Skip to main content

जीवनमान

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 27/03/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे. जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते?

गनिमी कावा

लेखक विदेश यांनी गुरुवार, 26/03/2015 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
विचारत इकडे तिकडे आले आज पाहुणे घरात आले अहाहा सदन धन्य झाले .. निवांत खुर्चीवर ते बसले मान डोलवत जरासे हसले रुमालाने तोंडही पुसले .. 'कसे काय तुम्ही वाट चुकला आठव आमचा कसा जाहला ?' - गूळपाणी देत प्रश्न विचारला .. ओशाळवाणे पाहुणे हसले हळूच इकडे तिकडे पाहिले प्रश्नाचे उत्तर देणे टाळले .. पिशवीतून मोबाईल काढला रुमालाने स्वच्छही पुसला माझ्या हाती तो सोपवला .. "गनिमी कावा" त्याचा ध्यानी आला माझ्या त्याच क्षणी मुकाट उठलो हाती धरुनी .. जर्जर जीव त्या पाहुण्याचा "चार्जर" विसरला मोबाईलचा शोधला पत्ता माझ्या घरचा .. ! .

तो, ती आणि एक सामान्य घटना

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 24/03/2015 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजूबाजूला दिसनारी सर्वसामान्य माणसे किंवा आसपास घडनाऱ्या आणि वरकरणी सामान्य वाटनाऱ्या घटना कधीकधी बरेच काही शिकवून जातात. साधारण दोन महीन्यापूर्वीची गोष्ट मी कुटुंबासमवेत म्हैसूरवरुन बंगलोरकडे येत होतो. स्थळ: बंगलोर म्हैसूर रोडवरील मदुरच्या जवळचे एक अॅदीगॅसचे जॉइंट. वेळ: रात्रीचे सव्वानउ साडेनउ. बंगलोरमधे अॅदीगॅसच्या कुठल्याही जॉइंटमधे जितकी गर्दी असते तितकीच गर्दी इथेही होती. बऱ्याच कार पार्क होत्या. आम्हीही जेवायला तिथेच थांबायचे ठरविले. कार पार्क केली. आत गेलो. आतपण गर्दी होती, बराच गोंधळ होता. आम्हाला बसायला अगदी कोपऱ्यात जागा मिळाली.

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 24/03/2015 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.

या गावाचं काही खरं नाही!

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 23/03/2015 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ली क्वान युंचे देहावसान झाल्याचे वृत्त कानी आले. बंड्याला त्याच्या वॉसप वर लिहिलं, 'शनिवार रविवार उंडारुन झालं, आज पुन्हा सोमवारी सुटी!' बंड्याचा दोन मिनिटांनी थंड प्रतिसाद. 'कसली सुट्टी?' अरे! एवढा मोठा नेता गेला आणि सुट्टी नाही? हां, बरोबर; अंतिम संस्कार उद्या असतील, सुट्टी उद्या देतील. पाच मिनिटांनी उत्तर आलं, 'मला काम आहे. तुलाही असावं अशी माफक अपेक्षा आहे. संध्याकाळी बोलु आरामात'. अरे देवा! काय हा माणुस की काय? सुट्टी नसल्याचं काहीच सोयर सुतक नाही? साधा माझ्यापाशी खाजगीत निषेधही नाही? असो. संध्याकाळी बघु. सोमवार असूनही रस्त्याला गर्दी बेताची होती, अवघ्या एका तासात घरी आलो.

निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 23/03/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
हे जग निसर्गनियमानुसार चालते. म्हणजे जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. त्या नियमानुसार कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही वेळ "निघून गेलेली" नसते. वेळ/काळ परत परत येत राहतो. जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देत असते. ती आपल्याला फक्त दिसली पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास काहीही अशक्य नसते. प्रयत्न करीत राहावे आणि फळ निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. चांगले कर्म करा आणि चांगल्या फळाची अपेक्षा जरूर करा.

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 23/03/2015 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो. गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं.

भीतीच्या भिंती ६: ‘दरी’

लेखक आतिवास यांनी रविवार, 22/03/2015 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ,, , , (विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.) भारतासारख्या बहुभाषिक देशात जगण्याचा एक फायदा असा की, कुठल्याही नव्या भाषेत रूळायला आपल्याला

एक संवाद - २

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 19/03/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक संवाद - 1 ती - काय रे ? कुठे होतास इतका वेळ ? ऑन लाईन दिसत नव्हतास… तो - उशीरा आलो आज. ती - ओके, काय विशेष? उशीर का झाला? तो - आता तूपण बायको सारखे प्रश्न विचारायला लागलीस ती - नाही सांगायचं तर नको सांगूस. तो - अरे लाँग ड्राईव ला गेलो होतो ना. ती - ओह्ह. तो - तुला बोलावलं होतं, नाही आलीस. ती - कुठे गेला होतास तो - असं काही ठरवून नव्हतो गेलो ती - म्हणजे ? तो - नाशिकरोड ला चालवत राहिलो ती - ओके, आणि मग तो - एक रिपोर्ट बनवतो आणि देतो तुला मग वाचत बस.

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

लेखक पुष्कर विजयकुमार जोशी यांनी सोमवार, 16/03/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं. दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता. राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले. पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए… वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके… एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ" त्याचा फोन वाजतो. "हं बोला सर" इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.