Skip to main content

जीवनमान

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/02/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २.

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 30/01/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.

श्वानहिरो

लेखक जागु यांनी बुधवार, 28/01/2015 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
नाव डॅनी असले तरी हा चित्रपटातील खलनायक नसून आमच्या घरातील श्वानहिरो आहे. माझा पुतण्या- अभिषेकच्या आग्रहास्तव माझ्या मिस्टरांनी एका काळ्या कुळकुळीत ग्रेटडेन नामक जातीच्या कुत्र्याच्या पिलाला आमच्या घरी आणले. ग्रेटडेन जातीचे कुत्रे धिप्पाड, उंच असतात. असेच वेगळेपण यांच्या पिलांमध्येही असते. इतर गावठी कुत्र्यांच्या पिल्लांपेक्षा उंच, काळा कुळकुळीत चमकता रंग तसेच पट्टा लावल्याने पावडर-तीट लावलेल्या बाळाप्रमाणे दिसणारा डॅनी घरातील सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय झाला होता. नवोदित श्वानपिलाचे कोडकौतुक जोरात चालू होते. वापरात असणाऱ्या चादरी जुन्या मानून त्याच्या अंथरूण-पांघरुणाची अभिषेकने सोय केली.

देवस्थाने आणि भटजी....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 23/01/2015 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.

भेटवस्तू

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 21/01/2015 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
भेटवस्तू पूर्वीच्या काळी दळणवळणाची फारशी साधनं नव्हती. एका गावातून दुसर्या गावात जाण्यासाठी बरेच दिवस लागायचे. कधी कधी तर कित्येक महिने प्रवासात जायचे. त्या काळी मुलगी एका गावातून दुसर्या गावात लग्न करून जाणं म्हणजे मुलगी फार दूर गेली असं आईवडिलांना वाटायचं. कारण कधी कित्येक दिवस, कधी कधी कित्येक महिने, कधी तर कित्येक वर्षं आईवडिलांची आणि मुलीची भेटच व्हायची नाही. जी काही भेट व्हायची ती पत्रातूनच. अशाच एका आईवडील आणि त्यांच्या लाडक्या मुलीच्या बाबतीतली ही एक छोटीशी गोष्ट. मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे. लग्न होऊन ती दुसर्या गावात (सासरी) नांदायला गेली आहे.

राधा कृष्ण

लेखक शिरीष फडके यांनी मंगळवार, 20/01/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
राधा कृष्ण राधा आणि कृष्णाचं नातं काय? या प्रश्नाबद्दल बरेच वाद आहेत. कुणी म्हणतात, राधा केवळ कृष्णाची भक्त होती. कुणी म्हणतात ती केवळ त्याची प्रेयसी होती. पण राधा-कृष्ण हे पती-पत्नी असण्याबद्दल बर्याच शंका-कुशंका आहेत. थोडक्यात काय तर राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती आणि याचे संदर्भ बर्याच ग्रंथात सापडतील. कृष्णाची पत्नी कोण हा प्रश्न समोर आला तर उत्तरादाखल पुढील नावं येतील – रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती, नग्नजित्ति, लक्षणा, कालिन्दि, भद्रा आणि मित्रवृन्दा. तशा कृष्णाच्या सोळा सहस्र पत्नी होत्या. पण कृष्ण-राधा हे पती-पत्नी नव्हते, मग त्यांचं नेमकं नातं काय? ते कितपत योग्य?

पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवण्यासाठी मदत

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी शनिवार, 17/01/2015 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
** हा लेख म्हणा, किंवा मदतीचा हात मी मागितला नोव्हेंबरमध्ये. प्रथम मायबोलीवर लिहीला होता, तिथे भरपूर चांगले सल्ले मिळाले.इच्छुकांनी जरूर वाचावेत. मला खूपच आधार व उभारी मिळाली. नोव्हेंबरमध्ये हा लेख लिहीण्याअगोदर ३-४ महिने अजिबातच पॉझिटीव्ह राहायला जमत नव्हते. खूप काळजी, स्ट्रेस सतत. कोणाशी हसून खेळून बोलणं अगदीच बंद झाले होते. मात्र ही मदत मागितली, खुलेपणाने जवळच्या मैत्रिणी व नातेवाईक यांच्याशी चर्चा करून त्यासर्वांवर विचार करून, मी गेले दोन-तीन महिने सातत्याने पॉझिटीव्हच विचार करण्याचा प्रयत्न करत आहे.

स्पर्श आंधळे ,गंध आंधळे भोवताली वनराई ग............

लेखक झंडुबाम यांनी रविवार, 11/01/2015 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
काल office मध्ये बसलो होतो ,अचानक whatsapp आला . requirement of writer tomorrow for visually challenged student . मी reply केला ,आवश्यक माहिती घेतली आणि confirmation देऊन टाकल थोडी धाकधूक होती कि जमेल काय म्हणून . एकतर बरीच वर्ष झाली होती, लिहायची अशी सवय राहिली नव्हती . whatsapp वर notification आले मी check केलं ,ज्याची exam द्यायची त्याचा contact number आला होता .तन्मय नाव त्याच मी number डायल केला स्वतःची ओळख करून दिली , विचारलं कि कुठे भेटायचं ? तन्मय :- तुला कॉलेज माहित आहे . मी :- नाही कधी गेलो नाही तिथे तन्मय :- ok . तू घाबरू नकोस ,मी guide करेन तुला ,तू स्टेशनला भेट .

एक गोपनिय कट्टा.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 11/01/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मिपाचे लोक कुठे गप्पा मारत बसतील याची काय ग्यारंटी नै. असेच रमत गमत काही मंडळी वेरुळला येऊन गेली. मलाही काही मिपाकरांना भेटायला नेहमी आवडतं. धन्या आणि वल्ली हे माझे मित्रच पण या निमित्ताने मला अतृप्त आत्मा यांना आणि प्रगोला भेटायला मिळालं.

भीतीच्या भिंती:४: खिडकीतून पाहताना..

लेखक आतिवास यांनी शनिवार, 10/01/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, , (नोंद: काबूलमधील वास्तव्यावर आधारित लेखमालिका. संबंधित व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ नये या हेतूने नावं बदलली आहेत. स्थळ - काळ हेतूतः मोघम ठेवले आहेत. फार फोटोही देता येणार नाहीत. माझं तिथलं अनुभवविश्व मर्यादित आहे याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.) कोणत्याही ठिकाणी गेलं की तिथल्या सर्वसामान्य माणसांशी बोलायचं ही एक नेहमीची सवय.