Skip to main content

जीवनमान

मुंबई पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधण्यासाठी..

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 07/01/2010 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई पोलिस आयुक्तांशी थेट संपर्क साधण्यासाठी cpmumbai09@gmail.com या पत्यावर तुम्ही इ-मेल करू शकता असं श्री. शिवानंदन यांनी कळवलं आहे. पोलिसांसंबंधी इतर माहितीसाठी www.mumbaipolice.org या संस्थळाचा उपयोग करावा असंही ते सुचवतात.

पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला..आज श्रीनगरमध्ये

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 06/01/2010 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
अतिरेक्यांनी श्रीनगरच्या एका मध्यवर्ती हॉटेलात घुसून अंदाधुंद गोळीबार व ग्रेनेड हल्ला केला आहे. आतापर्यंतच्या वृत्तानुसार एक पोलिस कर्मचारी बळी पडला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. शंभरावर लोकांना हॉटेलातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चकमक अजूनही चालू आहे. जम्मू-काश्मीर सरकारला कालच एक वर्ष पूर्ण झालं तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी सुरक्षिततेत वाढ झाल्याचं सांगितलं होतं. त्याला अतिरेक्यांचं हे उत्तर आहे.

भटकंती स्पेशल २०१० कॅलेंडर

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 06/01/2010 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपा'कर बंधू आणि भगिनी. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. नववर्षासाठी आम्ही काही तरी भेट म्हणून एक उपक्रम राबवला आहे. एक भटकंती स्पेशल कॅलेंडर. पूर्ण कॅलेंडर इथे देण्याऐवजी पहिल्या वर्षाचे पान इथे दाखवत आहे. बाकी कॅलेंडर माझ्या ब्लॉगवरुन डाऊनलोड साठी उपलब्ध आहे.

अशीच एक काळरात्र...

लेखक दशानन यांनी सोमवार, 04/01/2010 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
२९/१२/२००९, वेळ रात्रीचे ११. ३० मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते.

नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 01/01/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !! अवांतरः एक ओळीचा धागा आहे, पण कधी कधी चालायला काही हरकत नसावी ;-) आपलाच, टुकुल

नशीब भाग २१ ते २५

लेखक विनायक रानडे यांनी गुरुवार, 31/12/2009 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
"नशीब भाग १५ ते २०" शब्दाचे भाषांतर केल्यास विनोद निर्माण होणार परंतु कवी भावना समजल्यास कवितेचा आनंद घेता येईल, जगात सगळीकडे कवी भावना सारख्याच असतात बदलतात ते फक्त शब्द. भाषांतर काराने त्या भावना समजूनच त्या त्या भाषेत भाषांतर करणे आवश्यक असते.

२०१०-विजयी भव!!!

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 30/12/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० च्या वर्षाची सुरवात होण्यास काही तासांचाच अवकाश आहे. एक वर्ष संपणार आणि दुसरे सुरु होणार. पाश्चात्य विचारांत जी काही कमी अथवा आक्रमकता असो, पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र उत्साहाचा आणि उमेदीचा आहे. माणुसमात्र अनेक अनियमितता अथवा बंधनाने बांधला गेला आहे, परंतु अश्या वर्षाच्या सुरवातीस मात्र त्याचा कल हा आशावादी आणि संकल्पाचा असतो ही बाजु मला जमेची वाटते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक गोष्टी करण्याच्या राहुन जातात त्यांना अश्या वर्षाच्या सुरवातीच्या कल्पनेने परत एकदा उजाला देता येतो.

पर्यावरणवादी व शास्त्रज्ञांना सुचना

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 30/12/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
कोपनहेगनची परिषद निष्फळ झाल्यामुळे मला राहवले नाही व मी निराश झाले. पृथ्वीवासियांना ग्लोबल वार्मिंगमुळे पडणाऱ्या कडाकाच्या थंडीत थोडीशी वैचारीक ऊब कशी देता येईल ह्याचा मी खूप विचार करता मला पुढील पर्याय दिसले; तेच मी आपणासमोर मांडत आहे. १. समुद्रात परागकण, बिया, सोडावीत. त्या तरंगतील व ढगांची निर्मीती होतांना त्या ढगात जातील. पावसाबरोबर जमीनीवर पडतील व विनासायास सगळीकडे जंगले वाढतील २. वरील उपायांबरोबरच खतेही अशाच प्रकारे त्या बियांबरोबर पुढील नक्षत्राच्या पावसाबरोबर पोहोचवता येतील. ३.