Skip to main content

जीवनमान

सैतानाचे स्वर्गीय अन्न

लेखक स्वाती२ यांनी शुक्रवार, 25/12/2009 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल बर्‍याच महिन्यांनी नवर्‍याला ख्रिसमस इव मुळे सुट्टी होती. मधलाच वार असल्याने नेहमीची विकांताची कामेही नव्हती. त्या आधीच्या आठवड्यातली अ‍ॅनिव्हरसरी नेहमीच्या रुटीनमधे हरवली होती. 'हॅपी अ‍ॅनिव्हरसरी! जेवायला थांबू नकोस' सांगत त्याने सकाळी ६ लाच घर सोडलं होतं. त्यामुळे काल 'तू अजिबात खाली येऊ नकोस. आज तुला रूम सर्व्हीस!' असं सांगून नवरा सकाळी खाली गेला. हॉट चॉकलेट, बनाना ब्रेडचा ब्रेकफास्ट, जेवायला पाव-भाजी! यम्म! दुपारी ३ वाजता परत स्वारी वरती आली. 'मी तुझ्यासाठी केक करतो, ' कालच्या ज्युलिया अँड ज्युलियाचा परीणाम. अशा वेळी काही न बोलणे शहाणपणाचे.

सांगा पतंग कुणी हा पाहिला?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 25/12/2009 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
सांगा पतंग कुणी हा पाहिला? संक्रांतीचे दिवस जसे जवळ येतात तसे पतंग उडवण्याचेही दिवस येतात. काही ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातच पतंग उडवायला सुरूवात करतात. पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण लुटतात. या आनंदाच्या वेळी अनेक वेळा अपघात होतात व अनेक जण आपल्या प्राणाला मुकतात. मी पतंगामुळे होणार्‍या नेहमीच्याच अपघातांबद्दल- जसे वीज वाहक तारेला स्पर्श होणे, उंच इमारतीवरून पडणे आदी.- बोलणार नाही. हे असले अपघात पतंग उडवणार्‍यांना होतात. पतंग उडवणारे जर काळजी घेवून उडवत नसतील तर होणार्‍या परिणामांना तेच जबाबदार असतात. हे ठिक आहे.

एकच अमोघ उपाय: मराठी एकजूट

लेखक ज्ञानेश... यांनी गुरुवार, 24/12/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्तहो, सध्या लोकसत्तेच्या ’लोकमुद्रा’ पुरवणीत सलील कुलकर्णी यांची मराठी भाषेविषयक लेखमालिका सुरू आहे. त्या मालिकेतल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखातील काही अंश इथे प्रकाशित करतो, आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नात आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो. ."...संपूर्ण जगात भाषकसंख्येनुसार मराठी ही पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे आणि भारतात हिंदी, बंगाली व तेलुगू भाषांच्या नंतर चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. महाराष्ट्रात सुमारे दहा कोटी मराठी भाषिक आहेत.

ए४ आकाराची कहाणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 21/12/2009 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
ए४ आकाराचा कागद आपल्या साऱ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. हा आयाताकृती, उभट कागद २९७ x २१० मिलीमीटर आकाराचा असतो. पण तसा तो का असतो? याचा आपण कधीच विचार करत नाही. एवढ्या अडनेडी आकारास इतक्या विस्तृत प्रमाणात स्वीकृती कशी काय लाभलेली आहे? त्याचा इंचातल्या जुन्या मापनपद्धतीशी काही अर्थाअर्थी संबंध आहे काय? थोडक्यात म्हणजे या ए४ आकाराचा जन्म कसा झाला असावा? हा प्रश्न भल्या भल्यांची उत्सुकता चाळवू शकतो. मला कळलेल्या, ए४ आकाराच्या कागदाची कहाणी मी इथे सांगणार आहे. उभट आकार वाचण्यास सोपा असतो. म्हणूनच वर्तमान पत्रांतही स्तंभलेखनच लोकप्रिय होते.

एकाकी वाट

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 20/12/2009 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकाकी वाट वाट चालतो चालतो दूर पळते क्षितीज चांदण्या विझलेल्या, नेत्री थबकली नीज बोचे अचानक खोल तुझ्या मायेचा पाखर पिसाटले पळतांना लागे तीच ती ठोकर भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर पण सारतो पोटात दाम मोजून जहर कुठे वाटेत गळाली एका उदराची नाती चेचून तोडली भिंती विटांच्या आघाती झुले बाजुला पारंब्या, आपापले गीत गाती पालेमुळे गुंतलेली, येई कुणीही ना हाती त्यांच्या झावळी मिटल्या माझे बोडके आकाश फ़ुका बागेत सावली, शोधे जीव कासावीस वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट ****************
काव्यरस

तुमच्या गावाचे नाव काय?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/12/2009 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही खेडेगावात राहत असाल, शहरी असाल. तुम्ही राहता त्या गावाचे नाव घ्या, किंवा तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही गावाचे (किंवा गावांची नावे) नाव घ्या. त्या गावांची नावे कशी पडली असतील असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय? तुम्ही त्यावर विचार करून ते नाव का ठेवलेय असा कधी विचार केलाय? नक्कीच केला असणार. मी तर बुवा गावाचे नाव कसे पडले असेल त्याचा विचार करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर: पिंपळगाव. गावात (पुर्वी) पिंपळाची झाडे जास्त. वडगाव : गावात (पुर्वी) वडाची झाडे जास्त होती. (आता कसली झाडे जास्त?) हे झाले आपले सरळसोट नावे असलेली गावे. पण काही गावांची नावे इरसाल असतात.

मराठी कुठं बोलावं..

लेखक सुवर्णा यांनी बुधवार, 16/12/2009 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर मिपावर खूप वेळा चर्चा झालेली आहे पण आज असा एक अनुभव आला की हा लेख लिहावासा वाटला.. आज आमच्या हापिसामधे चहा-पानाच्या वेळी घडलं हे: मी, २ अमराठी सहकारी (जे माझे ब~यापैकी चांगले मित्र आहेत) आणि ३ मराठी सहकारी असे कट्टा करुन चकाट्या पिटत होतो.. वातावरण खेळीमेळीचं होतं.. आणि वायफ़ळ विषयावर विनोद वगैरे चालू होते.. त्यात मी एका मराठी सहका~याशी मराठीत विनोद केला (काय ते आता माझ्याही लक्षात नाहीये, काहीतरी फ़ुटकळच होतं) तर ही अमराठी मैत्रीण म्हणाली "तुम्हारा ये मराठी मंडल कही और लेके जाओ. (ती मजेत बोलुन गेली असावी)"..

एक अस्वस्थ रात्र

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 16/12/2009 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री एकचा सुमार असेल. काळी कभिन्न रात्र! थंडीचा कडाका अर्धवट झोपेत जाणवत होता. बेडरूममधला छोटा दिवा मिणमिणत होता. त्याचा पांढुरका मंद प्रकाश खवळलेल्या अंधाराला भगदाड पाडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. अंधाराने जणू त्या मंद आणि रडवेल्या प्रकाशाचे धड आपल्या मुठीत गच्च पकडून ठेवल्याचा भास होत होता. मी एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळत पुन्हा गाढ झोपी जाण्याचा प्रयत्न केला. नाही जमलं. अर्धवट झोप आणि विचारांची अविरत चालणारी चक्की! शांत झोप लागत नव्हती. झोपण्याच्या काही क्षण आधीच मित्राचा एसएमेस वाचला होता.

खरी कमाई....

लेखक भानस यांनी बुधवार, 16/12/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
अतिशय साध्या साध्या गोष्टी किती सुख देऊन जातात. अनेकदा त्या करणाऱ्याला त्याचा गंधही नसतो. तो आपला नेहमीच्या रहाटगाडग्यात अगदी नकळत ते करून जात असतो. पण ते दुसरे मन मात्र हा चांगुलपणा टिपत असते. आणि कुठेतरी त्या मनातही या अनपेक्षित मदतीच्या ओघाचा जन्म होतो. त्यातल्या निखळ सुखाची त्याला एकदा का गोडी कळली की आपसूक तोही त्या साखळीचा हिस्सा होऊन जातो. मी याबाबतीत खूपच भाग्यवान. अनेक मित्र-मैत्रिणी, ओळखीचे, अनोळखीही माझ्या जीवनात अनेकप्रकारे बंध निर्माण करून गेलेत. ही ’ खरी कमाई ’. सहजी केलेली निरपेक्ष गुंतवणूक.