Skip to main content

जीवनमान

तू तर माझी बायको, शारदा.....

लेखक भानस यांनी मंगळवार, 24/11/2009 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी पुण्याला सासूबाईकडे गेले होते. एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या सुंदर मोठ्या बागेत-क्लबहॉऊस मध्ये फिरत होते. बरेच ज्येष्ठ नागरिक एका गोल टेबलाभोवती बसून ब्रिज, पोकर खेळत होते. टेबल टेनिस भोवती तर खूपच गर्दी होती. अगदी लहान मुले जसे ओरडाआरडा करत खेळतात तसेच दृश्य होते. काही आज्या साड्या खोचून तर काही पंजाबी ड्रेसमध्ये ..... काही आजोबा अगदी इरेला पेटून जिंकायचेच असे खेळत होते. दोघेतिघे तरणतलावामध्ये थोडावेळ व्यायाम करून आभाळाकडे पाहत रिलॅक्स तरंगत पडून होते. एका कोपऱ्यात कॅरमचा अड्डा जमला होता. चौघेजण अटीतटीचा सामना लढत होते.

प्रिझनर्स डिलेमा

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 23/11/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू. "प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू. गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात.

ढुंढो ढुंढो रे साजना, तशात दुपटीची भर.......

लेखक भानस यांनी मंगळवार, 17/11/2009 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
अरुंधती आज नेहमीपेक्षा जरा लवकरच उठली. सेक्शनचे हळदीकुंकू होते. नेहमीचा तो पंजाबी नको बाई, आज जरा साडी नेसीन. मनासारखे आवरून निघायचे तर घरातली कामे आवरून स्वतःसाठी अर्धा तास तरी हवाच ना. आयत्यावेळी काहीतरी उदभवते म्हणून अजून थोडा वेळ असू दे हाताशी म्हणून अजूनच लवकर उठून आवरायला सुरवात केली. डबेडुबे झाले. बाईही वेळेवर आली. लेकीची रिक्षाही आज पाच मिनिटे लवकरच आली. नवऱ्याला आज नेमके उलट दिशेला जायचे असल्याने रिक्षा घ्यावी लागेल एवढाच काय तो घोळ होता. पण त्याची फार चिंता नको करायला. रोज तर पाहतो आपण खाली उभ्याच असतात रिक्षा.

एक अजनबी पाकिस्तानी नागरिकाशी झालेली चर्चा!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 16/11/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक १०० टक्के सत्य घटना आहे. मागे मी एकदा मलेश्यातील क्वाला लुंपूर या शहरी गेलो होतो. संध्याकाळी काम संपवून जरा दिवसा-उजेडी हॉटेलवर परत आलो. हॉटेल शेजारीच एक पार्क होता म्हणून एक चक्कर मारायला तिथं गेलो. का कुणास ठाऊक, पण पार्कमध्ये कोणी चिटपाखरूही नव्हतं. एक-दोन फेरफटके मारल्यावर हिंदुस्तानी चेहेर्‍याचा एक पंचविशीतला तरुण कांहींसा "खोया-खोयासा" चेहरा करून एका बाकड्यावर बसलेला दिसला. आधी आपल्या देशाचा असावा म्हणून मी त्याला "हॅलो" केले. तो थोडासा बुजलेला दिसत होता. कांहींसा बिचकत-बिचकत अवघडतच तो उभा राहिला व "आप कहाँसे हैं?" असे त्याने मला विचारले. मी म्हटलं "मै हिंदुस्तानी हूँ|".

कातरवेळ

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 16/11/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!

नवीन वसाहत

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/11/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी खबर, ताजी खबर भुतीण पारावरून ओरडली लगबगीने सरसर सरसर पारंबी धरून खाली आली - रात्र काळी, सळसळ झावळी समंध भारी, मुंजे किरकीरी जखिणी, हडळी आणि भुतावळी झाडांवर जमली सारी बिरादरी - कशाला उगाच मारतेस बोंबा उलटे झुलते वेताळ विचारते जरा थांबा, खाली घ्या टांगा सांगते सारे, भुतीण फिस्कारते - आपला सगळा मोहल्ला चालला येथून दुसरीकडे जागा देतील संपला जुना सहवास इथला कबरीतून काढून भांड्यात ठेवतील - बिरादरी भुमीवर वसाहत बांधून जागा भरणार, माणसे रहाणार हाडे खोदून, थोडीशी निवडून, एकावर एका बॉक्समधे ठेवणार ***१ - मज्जा ने मज्जा, केकाटला मुंजा नवीन घर, हायराईज रिसॉर्टवर ए तुला नाही भेजा, म्हणाला कुब्जा तूच म
काव्यरस

परत एकदा 'स्वच्छतेच्या बैलाला..'

लेखक नीधप यांनी रविवार, 15/11/2009 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी मायबोली दिवाळी अंकात लिहिलेल्या माझ्या स्वच्छतेच्या बैलाला.. http://vishesh.maayboli.com/node/26 या लेखाच्या संदर्भाने मायबोलीवरच http://www.maayboli.com/node/4327 या ठिकाणी चर्चा सुरू झाली. काय करता येऊ शकेल, कसे करता येऊ शकेल इत्यादी बाबींवर उहापोह सुरू झाला. आणि मग थांबला. सुरूवातीला धडाक्याने सुरू केलेली ही चर्चा आणि बरंच काही करू असं स्वतःलाच दिलेलं वचन बाजूला पडलं तरी विसरलं मात्र नव्हतं. अनुभवांची आणि चिडचिडीची भर पडतच होती.

आय.आय.एम. अहमदाबादमधून

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 15/11/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून मला आय.आय.एम. अहमदाबादमधील विद्यार्थीजीवनावर मिपावर लेख लिहायचा होता. तो आता लिहिता येत आहे याचे समाधान आहे. लेखाच्या निमित्ताने इतरही थोडी माहिती लिहित आहे. भारतीय प्रबंध संस्थान (आय.आय.एम) सर्वप्रथम कलकत्याला १९५९ मध्ये सुरू झाले. त्यासाठी कलकत्ता विद्यापीठ आणि भारतीय संख्याशास्त्र संस्था (Indian Statistical Institute) मधील ज्येष्ठ प्राध्यापकांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील बिझनेस स्कूलमध्ये ’बी-स्कूल’ संबंधी प्रशिक्षणासाठी पाठवले होते आणि त्यांनी परत आल्यावर आय.आय.एम कलकत्त्यात प्राध्यापक म्हणून अध्यापन करायला सुरवात केली.

जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...

लेखक विकास यांनी शनिवार, 14/11/2009 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
मनसेवरून गेल्या दोनचार दिवसात झालेल्या अनेक चर्चांमधे एक प्रकर्षाने वेगळी जाणवलेली चर्चा ही श्री. कलंत्री यांची होती.