Skip to main content

जीवनमान

मनी सत्व आता कमी जाहले

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 22/02/2018 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
मनी सत्व आता कमी जाहले मन मनात शोधायले कुठे काय शोधू ? नेम नाही तयाचा मनी शोध घे शोध त्या अंतराचा जपावे जपी , पूस तू रे मनाशी का बाळगी तू हे , दुःख उराशी जगी कोण सुखी ?, या वनाच्या मनात दुखी होई तोच , अवघ्या काही क्षणात असा सारीपाट या वेड्या मनाचा इथे खेळ चाले सुखदुःखांचा दुखी मन होई ते वज्रासमान सुखी मन ते मात्र वाऱ्याप्रमाणं सुखी मोट मात्र, पाणी नाही तयाला दुःख असे संगे, मन पोळावयाला असा हा तो महिमा , वनाच्या मनाचा इथे चाले खेळ त्या हरीनामाचा सिद्धेश्वर विलास पाटणकर

मन करा थोर!

लेखक समयांत यांनी बुधवार, 21/02/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर' ह्या प्रसिद्ध नाट्यपदातील शब्द आहेत 'मन करा थोर!'. आपण मनोव्यापारातले नाविक आहोत, कोलंबसाने मनोमन 'भारता'ला चंद्र बनवले होते, ध्यास घेतला होता आणि पूर्ण जगाला वळसा घालून त्याने मनाने थोर आहे, हे सिद्ध केले होते. तसेच आता 'सत्त्वा'ला चंद्र बनवून स्वतः चकोर बनत संपूर्ण आकाशगंगेत आपल्याला गरुडभरारी घ्यायची आहे, थोर मनाची व्याख्या पुन्हा नव्याने लिहायची आहे. विश्व आता पृथ्वीपुरता सीमित राहिलेले नाही. हे सत्व सत्व आहे तरी काय नेमके? ते मनाने माणूसपण जपण्यात आहे.

मराठी मालिकांची लेखनकृती

लेखक वनफॉरटॅन यांनी मंगळवार, 20/02/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी: १. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील. २. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर.

माझी ओळख ( आयडी:आलमगिर)

लेखक आलमगिर यांनी सोमवार, 19/02/2018 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी, मी आलमगीर (प्रणव जोशी). खरा सांगायचं तर हा माझा तिसरा मिपा आयडी आहे. आधीचे दोन्ही आयडी ( औरंगजेब आणि प्रणव जोशी) हे पासवर्ड विसरल्यामुळे मला बंद करावे लागले. म्हणून आता हा तिसरा आयडी. ( हा डू-आयडी नाही ना म्हणता येणार?) पुढचे काही दिवस मी माझे जुनेच लेख ह्या आयडी वर पुनर्लेखन करून लिहिणार आहे. त्यानंतर पुढची कथा मालिका चालू होईल आशा आहे कि आपण सर्व माझ्या लेखांवर प्रतिक्रिया द्याल. धन्यवाद आपला , प्रणव जोशी

व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी बुधवार, 14/02/2018 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॅलेन्टाइन डे : दिवस प्रेमाचा सध्या जगात सर्वत्र प्रेमाला उधाण आलेलं आहे. १४ फेब्रुवारी रोजी साज-या होणा-या 'व्हॅलेंटाईन डे' ची तयारी जोरात सुरू असून दररोज वेगवेगळे दिवस त्यानिमित्ताने साजरे केले जात आहेत. दुकानं, रेस्टॉरंट लाल रंगात न्हाऊन निघाली असून प्रियजनांना भेटवस्तू घेण्याची लगबग सुरू आहे. प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्‍यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईनडे च महत्व अनन्य साधारण आहे.. मनातील प्रेम व्यक्त करण्याचा किंवा प्रिय व्यक्तीला प्रेमाची नव्याने जाणीव करून देण्याचा हा दिवस.

मुक्तपीठ

लेखक चुकार यांनी रविवार, 11/02/2018 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास खडतर, सापडेना वाट ती. वाटसरु नवे, हरदिवस भेटती. रोज नवा प्रश्न उभा समोर ठाके, थांब जरा, घे उसासा मन माझे सांगे. जुळता बंध नात्यांचे, कधी हेच धागे गुंतता, बाकी निसटून जाती एक सांधता साधता. वाटे व्हावे फुलपाखरू, मनमोकळे हुंदाडवे. स्वप्नांचे ओझे डोईपरी हलके व्हावे. विशाल आसमंत फिरुनी यावा एकदा, भरारीला बळ मिळावे मग पुन्हा एकदा. भुईचा भूचर कधीतरी पाखरू व्हावा, निर्भय, निश्चिंत, स्वच्छंदी, अनंत तो उडवा. वाटे द्यावे झुगारून सारे बंध. निखळून जावे साखळदंड. हुंदडणाऱ्या अल्लड मनास... मिळावे एक मुक्तपीठ....
काव्यरस

गीताई माऊली माझी...

लेखक विकास यांनी सोमवार, 22/01/2018 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
​आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.