Skip to main content

जीवनमान

मोबाईल आणि आपण

लेखक Gayatri Muley यांनी शनिवार, 14/03/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
" ती एका प्राथमिक शाळेची शिक्षिका होती, सकाळीच तिने मुलांची परीक्षा घेतली होती, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तिने घरी आणल्या होत्या. उत्तर पत्रिका वाचता वाचता तिला रडू कोसळले. तिचा नवरा तिथेच पडून मोबाइल बघत होता. त्याने रडण्याच कारण विचारल. ती म्हणाली सकाळी मी मुलांना माझी सर्वात मोठी इच्छा या विषयावर लिहिण्यास सांगितले होते.

एक संवाद - १

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 12/03/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक नामांकीत सॉफ्टवेअर कंपनी. संगणकावर चॅटींग सोफ्टवेअरवर चालू असलेला संवाद - तो - हाय ती - हेलो तो - कधी आलीस ? ती - आत्ताच आलीय. १५ मिनिटे झालीत. ट्राफिक जास्त होते आज. तो - ओके, चहा झाला का? ती - नाही जातेय आता. तो - मीपण जातोय चहासाठी, कँटीन मध्ये येतेयस का? ती - नाही मी जागेवरच चहा घेऊन येतेय. तो - ठीक आहे. डब्यात काय आणलं आहेस ? ती - कालचा उरलेला भात होता त्याला नवऱ्याने फोडणी दिली, तोच घेऊन आलेय. तो - ओके. लकी आहेस. ती - का ? तुला नाही का करून दिले काही बायकोने? तो - तीचे जाउदे गं…. तुला माहीत आहे ना.

स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ?

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 10/03/2015 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच "सुखी" असलेले स्पष्टवक्ते "स्पष्टवक्ता सुखी भव" या म्हणीमुळे आणखीनच सुखावतात आणि त्यांना चेव चढतो. ही म्हण तयार करणारांनी फक्त एकतर्फी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी या तथाकथित स्वयंघोषित स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांचा विचार केलेलाच नाही. म्हणून सर्वप्रथम मी ही अपूर्ण म्हण पूर्ण करतो ती अशी: "स्पष्टवक्ता सुखी भव । कष्टश्रोता दु:खी भव ।" स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या आणि त्यामुळे दु:खी कष्टी झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांना आपण "कष्टश्रोता" म्हणूया!

ओय! – क्षणभंगुरतेची दोन रुपे

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 09/03/2015 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाहिलेल्या मोजक्या तेलुगु चित्रपटांपैकी हा एक चित्रपट – ओय! वरवर पाहता एक तरल प्रेमकथा. टॉलिवूडी हाणामारी, भडक विनोदाचे केविलवाणे प्रयत्न तुलनेने कमी. ही ठळक वैशिष्ट्ये चित्रपटाला इतर टिपिकल सौदिंडियन चित्रपटांपासून वेगळे बनवतात. poster कथेचा नायक उदय (सिद्धार्थ) हा अतिश्रीमंत घरातला, तर नायिका संध्या (शमिली) आई-वडिल गमावलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील. दोघांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक. ती अतिशय टापटिपीची, तर हा पसारा करणारा.

चलती का नाम गाडी- ६: वाहन सुरक्षितता

लेखक खेडूत यांनी शनिवार, 07/03/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन मागच्या भागात चौर्य प्रतिबंधक उपाय कसे आणि किती प्रकारचे असतात ते आपण पाहिले. आता सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा विषय पाहूयात.

विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 06/03/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मनात अनेक विचार येत असतात ( हे कशाचे लक्षण असावे ?) इथे येऊन शंका विचारून ज्ञानात भर पडावी यासाठी आम्ही मिपावर आलो. पण इथे आल्यानंतर आम्हालाही वाटू लागले आहे की आम्हाला सुद्धा चार लोकांनी विद्वान म्हणावे. संतुलित प्रतिसाद देणारा सेन्सीबल आयडी अशी आमची ओळख व्हावी असे आम्हालाही वाटू लागले आहे. त्यासाठी अनेक शंका विचारण्याचे धागे ( दारू पिण्यास सुरूवात कशी करावी, जुगारात यशस्वी कसे व्हावे, बनियनला किती भोकं पडेपर्यंत ते वापरावे, अंडरवेअरच्या इलॅस्टीकचे नंतर काय करावे इ. इ. ) पेंडिंग ठेवून हा विषय प्राधान्याने घ्यावा असे योजले. तरी विद्वान म्हणवून घेण्यासाठी काय करावे ?

वजन कमी करणारा आहार

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 04/03/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री

वरुणदेवाचे पहिले दर्शन.....

लेखक निनाद जोशी यांनी सोमवार, 02/03/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा यावर्षी पहिल्यांदा वरुण देवाने दर्शन दिले. त्या आधी हि तो आला होता. पण का कुणास ठाऊक एखादा पोस्टमन जसा हळूच दरवाज्यातून पत्र टाकून दुसऱ्या घराकडे वळतो , तसाच तो आला आणि आपल्या जलधारांची छोटीशी पिशवी रिती करून गेला. सकाळी जेव्हा उठलो तेव्हा जाणवल कि काहीतरी वेगळ वाटतंय. जीवाची होणारी तगमग , अंगाची होणारी लाही लाही अचानक कमी झाली होती .हवेत एक प्रकारची प्रसन्नता आली होती. बाहेर येऊन बघतो तर सर्व अंगणभर पाणी !!!! म्हणतल हे केव्हा झालं ???? काही न कळवता ,काही संकेत न देता पाहुणा आला अन गेला ही !!!! असं का केल असावं त्याने ?

मदतकेंद्र: सल्ला , मार्गदर्शन, साहाय्य, समुपदेशन

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/02/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लग्नाला १० वर्षे झालीत मला दोन मुले आहेत माझे मि खूप दारू पितात घरात सारखे तणाव राहतात मि ग्राम प कामाला आहे मि शाळे वर कामाला जाते पार्लर टाकले पण चालत नाही ते घरात आम्हाला पैसे देत नाहीत आई वडील काही म्हणत नाहीत माझे सासरे देखील दारू पितात गांजा पितात पता खेड तात तसेच मासाहार करतात पै कमी पडले कि बहिण आई त्या दोघांना देते .कृपया मला मदत करा त्यावर उपाय सागा सेवा काय करू कि वाद होणार नाहीत माझ्या जवळ पैसे येतील . -सौ स. श. रा.

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

लेखक किरण८८७७ यांनी बुधवार, 25/02/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .