Skip to main content

जीवनमान

मजूर

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 23/12/2017 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मजूर .... 'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो. मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........

अरि

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/12/2017 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
अरि ....... त्यावर्षी पहिल्यांदाच एका भारतीय मुलाने शाळेत admission घेतली. अरिंधम त्याचे नाव. पण इतके अवघड नाव काय या अरबी मुलामुलींना घेता येईना. साहजिकच त्याचा अरि झाला. अकरावीत शिकत होता. तो म्हणजे आम्हा सर्व भारतीय शिक्षकांच्या जिव्हाळयाचा विषय! माझ्या जास्त जवळचा. कारण त्याने अकरावीला इंग्लिश साहित्य ठेवले होते, आणि पंजाबी असून महाराष्ट्रात बरीच वर्षे काढल्याने चांगले मराठी यायचे. म्हणजे, आमचे किती गूळपीठ असेल पहा!! तर वार्षिक क्रिडा महोत्सव सुरु झाला. हा जोश, हा उत्साह!!

मराठी शाळांतील घटती पटसंख्या

लेखक ss_sameer यांनी बुधवार, 06/12/2017 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी शाळांतील घटती पटसंख्या हा कोण्या चर्चेचा विषय होऊ शकतो असे आम्हास बिलकुल वाटत नाही. किंबहुना त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे असाच विचार आमच्या मनात येतो. तसे पाहता मराठी ही फार प्राचीन भाषा आहे. कित्येक मराठी भाषाकोविदांप्रमाणे संस्कृत पश्चात जी भाषा जन्मास आली ती मराठीच. यापेक्षा पुढे जाऊन काही (अतिरेकी) मराठी प्रेमी मराठी ही अश्मयुगीन कालखंडापासून असल्याचे पुरावे देखील सादर करू शकतील. (सध्या तर या अशाच अतिरेक्यांचे पेव फुटलेले दिसते. कालांतराने ही मंडळी मंडळांतून फुटतात किंवा यांना कोणीतरी हातापायाने फोडते ती गोष्ट वेगळी). असो.... तर मुद्दा आहे मराठी शाळांतील घटती पटसंख्या.

दरस बिना..

लेखक समयांत यांनी मंगळवार, 05/12/2017 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राचा तळ गाठता येत नाही, आणि अश्रूचा स्रोतसुद्धा सापडत नाही.. दोघांना अस्तित्व खारेच आहे, एक अथांग तर दुसऱ्याचे अलौकिक. दुपार सरत असतांनाचा वेळ, चार ते पाचचा, या वेळेत सारे भरून आलेले असते. ना खोल ना गंभीर, सगळे सुटेसुटे होणारे गुंते. वासांनी निर्माण झालेले जग मोकळे होत एक केवळ श्वास होणारे. शांतता आणि अस्वस्थता एकाच वेळी जाणवते अश्यावेळी, शांतता म्हणजे दुपारची काहिली संपणारी असते म्हणून, आणि अस्वस्थता यासाठी कि संधिप्रकाशाचा खेळ सुरु होणार काही वेळाने म्हणून. एक एक पळ युगासारखा भासतो, श्वासांचे स्पष्ट येणेजाणे दिसते, येणारा लौकर जातो पण जाणारा मात्र रेंगाळत राहतो.

रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 03/12/2017 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत. आपल्याला कर्करोग का होतो?

'टमरेल' प्रवृत्ती संपणार कधी ?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शनिवार, 02/12/2017 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
'टमरेल' प्रवृत्ती संपणार कधी ? जिल्ह्यात सध्या स्वच्छता मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. हागणदारीमुक्त आणि शौचालययुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रशासन सरसावले असल्याचे दिसत आहे. दररोज सकाळी जिल्हा तथा नगर प्रशासनातर्फे उघड्यावर शौचास जाणाऱ्याला कायद्याचा दंडुका दाखवला जात आहे. दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत खेड्यापाड्यात शौचालय बांधण्याचं काम मोठ्या प्रमाणात सरकार करत आहे. गावातील लोकांमध्ये शौचालय, स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. प्रत्येक गाव हे हागणदारी मुक्त व्हावं, लोकांनी स्वच्छेतेकडे आणि चांगल्या आरोग्याकडे विशेष भर द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.

राजाची नियत

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 02/12/2017 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजाची नियत आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई. एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस?

उदासगाणी

लेखक समयांत यांनी बुधवार, 29/11/2017 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला.

मनोविकारशास्त्र(psychiatry)--आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक मिथक!!

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी बुधवार, 29/11/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणतः २००६ साली मी कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करु लागलो.इंटरव्ह्युसाठी लांब ठीकाणी जायचे ,तिथे जाण्यासाठी तयारी करायची ,इंटरव्युला सामोरे जायचे असा प्रकार सुरु होता.इंटरव्युला जाताना सुर्वातीला मजा वाटायची नंतर त्याचे दडपण यायला सुरवात झाली.

एक कागद

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 27/11/2017 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला एक कागद कस्पटासम ||धृ ।। 
 एक बालक हाती घेई, मायेने मग आकार देई, बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।। 
 उंच विहरता मन स्वच्छंदी, हीन भासली भुतल रद्दी, वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।। 
 वाटे त्यासी उंच उडावे वादळ वारे यांसी भिडावे कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।। 
 इतकी उंची तये गाठली साद मनीची नभी आटली ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।। 
 गगन ठेंगणे खुणवी तारे मांजा परी तो रोखुनी धरे दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।। 
 उंच उंच तो जातच राही स्वानंदी मग