वडाप..
सेन्ट्रल लाईनवरच शेवटच स्टेशन... कसारा.... लोकल मधुन ऊतरलेली गर्दी, उताराकडे वाहणारया पाण्यासारखी एकाच दिशेने वाहते आणि ऊभ्या आड्व्या लावलेल्या बस आणि जीप वर आदळत तिथेच जिरते. घाट माथ्यावर असलेल्या या गावाच हेच प्रयोजन आहे.. या गावात उतरलेली सगळी गर्दी पोटात घेवून महामन्ड्ळाचे लाल डबे आणि खाजगी जीप्स फुर्फुरत घाट चढायला लागतात.. नाशिकच्या दिशेने..
तिथेच तो ऊभा असयचा, कचरू , कचरूच नाव होत त्याच बहुदा.. बहुतेक सगळ्या गाड्या नाशिककडे जायच्या.