Skip to main content

जीवनमान

आता फक्त घासफूस ...

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 22/11/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी. केल्या रित्या बाटल्या चकण्यांच्या ताटल्या पडे बिअरचाच पाऊस पण आता... आता फक्त घास फुस चापिल्या बोट्या फोडिल्या नळ्या ढेरी तुडुंब करी मन खुश पण आता... आता फक्त घास फुस दिन ते गेले वय ही झाले झाली शरीराची नासधूस अन आता ... आता फक्त घास फुस
काव्यरस

हिमोग्लोबिन : आपल्याला जगवणारे प्रोटीन

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 15/11/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली आणि आपल्याला प्रत्येक क्षणी मिळालीच पाहिजे अशी गोष्ट कोणती? क्षणाचाही विचार न करता या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे – ते म्हणजे ऑक्सीजन (O2) ! पर्यावरणातील O2 आपण श्वसनाद्वारे फुफ्फुसांमध्ये घेतो. आता हा O2 शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोचवण्याचे काम एक वाहतूकदार करतो आणि तो आहे हिमोग्लोबिन. हे एक महत्वाचे प्रथिन असून त्याचा कायमचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट लालपेशी.

मैत्रिणीचा नवरा

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी रविवार, 12/11/2017 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मैत्रिणीकडे गेलो होतो, तिचं लग्न ठरल्याचं कळलं होतं. तीने भेटायला सहजचं बोलावलं होतं, पण गाठ पडली तिच्या भावी नवऱ्याशी. बऱ्याच गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या. मला फार प्रश्न पडतात बोलताना, की हं, हे झालं; आता काय बोलायचं? त्याला तसले काही प्रश्न पडत नव्हते. मुळात स्वत:बद्दलच फक्त बोलायचं असेल तर असले प्रश्न पडत नाही साधारणपणे. तिच्या वडिलांना भेटलो नंतर. काका एकदम खुश. माझ्या पाठीवर गुद्दा मारत म्हणाले, “मग? कसा वाटला आमचा जावई?” जे वाटलं ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्या ऐवजी वेगळं काही सांगण्याइतकी प्रतिभा नव्हती.

कोलेस्टेरॉल : एक लाडावलेला वलयांकित पदार्थ !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 08/11/2017 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या अर्धशतकात आपण वाढत्या प्रमाणात आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला आणि त्याबरोबर आपल्या आयुष्यातील ताणतणाव देखील वाढत गेले. एकीकडे आपला भौतिक विकास होत असतानाच आपले शरीर मात्र निरनिराळ्या आजारांची शिकार होत गेले. हृदयविकार हा त्यापैकी एक प्रमुख आजार. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये मेद-पदार्थांच्या गुठळ्या होऊन त्या आकुंचित होणे. त्याचा पुढील परिणाम म्हणजे माणसाला येणारा “हार्ट अ‍ॅटॅक ” हा होय.

मोबाईल फोन आणि कर्करोग : वादग्रस्त गृहितक

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 25/10/2017 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल फोनच्या वापराने कर्करोग होतो का नाही ? भयंकर पेचात टाकणारा हा प्रश्न ! आजकाल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा कारण जगातील बहुसंख्य लोक आता ‘मोबाईलधारी’ झालेले आहेत. मग काय आहे या त्रस्त करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ? जरा थांबा. न्यायालयात उलट तपासणी घेणारा वकील जेव्हा गुळूमुळू किंवा मोघम उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला ‘हो’ का ‘नाही’ असे खडसावून विचारतो तसे मला किंवा शास्त्रज्ञांना विचारू नका ! कारण, आजच्या घडीला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन पर्यायांच्या मध्ये कुठेतरी आहे. उत्तर समजण्यासाठी जगात आजपावेतो झालेल्या संबंधित संशोधनाचा थोडक्यात आढावा घेतो.

!माझी छबी!

लेखक sayali यांनी बुधवार, 25/10/2017 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं आणि माझं नातं काही वेगळंच आहे. एकमेकींचे लाड करतो. उपदेश करतो. आमचे जितके मतभेद असतात तितकाच जिव्हाळाही असतो. आमचे संवाद कधी हळवे तर कधी हसून हसून डोळ्यात पाणी आणणारे, कधी बौध्हिक पातळीवरचे तर कधी स्वयंपाकातील धाडसी प्रयोग यांची प्रेरणा देणारे, कधी उद्बोधक तर कधी आयुष्याला वेगळे वळण देणारे असतात. माझा तिला आणि तिचा मला शारीरिक, बौधहिक, मानसिक बदल लगेच जाणवतो. या मागे कोणती अंतःप्रेरणा असेल ? जन्मजनमांतरिचा एक स्त्री असल्याचा समान धागे तुझ्यातल्या मला माझे दर्शन घडवून देत असते. कशाला बघू मी उगा आरशात !

माणसातील तील निसर्ग जागा होईल का कधी?

लेखक हेमंत ववले यांनी सोमवार, 23/10/2017 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते.

Making of photo and status : ३. ए सागर कि लहरों!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 22/10/2017 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 'फेसाळणार्या लाटा, करी गुदगुल्या पदस्पर्शुनी!!! माझी मीच राहीना, ऊठे तरंग हृदयी हर्षुनी!!!' गोव्याच्या समुद्रकिनारी मायलेकी लाटांशी खेळताना.

कागदाचे झाड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/10/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....

इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 16/10/2017 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
मधुमेह अर्थात डायबेटीस- आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाचा आजार. त्याने गेल्या अर्धशतकात समाजात जे काही थैमान घातले आहे त्याला तोड नाही. जगभरातील असंख्य लोक मधुमेहाने त्रस्त आहेत आणि त्यावरील विविध उपचार घेत आपले आयुष्य कंठत आहेत. ढोबळमानाने मधुमेहाचे दोन प्रकार पडतात – प्र.१ आणि प्र.२. पहिल्या प्रकारातील रुग्णांना जगण्यासाठी इन्सुलिनचे उपचार घ्यावेच लागतात. तर दुसऱ्या प्रकारच्या रुग्णांसाठी निरनिराळ्या गोळ्या उपलब्ध आहेत; पण जर का अशा गोळ्यांनी त्यांचा आजार आटोक्यात आला नाही तर मात्र त्यांनाही इन्सुलिनचे पाय धरावे लागतात.