Skip to main content

जीवनमान

[अनुभव] बॅन्कांचा हलकटपणा

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 19/10/2009 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे Standard Chartered बॅंकेचे क्रेडीट कार्ड आहे. नुकताच मला बॅंकेकडून फोन आला. पलीकडे फोनवरुन बोलणारा सेल्समन, त्याची सगळी कौशल्ये पणाला लावून मला म्हणाला की माझे आतापर्यंतचे रेकॉर्ड बघुन बॅन्केने माझे कार्ड upgrade करायचे ठरवले आहे. त्या कार्डाच्या सुविधा मला एक वर्ष फुकट वापरता येतील. त्याअगोदर माझे सध्याचे कार्ड एक महिन्या नंतर रद्द होईल, इत्यादि. मी टेलिफोनवर खपविण्यात येणा-या कोणत्याही योजनेस कधिही भुलत नाही. वरील संभाषणात मी त्या सेल्समनला एक प्रश्न परत परत विचारला - या नव्या कार्डाची वार्षिक फी एका वर्षानंतर मला किती द्यावी लागेल.

पहाट

लेखक घोडीवाले वैद्य यांनी रविवार, 18/10/2009 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्यासारख्या रात्रीचा दिवस करणाऱ्या (म्हंजे रात्रपाळीत काम करणाऱ्या) लोकांना पहाट माहीतच नसते. दिवाळीची- नरक चतुदर्शीच्या दिवशी आम्हाला पहाट दिसते. एरवी बारावाजेपर्यंत आमचा सूर्य उगवत नाही. या वर्षीची पहाट मात्र आम्ही एन्जॉय केली. पुण्यातल्या दोन कार्यक्रमांना (सुरेश वाडकर आणि पंडित जसराज) आम्ही पहाटेच (आमच्या मध्यरात्रीला) हजर होतो. हे आम्हाला कसं काय जमलं, याचा शोध आम्ही घेतोय. पण पहाटेच उठून सात्विक आनंद घेण्याचे आम्हाला यंदा जमले खरे! एरवी आम्ही अनेकदा भरलेले ग्लास खाली करीत उत्तररात्रीची मजा घेतलीय. त्यावेळी दिसलेली पहाट आम्हाला तांबूस वाटली.

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 18/10/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर! शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश! :) आणि त्याला हे आमचं समर्थन -
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.
अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो.

(विठोबा)

लेखक बाबुराव यांनी शुक्रवार, 16/10/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्र झाली होती. वार बुधवार होता. सगळीकडे शुकशुकाट एक मांजर तेवढ्यात आडवं गेलं. दोन पावलं मागे सरकलो. आणि पुढे रस्ता चालू लागलो. एक कुत्र्याचं पिलु विव्हळत चाल्लं होतं कोण तरी दगड भिरकावल्यामुळे लंगडतही होतं. कोणी तरी पेताड आपल्याच नादात गुणगुणत चाल्ला होता. दीर्घ श्वास घेऊन जीव हातात घेऊन मी नाकासमोर रस्त्याने चालू लागलो. चालता चालता मागुन आवाज आला. ''कुठं फिरु राह्यला बे भाड्या एवढ्या रात्री.'' कोणीच दिसत नव्हतं मंग ह्यो आवाज कुठून आला. दरदरुन घाम फुटला.

दिवाळी...

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 16/10/2009 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
काल असेच नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऒफिस बंद करुन मी घरी चाललो होतो, दिवाळीला आता दोन दिवसच राहिले, सगळीकडे दिवाळीची घाई चालू असलेली दिसत होती, आमच्या मार्केटमध्ये तर गर्दी खुप दिसत होती, तशी पाहता मला गर्दी आवडत नाही.. पण अनेक वर्षानंतर दिवाळीच्या गर्दीचा अनुभव घ्यावा असे वाटले व त्या गर्दीत मी पण मिसळून गेलो, कधी ह्या दुकानात जा कधी त्या दुकानात जा असे चालूच होते व अचानक एका दुकानात एक मुलगा पाहीला असेल वय १३-१४ चे आपल्या वडीलांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून दुकानातील गर्दीला संभाळत होता..कपडे दाखवत होता... घड्या घालत होता.. व डोळे एकदम पाणावले...

पाऊस कधीचा पडतो

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 16/10/2009 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता.

जिथे सागरा धरणी मिळते........

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 15/10/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
'व्हाय डोन्ट यू गो टू विजिट द सबमरिन?' डॉ. नवीनने विचारले. 'सबमरिन? मालदिव में सबमरिन है?' डॉ. अनिल. 'तिथे आहे.... ' डॉ. नविनने खिडकीतून बाहेर दाखवले.. समुद्रात दूर अंतरावर एक पांढरी बोट दिसत होती. इन्दिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून समुद्र फार देखणा दिसतो. मी मुंडके खाली वळवले आणि मुकाटपणे चहा पिऊ लागलो. मालदीवमध्ये चार महिने राहूनही इथे २०० फुटांवर पाण्यात एक सबमरिन आहे हे मला पहिल्यांदाच समजत होते! शनिवारचा दिवस म्हणजे मालदीवमधील सुट्टीचा दिवस. माझा मित्र डॉ. अनिल मगदूम भारतात परत जाणार असल्यामुळे मला भेटायला मालेमध्ये आला होता. तिथूनच तो कोचीला जाणार होता.