जीवनमान
उचललेस तू मीठ मुठभर
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.
फॉल फेस्टिव्हल
सण म्हणजे आनंदोत्सव. यात असते ती खण्यापिण्याची चंगळ, कपड्या-लत्त्याची मौज-मजा, संगित नृत्याचा आस्वाद. खर तर मानवाने सणाच्या साजरीकरणाचा काळ ठरवला तो निसर्गाच्या बदलांनुसार. पण अस म्हणण्यापेक्षा कधी कधी अस वाटायला लागत की हा निसर्गच मानवाच्या सणासूदीत उत्साहाने शामिल झाला आहे आणि मानवाला त्याच्या विविध रूपात सामवून घेऊन रंगवून टाकतो आहे. निसर्ग मानवाला मुक्त हस्ते भरभरून सुख देऊन तृप्त करत आहे आणि या समाधानातच मानव आनंदोत्स्व साजरा करत आहे.
निसर्गाच्या प्रत्येक बदलाची चाहूल मानवाला काही काळ आधीच लागते आणि मग मानवही सज्ज होतो तो निसर्गाने देऊ केलेल्या त्या सुखसाठी.
फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या?
फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या?
साधारणता: १९८० च्या दशकात ज्यावेळी दुरदर्शनवर वाहिन्यांचा सुळसूळाट चालू झालेला नव्हता त्या काळी दिल्ली दुरदर्शनवर वरचेवर भारतीय फिल्म डिव्हीजन ने तयार केलेल्या काही कार्टून फिल्म दाखवल्या जायच्या. सदर फिल्म्स ह्या देशभक्तिपुर्ण, अर्थपुर्ण, संगीतमय व काहीतरी उद्दात हेतू असणार्या होत्या.
आठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई
काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले.वा गं वा! तुझा का माझा......?
सकाळी सकाळीच नम्रताचा फोन आला..... तिने जी पंजाबमेल सोडली ती शेवटी तिच्या स्वरयंत्राने तिच्या संतापाची-त्राग्याची साथ सोडल्यावर नुसताच फुसफुसाट होऊ लागला तशी जरा कुठे ती थांबली. " अग, हो हो... जरा हळू गं. किती संतापशील? आणि हा असा त्रागा करून तुझ्या जीवाला होणाऱ्या त्रासात फक्त भर पडतेय. तेव्हा दम खा आणि शांतपणे सांग मला. " हे माझे वाक्य ऐकले अन पुन्हा ही उसळली, " म्हणे शांतपणे.... तुझे काय जातेय गं हे सांगायला. ज्याचे जळते ना त्यालाच कळते. तू चुपचाप ऐकायचे काम कर.
लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक
लक्ष्मण यादव अहिरे: एक सायकलपटू समाजसेवक
आज आपण एका सायकलपटू असलेल्या सामाजसेवकाला भेटणार आहोत. नाव आहे लक्ष्मण यादव अहिरे. त्यांनी सायकलवर भारतभ्रमण केले आहे. ते वयाच्या ७१ व्या वर्षी अजूनही सायकलवरून नशिक उजैन अशी स्वारी करू शकतात. आजही पुढील महीन्यात आपला ७२ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर सायकलवरून 'इंधन बचाओ' हा संदेश घेवून भ्रमण करण्यास ते निघणार आहेत.
मिसळपाव