशूभाची शीले तव असत नावात सगळ्या तरीही मानाने शुभकर असा तूच अससी . २५ . मनः प्रत्यक चित्ते सविधमविधायात्त-मरुतः प्रहृष्यद्रोमाणः प्रमद-सलिलोत्सङ्गति-दृशः यदालोक्याह्लादं ह्रद इव निमज्यामृतमये दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत किल भवान . जरी प्राणायामे विधिवत तुझा ध्यास धरुनी यशाच्या आनंदे स्फुरित अश्रु गाळीत जगी तुला पाहोनीही अनुभवत सौख्यामृतमयी अशा सर्वांचे ईप्सितच शिवा काय नससी . २६ . त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवहः त्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रति गिरं न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत् त्वं न भवसि . शिवा सूर्य, चंद्र, पवन, अनली, तूच अससी जले तू, आकाशी, अवनिभरही, तूच गमसी असे छोटे मोठे, विवरण तुझे, नांदत इथे जिथे तू नाही ते, स्थळ नच अम्हा ज्ञात असते . २७ . त्रयींतिस्रो वृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरान अकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत तीर्णविकृति तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः समस्त-व्यस्तं त्वांशरणद गृणात्योमिति पदम . तिन्ही वेदं, वृत्ती, भुवनत्रय, ते देव तिनही तया योगे होई अ उ म च ध्वनी स्थानक तुझे तया ओंकारी हे शब्द तिनहि वास करती समस्तांचे व्यस्त तवशरणची लोक गणती . २८ . भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहान तथा भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम अमुष्मिन प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि प्रियायास्मैधाम्ने प्रणिहित-नमस्योऽस्मि भवते . तुझी देवा नावे, भव, शर्व, अतीऊग्र, असती महादेवा, भीमा, पशुपति, असे लोक म्हणती रुद्रा ईशाना वा म्हणुन सर्व वेदांत वससी अशा शंभो माझे नमन चरणी सादर असे . २९ . नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमः नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः नमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमः नमः सर्वस्मै ते तदिदमतिसर्वाय च नमः . नमू या प्रीयाला विजनवनप्रीयास नमु या नमू या सूक्ष्माला स्मरहर शिवा खास नमु या नमू या वृद्धाला त्रिनयन युवा त्यास नमु या नमू या ज्ञात्याला सकललयकर्त्यास नमु या . ३० . बहुल-रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः प्रबल-तमसे तत संहारे हराय नमो नमः जन-सुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः (हरिणीः १७- न स म र स लगा, यतीः ६,४,७) . जग रज वृत्ते साकारीसी, प्रजापति तू भवा तम गुण कृते संहारीसी, तुला म्हणती हरा सत्व गुण रुपे सांभाळाया, विश्वा अससी मृडा त्रय गुण निर्गुणी वंदू या, तुला नमु या शिवा (हरिणीः १७- न स म र स लगा, यतीः ६,४,७) . ३१ . कृश-परिणति-चेतः क्लेशवश्यं क्व चेदं क्व च तव गुण-सीमोल्लङ्घिनी शश्वदृद्धिः इति चकितममन्दीकृत्य मांभक्तिराधाद वरद चरणयोस्ते वाक्य-पुष्पोपहारम (मालिनीः १५- न न म य य, ८,७) . जडतर मन माझे, पार शोधी गुणांचा कुठवर शिव सीमा, ठाव घे मी भवाचा परि चकित मनाला थांग नाही कळाला वरद चरणि वाहू वाक्यपुष्पे तयाला (मालिनीः १५- न न म य य, ८,७) . ३२ . असित-गिरि-समं स्यात कज्जलं सिन्धु-पात्रे सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीश पारं न याति (मालिनी) . करुन दउत सिंधू, मेरुच्या तुल्य शाई करुन सुरतरूची लेखणी, पत्र भू ही सरस्वति लिहि स्तोत्रे, सारखी सर्वकाळ स्तवन तरि न शंभो संपते, तू अकाल (मालिनी) . ३३ . असुर-सुर-मुनीन्द्रैरर्चितस्येन्दु-मौलेः ग्रथित-गुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य सकल-गण-वरिष्ठः पुष्पदन्ताभिधानः रुचिरमलघुवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार (मालिनी) . सुर असुर मुनींनी अर्चिला चंद्रमौली लिहित गुण महीमा निर्गुणी विश्वव्यापी निरुपण गणमुख्ये पुष्पदन्ते रचीले सुरस कथन केले र्‍हस्व आवर्तनांते (मालिनी) . ३४ . अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत पठति परमभक्त्या शुद्ध-चित्तः पुमान यः स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र प्रचुरतर-धनायुः पुत्रवान कीर्तिमांश्च (मालिनी) . स्मरत स्तवनरूपे जो जटाशंकराला स्वच्छ मन करुनी जो भजे शंभु त्याला समजति शिवलोकी रुद्रतुल्य, इथेही सधन, सपुत, दीर्घायू सुकीर्तीत होई (मालिनी) . ३५ . महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम (अनुष्टुप्‌) . महेशापरी देव, महिम्नापरी नसे स्तुती शिवासम नसे मंत्र, नचतत्त्व गुरूपरी (अनुष्टुप्‌) . ३६ . दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः महिम्नस्तव पाठस्य कलांनार्हन्ति षोडशीम्‌ (अनुष्टुप्‌) . दीक्षा, दान, तप, तीर्थ, ज्ञान, याग करूनही महिम्नपाठे जे लाभे, ते न सोळा कळी मिळे (अनुष्टुप्‌) . ३७ . कुसुमदशन-नामा सर्व-गन्धर्व-राजः शशिधरवर-मौलेर्देवदेवस्य दासः स खलु निज-महिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात स्तवनमिदमकार्षीद दिव्य-दिव्यं महिम्नः (मालिनी) . पुष्पदंत गंधर्वांचा राज राजेंद्र साचा चंद्र शिखरि धरी त्या, दास तो ईश्वराचा गतमहिम्न जहाला, ईश्वरी कोप होता दिव्य स्तवन शिवाचे तोच निर्मून गेला (मालिनी) . ३८ . सुरगुरुमभिपूज्य स्वर्ग-मोक्षैक-हेतुं पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्य-चेताः व्रजति शिव-समीपं किन्नरैः स्तूयमानः स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम (मालिनी) . सुरगुरूमुनिपूज्य स्वर्ग मोक्षास मार्ग पठण करि स्वभावे हात जोडून रोज कुसुमदशन स्तोत्र किन्नरां गानयोग्य वसत शिवसमीपे, तो सदा दीर्घकाळ (मालिनी) . ३९ . आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्व-भाषितम अनौपम्यं मनोहारि शिवमीश्वरवर्णनम्‌ (अनुष्टुप्‌) . समाप्त होतसे स्तोत्र गंधर्वरचित ते हे अनुपम मनोहारी पवित्र ईश वर्णन (अनुष्टुप्‌) . ४० . इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्कर-पादयोः अर्पिता तेन देवेशः प्रीयतांमे सदाशिवः (अनुष्टुप्‌) . असो ही वाङ्मयी पूजा शंकराचरणी रुजू आवडो तुज देवेशा, प्रसन्न तू होई मला (अनुष्टुप्‌) . ४१ . तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः (अनुष्टुप्‌) . तुझे तत्त्व न जाणे मी, कसा तू असशी शिवा जसा तू असशी देवा, तशा तुज मी वंदितो (अनुष्टुप्‌) . ४२ . एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः सर्वपाप-विनिर्मुक्तः शिव लोके महीयते (अनुष्टुप्‌) . एकवार द्विवारं वा, त्रिवार म्हणता नर सर्वपाप हरूनीया, शिवलोकी सुखे वसे (अनुष्टुप्‌) . ४३ . श्री पुष्पदन्त-मुख-पङ्कज-निर्गतेन स्तोत्रेण किल्बिष-हरेण हर-प्रियेण कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः (वसंततिलका) . श्री पुष्पदन्तरचिता स्तुति ही शिवाची पापा हरेल, शिवप्रीय, स्तुति शंकराची जो जो स्मरे, मनन, गान करेल भावे होई प्रसन्न शिवशंकर त्या, स्वभावे (वसंततिलका) . ४४ . ॥ इति श्री पुष्पदन्त विरचितं शिवमहिम्नःस्तोत्रं समाप्तम्‌ ॥ . ॥ पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्र समाप्त ॥ शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद

वाचन 6785 प्रतिक्रिया 0